पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी निषेध आघवे । पारुपती ॥ ४६ ॥ असता दीपू दवडिजे । मग अंधकारी राहा- टिजे । तरी उजूचि आडळिजे । जयापरी ॥ ४७ ॥ तैसा कुळीं कुळ- क्षयो होये । तये वेळीं तो आद्यधर्मु जाये । मग आन कांहीं आहे । पापा- वांचुनी ॥ ४८ ॥ जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा राहटती । म्हण- ऊनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥ ४९ ॥ उत्तम अधर्मी संचरती । ऐसे वर्णवर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥ २५० ॥ जैसी चोहटां- चिये बळी | पाविजे सैरा काउळीं । तैसी महापापें कुळीं । प्रवेशती ॥ ५१ ॥ संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च । पतंति पितरो ह्येषां लुप्तपिंडोदकक्रियाः ॥ ४२ ॥ सम० - संकरें होति नरक कुलघ्नाच्या कुळासही । पिंडोदकक्रियालोपें च्यवती सर्व पूर्वज ॥ ४२ ॥ आर्या - होतो कुलघ्न पुरुषा नरकप्रद शीघ्र वंशसंकर कीं। मग पिंडोदकलोपें पडती पितृगण समस्तही नरकीं ॥ ४२ ॥ ओंवी—वर्णसंकर झालियावरी । कुळ बुड़े पे अधोरीं । पिंडोदकक्रिया अवधारीं । नाहीं करावयासी ॥ ४२ ॥ मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां । येरयेरां नरका | जाणें आथि ॥ ५२ ॥ देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग वोवांडती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥ ५३ ॥ जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक क्रिया पाखे | तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ॥ ५४ ॥ तरी पितर काय करिती । कैसेनि स्वर्गी वसती । म्हणोनि तेही येती । कुळापासीं ॥ ५५ ॥ जैसा नखात्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें । तेवीं आवस कुळ आवघें । आप्लेविजे ॥ ५६ ॥ 1 असें होतें, आणि त्या कारणाने विधिनिषेध हिरमुसले होऊन लपतात. ४६ हातचा दिवा गमवावा, आणि मग अंधारांत वावरावें, आणि सरळच अडखळून धडपडावें, ४७ तसेच, ज्या वेळीं कोणत्याही कुळांत कुळक्षय होतो, तेव्हां मुख्य सनातन धर्माचार सुटतात, आणि मग अशा स्थितींत पापावांचून दुसऱ्या कशाचे पीक येणार ? ४८ जेव्हां आचारबंध व इंद्रियनिग्रह यांचा नायनाट होतो, तेव्हां इंद्रिये सैरावैरा धावू लागतात, आणि त्या कारणानें कुलीन स्त्रियाही भ्रष्ट होतात. ४९ श्रे कनिष्ठांत मिसळतात, आणि उच्चनीच वर्णाचा एकंकार होऊन जातिधर्माचं मूळच उपटलें जातें. २५० ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर कावळ्यांच्या झुंडी पडतात, त्याप्रमाणें महापातकांचा संचार अशा कुळामध्ये अनिर्बंध होतो. ५१ मग त्या कुळाला आणि त्या कुळघातक्याला, असा दोघांनाही नरकवास घडतो. ५२ आणि हे पहा, की याप्रमाणे सर्व वंशविस्तार पापाने भ्रष्ट झाला, म्हणजे त्यांचे स्वर्गवासी पितरसुद्धां स्वर्गलोकातून खाली घडघडतात. ५३ कारण, जेथें नित्य व नैमित्तिक अशीं दोन्ही धर्मकृत्यें नष्ट झाली, तेथे श्राद्धकर्म करून कोण कोणाला तिळोदक देण्याच्या भरीस पडतो ? ५४ मग पितरांनी काय करावं ? त्यांनी स्वर्गलोकीं कसे टिकावें ? म्हणून तेही बिचारे नरकांत आपल्या कुळापाशीं येतात. नखाच्या टोकाला झालेला सापाचा दंश, जसा विषाच्या वेगानें मस्तकाला जाऊन पोचतो, तसा या पादोपाने अगदीं मूल्यपूरुपापर्यंत सर्व कुळविस्तार व्यापिला जातो. ५६ ५५ १ वागतात, चालतात. २ चव्हाट्यावरच्या ३ माघारी फिरते, रुसते. ४ बुडविलें जातें.