पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१२ 1 सार्थ श्रीज्ञानेश्वरी पाळी उणखुण । स्त्रियेची जो ॥१॥ किंबहुना धनंजया । स्त्रीचि सर्वस्व जया । आणि तियेचिया जालियां । लागीं प्रेम ॥ २ ॥ आणिकही जें समस्त । तियेचें संपत्तिजात । तें जीवाहूनि आप्त । मानी जो कां ||३|| तो अज्ञानासी मूळ | अज्ञाना त्याचेनि वळ । हें असो केवळ । तो तेंचि रूप ॥ ४॥ आणि मातलिया सागरीं । मोकलिया तरी । लाटांच्या येरझारीं । आंदोळे जेवीं ॥ ५ ॥ तेवीं प्रिय वस्तु पावे । आणि सुखें जो उंचावे । तैसाचि अप्रियासवें । तळवटु घे ॥ ६॥ ऐसेनि जयाचे चित्तीं । वैपम्यसाम्याची वाखेती । वाहे तो महामती | अज्ञान गा ॥७॥ आणि माझ्या ठायीं भक्ति । फळालागीं जया आर्ती । धनोद्देशें विरक्ति । नटणें जेवीं ॥ ८ ॥ ना तरी कांताच्या मानसीं । रिगोनि स्वैरिणी जैसी । राहाटे जारेंसी । जावयालागीं ॥ ९॥ तैसी मातें किरीटी | भजती गा पाउटी । करूनि जो दिठी । विपो सूये ||१०|| आणि भजिन्नलियासवें । तो विपो जरी न पावे। तरी सांडी म्हणे आघवें | टवाळ हें ||११|| कुणवट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलाची परवडी । करी तया ॥ १२ ॥ तया गुरुमार्गा टेंके। जयाचा होतील या धास्तीनें देवीस रुप्याचे नाग वाहण्याचा नवस जसा कोणी मोडीत नाहींत, तसाच जो स्त्रियेची कोणतीही यःकश्चित् सूचना पुरी केल्यावांचून राहात नाहीं; १ सारांश, अर्जुना, स्त्री हेंच ज्याचें सर्वस्व असतें आणि तिच्यापासून झालेल्या संततीच्याच वांट्याला ज्याचें प्रेम येतें; २ आणि त्या स्त्रीने सर्व वैभव ज्याला जीवापेक्षां प्रिय असतें; ३ असा पुरुष अज्ञानाचें मूळ आहे, त्याच्यामुळेच अज्ञानाला तेज चढतें, आणि तो प्रत्यक्ष अज्ञानच होतो. ४ आणि खवळलेल्या समुद्रांत मोकळी सोडलेली नाव ज्याप्रमाणे लाटांच्या चढपडीबरोबर डोल घेते, ५ त्याप्रमाणें प्रिय वस्तूचा लाभ झाल्याबरोबर जो गगनांत मावेनासा होतो, पण अप्रिय घडून आलें कीं रसातळास खचतो; ६ अशा प्रकारें ज्याच्या अंतःकरणाला भेदभावनेचा पायबंद पडलेला असतो, तो कितीही बुद्धिवान असला तरी अज्ञानच जाणावा. ७ आणि मनांत कांहीं तरी फळाची आशा वागवून, जो माझी भक्ति करतो; जसे द्रव्य संपादण्याच्या हेतूने कोणी वैराग्याचा वेश धारण करतात, ८ किंवा जाराकडे जाण्यास सवड सांपडावी म्हणून नवऱ्याची मनधरणी करून त्याला विश्वासाची भूल पाडण्याकरितां व्यभिचारिणी स्त्री जशी वरकर्मी शुद्ध वर्तन दाखवते, ९ तशी अर्जुना, जो माझी भक्ति करतो, परंतु ज्याची सगळी नजर विषयसुखसंपादनाकडे असते; ८१० आणि अशी भक्ति केल्याबरोबर जर इच्छित विषय प्राप्त झाला नाहीं, तर 'ही सारी भक्ति निरर्थक आहे,' असें म्हणून जो ती तत्काळ सोडून देतो; ११ कुणबी जसा नवी नवी जमीन लागवडीस आणतो, तसे जो नवे नवे देव आराधनेला मांडती, आणि प्रत्येक नव्या देवाची पूर्वीच्या देवाप्रमाणेच सेवा करतो; १२ एकाद्या गुरु- १ वाखवट, वाखदोर. २ प्रकार, सेवारीति,