पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५१५ जोडे । तरी बहु काय गाडे । भरणें येरें ॥ ३७ ॥ आयुष्येंवीण लक्षणें । सिसेंवीण अळंकरणें । बोहेरेंवीण वाधवणें । तो विटंबू गा ॥ ३८ ॥ तैसें शास्त्रजात जाण । आघवेंचि अप्रमाण । पार्था अध्यात्मज्ञानेंविण । एकलेनी ॥ ३९ ॥ यालागीं अर्जुना पाहीं । अध्यात्मज्ञानाच्या ठायीं । जया नित्यवोधु नाहीं । शास्त्रमूढा ॥। ८४० ।। तया शरीर जें जालें । तें अज्ञानाचें वीं विरूढलें | तयाचें व्युत्पन्नत्व गेलें । अज्ञानवेलीं ॥ ४१ ॥ तो जें जें बोले । तें अज्ञानच फुललें | तयाचें पुण्य जें फळलें । तें अज्ञान गा ॥ ४२ ॥ आणि अध्यात्मज्ञान कांहीं । जेणें मानिलेंचि नाहीं । तो ज्ञानार्थ न देखे काई | हें वोलावें असे ॥ ४३ ॥ ऐलीचि थडी न पवतां । पळे जो माघौता । तया पैलीपींची वार्ता | काय होय ॥ ४४ ॥ कां दारवंटांचि जयाचें । सीम रोविलें खांचे। तो केविं परिवरींचें | ठेविलें देखे || ४५ ॥ तेविं अध्यात्मज्ञानी जया । अनोळख धनंजया । तया ज्ञानार्थ देखावया । विषो काई ॥ ४६ ॥ म्हणोनि आतां विशेषं । तो ज्ञानाचें तत्त्व न देखे । हें सांगावें आंखेंलेखें । न लगे तुज ॥ ४७ ॥ जेव्हां सगर्भे वाढिलें । तेव्हांचि पोटींचं धालें । तैसें मागिले पढ़ें बोलिलें । तेंचि होय ॥ ४८ ॥ वांचूनियां वेगळें । रूप करणें हें I कुपटाही जर हातीं लागला, तर इतर औषधी वनस्पतींनीं गाडेच्या गाडे भरण्याची काय आवश्यकता आहे ? ३७ एका आयुष्यावांचून सौंदर्याच्या बत्तीस लक्षणांचा, एका मस्तकावांचून दागदागिन्याचा, नवरानवरीवांचून वाजंत्राचा, सोस धरणें म्हणजे मूर्खपणाच नव्हे काय ? ३८ त्याप्रमाणेंच एका अध्यात्मशास्त्रावांचून इतर सारीं शास्त्रं - अपुरेपणामुळे केवळ निष्फळ व भ्रामक आहेत. ३९ याकरितां, अर्जुना, ज्या पढतमूर्खाला अध्यात्मज्ञानाचा अवीट बोध घडला नाहीं ; ८४० त्याचें शरीर अज्ञानाचे मंदिर समजावे; त्याचं सर्व ज्ञान अज्ञानवल्लीचें फळ होय. ४१ त्याचें प्रत्येक वचन अज्ञानाचा फुलोरा समजावा, आणि जें पुण्यफळ त्याच्या पदरी पडतें तेंही अज्ञानच असतें. ४२ आणि ज्याला अध्यात्मशास्त्राविषयीं आदर नाहीं, त्याला ज्ञानवस्तु कधींच दिसत नाहीं, हें आतां सांगितलेच पाहिजे असें नाहीं. ४३ अलीकडच्या तीरावरही न येतां जो मागें वळून धूम ठोकतो, त्याला पैलतीराची माहिती कशी बरे होणार ! ४४ किंवा दाराच्या उंबरठ्यावरच ज्याचं डोकें डांबून टाकलें आहे, त्याला अंतर्गृहांतल्या गोष्टी कशा बरें दिसणार ? ४५ त्याचप्रमाणं, अर्जुना, ज्याला अध्यात्मज्ञानाची मुळींच ओळख नाहीं, त्याला सत्यज्ञान होण्याला विषय तरी कोठं राहिला ? ४६ म्हणून अशा पुरुषाला ज्ञानाचे तत्त्व समजत नाहीं, हें आतां अगदीं आंकडेमोड करून तुला सांगण्याची आवश्यकता नाहीं. ४७ गरभार स्त्रीला अन्न वाढलें, कीं तें लागलेंच तिच्या पोटांतील पिंडाला वाढलें असेंच होतें, त्याचप्रमाणे नागें सांगितलेल्या ज्ञानपदांत अज्ञानपदाचेंही विवरण होतंच. ४८ आंधळ्याला आमंत्रण दिलें म्हणजे जसा तो कोणातरी डोळसास बरोबर १ वधूवराशिवाय २ वाजंत्रें वाजवणें,