पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी तोचि ।। २५ ।। आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे । ते आइकोनि डोरे वाहे । विद्वांसु जो ॥ २६ ॥ उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्मज्ञानीं जयाचें । मनचि नाहीं ॥२७॥ आत्मचर्चा एकी आथी । ऐसिये बुद्धीची भिंती । पाहूनि जयाची मति । ओढाळ जाहली ॥ २८ ॥ कर्मकांड तरी जाणे । मुखोद्गत पुराणें । ज्योतिपीं तो म्हणे । तैसेंचि होय ॥ २९ ॥ शिल्पीं अतिनिपुण | सूपकमही प्रवीण । विधि आथर्वण | हातीं आथी || ८३० ॥ कोकीं नाहीं ठेलें । भारत कीर म्हणितलें । आगम आफाविले । मूर्त होती ॥ ३१ ॥ नीतिजात मुझे । वैद्यकही बुझे । काव्यनाटकीं दुजें । चतुर नाहीं ॥ ३२ ॥ स्मृतींची चर्चा । दंशु जाणे गारुडियाचा | निघंटु प्रज्ञेचा | पाइकु करी || ३३ || पैं व्याकरणीं चोखडा | तक अतिगाढा । परि एक आत्मज्ञानी फुडा । जात्यंधु जो ॥ ३४ ॥ तें एकवांचूनि आघवा शास्त्रीं । सिद्धांत निर्माणधात्री । परि जळो तें मूळनक्षत्री | न पाहें गा ॥ ३५ ॥ मोराआंगीं अशेपें । पिसें असती डोळसें । परि एकली दृष्टि नसे । तैसें तें गा ॥ ३६ ॥ जरी परमाणूएवढें । संजीवनीमूळ बोलतो, तोही अज्ञानच. २५ आणि ज्या विद्येनें आत्मदर्शन घडतें, तिचें नांव काढलें असतां ज्या विद्वानाला तिचा उपहास करण्याची बुद्धि होते; २६ जो उपनिषदांकडे ढुंकूनही पहात नाहीं, योगशास्त्र ज्याला मानवत नाहीं, आणि अध्यात्मज्ञानाकडे ज्याच्या मनाचा कलच नसतो; २७ आत्मचर्चा हें कांहीं तरी विचार करण्यासारखें प्रकरण आहे, अशा श्रद्धेच्या कोटाला उलथून पाडून ज्याचें मन ओढाळ गुराप्रमाणें मोकाट सुटलें आहे; २८ जो कर्मकांडांत निपुण आहे, ज्याला पुराणे तोंडपाठ आहेत, आणि ज्योतिषांतही जो पारंगत आहे, २९ शिल्पकर्मात जो हुशार आहे, पाककलेत निष्णात, आणि अथर्वण वेदांतील अघोरी मंत्रतंत्रांत ज्याचा हातखंडा आहे, ८३० ज्याला कामशास्त्रांत कांहीं शिकावयाचें राहिलें नाहीं, सर्व भारत ज्याला अवगत झालें आहे, आणि मूर्तिमंत वेदच ज्याच्या हातांत आले आहेत, ३१ ज्याला नीतिशास्त्र अवगत आहे, वैद्यक ज्ञात आहे, आणि काव्यनाटकांत तर ज्याच्या तोडीचा दुसरा आढळणारच नाहीं, ३२ जो स्मृतींची चिकित्सा करतो, गारुडी विद्येचे मर्म जाणतो, आणि शब्दकोश तर ज्यानें आपल्या बुद्धीचा केवळ बंदाच करून सोडला आहे, ३३ व्याकरणशास्त्रांत ज्याचें ज्ञान अगाध आहे, परंतु एका अध्यात्म विद्येत मात्र जो खरोखर जन्मांध आहे. ३४ अध्यात्मशास्त्र वगळून इतर सर्व शास्त्रांतील सिद्धांतांच्या पूर्ततेचा धागा जो लावू शकतो; पण आग लागो अशा ज्ञानाला ! आईबापांना मारणारें मूळ नक्षत्र ज्या मुलाला लागले आहे, त्या मुलाप्रमाणें अशा ज्ञानाचे दर्शनही येऊ नये. ३५ मोराच्या अंगभर पिसं असतात आणि त्या पिसांवर डोळेही असतात, पण जशी त्या डोळ्यांत दृष्टि मात्र नसते, तद्वत् या ज्ञानाची स्थिति आहे. ३६ अरे, संजीवनी वेलीच्या मूळाचा अगदीं एवढासा - १ उपहास, २ रहस्य, तत्व.