पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५११ म्हातारपणीं जालें । रत्न एक विपाइलें । तयाचें कां जेतुलें । मातापितरां ॥ ८८ ॥ तेतुलेनि पाडें पार्था । घरीं जया प्रेमआस्था | आणि स्त्रीवांचूनि सर्वथा । जाना जो ॥ ८९ ॥ तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनियां सर्वभावें । कोण मी काय करावें । कांहीं नेणें ॥ ७९० || महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत । ठाके व्यवहारजात । जयापरी ॥ ९१ ॥ हानि लाज न देखे । परापवादु नाइके । जयाचीं इंद्रियें एकमुखे । स्त्रिया केलीं ॥ ९२ ॥ चित्त आराधी स्त्रियेचें । आणि तियेचेनि छंदें नाचे । माकड गारुडियाचें | जैसें होय ॥ ९३॥ आपणही शिणवी । इष्टमित्र दुखवी | मग कवडाचि वाढवी । लोभी जैसा ||१४|| तैसा दानपुण्य खांची । गोत्रकुटुंबा वंची। परी गारी भरी स्त्रियेची । उणी हों नेदी ॥ ९५ ॥ पूजितीं दैवतें जोगावी । गुरूतें बोलें झकवी | मायबापां दावी । निदारपण ।। ९६ ।। स्त्रियेच्या तरी विखीं । भोगुसंपत्ति अनेकी । आणि वस्तु निकी । जे जे देखे ॥ ९७ ॥ प्रेमाथिलेनि भक्तें | जैसेनि भजिजे कुळदैवतें । तैसा एकाग्रचित्तें । स्त्री जो उपासी || १८ || साच आणि चोख । तें स्त्रियेसीचि अशेख | येरांविषयीं जोगावणूक | तेही नाहीं ॥ ९९॥ इयेतें हन कोणी देखैल । इयेसी बेखासें जाईल । तरि युगचि बुडैल | ऐसें जया ॥८००॥ नायटेयां भेण । न मोडिजे नागांची आण । तैसी श्रम करीत असतो; ८७ म्हातारपणीं दैवयोगानें जर एकुलतें पुत्ररत्न झाले, तर आईबापांना त्याचें जेवढे कौतुकपूर्ण प्रेम वाटतें, ८८ तेवढे प्रेम ज्याला आपल्या घराविषयीं वाटत असतें आणि स्त्रीवांचून दुसरें कांहींही जो जाणत नसतो; ८९ त्याप्रमाणेंच जो जीवें स्त्रीदेहाला भजून राहतो आणि 'मी कोण ? मी काय करावें ?" या गोष्टीची ज्याला यत्किंचितही जाणीव नसते; ७९० ज्याप्रमाणें महाज्ञानी जनाचें चित्त ब्रह्मवस्तूच्या ठायीं रममाण होऊन त्याचे सर्व व्यवहार लोपतात, ९१ त्याप्रमाणें जो, सर्व इंद्रियें स्त्रीच्या ठिकाणीं एकाग्र झाल्यामुळें, लाज किंवा हानि जाणत नाहीं, व लोकापवाद ऐकत नाहीं; ९२ स्त्रीच्या मर्जीची जो निरंतर आराधना करतो आणि तिच्या नादानें गारुड्याच्या माकडाप्रमाणें नाचतो; ९३ जसा एकादा लोभी स्वतःला शिणवतो, मित्रांची मने मोडतो, पण, कवडी कवडी जमवतो, ९४ तसा जो दानपुण्यांत हिंपुटेपणा करतो, गोवळ्याला फसवतो, परंतु आपल्या स्त्रीची मात्र भर करतो, तिला रतिभरही उणें पडूं देत नाहीं. ९५ ● आराध्य देवतांची कांहीं समजूत करतो, गुरुजींना थापा मारून चकवतो, आणि आईबापांनाही नकारघंटाच वाजवतो, ९६ परंतु जां, जी जी उत्कृष्ट वस्तु पाहील, ती ती स्त्रीच्या उपभोगासाठी वाटेल तो खर्च करून पैदा करती; ९७ ज्याप्रमाणं प्रेमळ भक्त आपले कुळदैवत भजतो, त्याप्रमाणें जो स्त्रीची उपासना करतो; ९८ अस्सल आणि चांगलें जें जें असेल, तें तें जो स्त्रीकरितां राखून ठेवतो, पण इतरांची नुसती समजूतही करीत नाहीं ; ९९ माझ्या स्त्रीला कोणी पाहील, किंवा हिला कोणी विरोध करील, तर जगबूडच होईल, असें जो मानतो; ८०० नायटे १ दैवयोगानें.