पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५१३ सुंगरवा देखे । तरी तयाचा मंत्र शिके | येरु नेघे || १३ || प्राणिजातेंसी निष्टुरु | स्थावरीं बहु भरु । तेवींचि नाहीं एकसरु | निर्वाहो जया ॥ १४ ॥ माझी मूर्ति निफजवी । ते घराचे कोनीं वैसवी । आपण देवोदेवी | यात्रे जाय ॥ १५ ॥ नित्य आराधन माझें । काजीं कुळदेवता भजे | पर्वविशेष कीजे । पूजा आना ।। १६ ।। माझें अधिष्ठान घरीं । आणि वौसे आनाचे करी । पितृकार्यावसरीं । पितरांचा होय ॥ १७ ॥ एकादशीच्या दिवसीं । जेतुला पाडु आम्हांसी । तेतुलाचि नागांसी । पंचमीसी ॥ १८ ॥ चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाच होये । चाउदसी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ॥ १९ ॥ नवमीतें मांडी । मग वैसे नवचंडी | आदित्यवारीं वाढी । वहिरवां पात्रीं ॥। ८२० ॥ पाठीं सोमवार पावे । आणि बेलेंसी लिंगा धांवे । ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥ २१ ॥ ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी । अवघेन गांवदारीं । अहेव जैसी ॥ २२ ॥ तैसेनि जो भक्त | देखसी सैरा धांवतु | जाण अज्ञानाचा मृतु । अवतार तो ॥ २३ ॥ आणि एकांतें चोखटें । तपोवनें तीर्थं तदें । देखोनि जो गा विटे । तोहि तोचि ॥ २४ ॥ जया जनपद सुख । गजवजेचें कवतिक । वानूं आवडे लौकिक । तोहि संप्रदायाचा विशेष थाटमाट पाहिला की जो त्याच्या भरीं भरतो, त्याचाच मंत्र घेतो, आणि दुसऱ्यांना क्षुद्र समजून त्यांचा स्वीकार करीत नाहीं ; १३ सजीव प्राण्यांना जो निर्दयपणे वागवतो, परंतु वृक्षपाषाणादि स्थावर वस्तूंना देव म्हणून पुजतो, आणि त्याप्रमाणेच ज्याची एकनिए श्रद्धा मात्र कोठेच नसते; १४ जो माझी मूर्ति तयार करतो, पण ती घरांत कोठेतरी एका कोपऱ्यांत स्थापून, आपण स्वतः इतर देवदेवतांच्या यात्रेकरितां निघून जातो; १५ जो नेहमी माझें पूजन करतो, 1 मंगलकार्यात कुलदेवतेची अर्चा करतो, आणि कांहीं विशेष पर्वणी असली म्हणजे इतर देवतांची आराधना करितो; १६ माझी स्थापना घरांत केलेली आहे, पण नवस मात्र इतर देवतांना करतो आणि श्राद्धसमयीं जो पितरांचा भक्त होतो; १७ एकादशीच्या दिवशीं आम्हांला जितका मान, तितकाच मान श्रावण शुद्ध पंचमीला जो नागांना देतो; १८ भाद्रपद शुद्ध चतुर्थी आली कीं जो गणपतिभक्त होतो, आणि चतुर्दशी उजाडली कीं दुर्गेच्या भक्तीनें नटतो; १९ नवमीला मांड मांडून जो नवचंडीच्या अनुष्ठानास बसतो, आणि रविवारी कालभैरवाचा खिचडा वांटतो; ८२० नंतर सोमवार आला की बेलपान घेऊन शिवलिंगाकडे धांव मारतो; असा जो एकच पुरुष सर्व नानांदेवांची जागवण करतो; २१ अशा अशा धांदलीनें जो निरंतर भक्ति करतो आणि क्षणभरही निवांत रहात नाहीं; बाजारसवाष्णीसारखा जो भक्त सर्वाकडे सैरावैरां धांवत असलेला आढळतो, तो भक्त मूर्तिमंत अज्ञान आहे असें समजावें. २३ आणि निवांत व स्वच्छ अशीं तपोवनं, तीर्थे, नदीथडी इत्यादि स्थळें पाहून ज्याच्या मनाला वीट येतो, तोही अज्ञानच होय. २४ ज्याला जनसमाजांत गोड वाटतं, जो सांसारिक गडबडीला भुलतो, जो लौकिक विषयांसंबंधें आवडीनें १ थाटमाट २ व्रत आणि नवस ३ बाजारबसवी किंवा गांवच्या वेशीवर राहणारी सुवासिनी.