पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१० सार्थ श्रीज्ञानेश्वरी जें न घ्यावें । स्पर्शे जेथ न लागावें । आंग मन ॥ ७४ ॥ न जावें तेथ जाये । न पहावें तें जो पाहे । न खावें तें खाये । तेवींचि तोपे ॥ ७५ ॥ न धरावा तो संगु । न लगावें तेथ लागु । नाचरावा तो मार्ग | आचरे जो ॥ ७६ ॥ नायकावें तें आइके । न वोलावें तें बके । परि दोप होतील हैं न देखे | प्रवर्ततां ॥ ७७ ॥ अगा मनासि रुचावें । येतुलेनि कृत्याकृत्य नाठवे । जो करणेयाचेनि नांवें । भलतेंचि करी ॥ ७८ ॥ परि पाप मज होईल । कां नरकयातना येईल । हैं कांहींचि पुढील । देखेना जो ॥ ७९ ॥ तयाचेचि आंगलगें । अज्ञान जगीं दाटुगें । जें सज्ञानाही संगें । झोंवों सके ॥ ७८० ॥ परी असो हें आइक । अज्ञानचिन्हें आणिक । जेणें तुज सम्यक | जाणवे तें ॥८१॥ तरी जयाची प्रीति पुरी । गुंतली देखसी घरीं । नवगंधकेसरीं । भ्रमरी जैसी ॥ ८२ ॥ साकरेचिया राशीं । बैसली नुठे माशी । तैसेनि स्त्रीचित्त आवेशी । जयाचें मन || ८३ || ठेला बेडूक कुंडीं । मशक गुंतला शेंबुडीं । जैसा ढोरु सबुडबुडीं । रुतला पंकीं ॥ ८४ ॥ तैसें घरींहून निघणें । नाहीं जीवें मनें प्राणें । जया साप होऊनि असणें । भाटी तिये ॥ ८५ ॥ प्रियोत्तमाचिया कंठीं । प्रमदा घे आटी । तैशी जीवेंसी कोंपटी | धरूनि ठाके ॥ ८६ ॥ मधुरसोद्देशें । मधुकर जचे जैसें । गृहसंगोपन तैसें । करी जो गा ॥ ८७ ॥ शरीर व मन हीं जेथें शिरूं नये तेथें शिरतात, जं घेऊ नये तें मागतात, आणि ज्याला चुकूनही लागूं नये त्याला मुद्दाम शिवतात; ७४ जो जेथें जाऊं नये तेथे जातो, जें पाहूं नये तें पहातो, आणि जें खाऊं नये तें खाऊन त्यांतच आनंद मानतो; ७५ जो धरूं नये असा संग धरतो, चिकटू नये अशाला चिकटतो, आणि जाऊं नये अशा मार्गाला जातो; ७६ जो अश्राव्य ऐकतो आणि अवाच्य बोलतो, परंतु या आचरणांतील दोष मात्र जाणत नाहीं; ७७ अर्जुना, केवळ मनाला रुचते, इतक्याचसाठीं जो, तें कृत्य आहे कीं अकृत्य आहे याचा तिळमात्रही विचार न करतां, 'कर्तव्य' नांव देऊन, भलतंच कर्म करतो; ७८ पण, 'मला पाप घडेल किंवा पुढे नरकयातना भोगाव्या लागतील, ' हें जो मुळींच पहात नाहीं; ७९ अशा पुरुषाच्या संगतीनें अज्ञान या जगांत इतकें बलिए होतें, कीं तें ज्ञानी लोकांबरोबरही दोन हात करू शकते. ७८० परंतु हें पुरे; आतां अज्ञानाची तंतोतंत ओळख पटावी म्हणून आणखी कांहीं चिह्नं सांगतों, तीं ऐक. ८१ वासाच्या परागांत जशी भृंगी, तशी ज्याची प्रीति घरसंसारांत गुंतलेली आढळते; ८२ साखरेच्या ढिगावर बसलेली माशी जशी उठत नाहीं, त्याप्रमाणे ज्याचं मन स्त्रीची मर्जी संभाळून राहातं; ८३ जमा बेडूक पाण्याच्या टाकींत अडकून राहतो, किंवा चिलट शेंबडांत गुंतून पडते, किंवा ढोर थलथलीत. चिखलांत रुतून जातें, ८४ त्याप्रमाणे ज्याचा जीव, मन, व प्राण हीं घराच्या गुंत्यांतून बाहेर पडूंच शकत नाहींत; जसा साप माळजमिनींत धरणें धरून बसतो, तसा जो घरांत डांबून राहतो; ८५ एकादी स्त्री जशी आपल्या प्राणनाथाच्या कंठाभोंवतीं मिठी मारून बसते, तसा जो जीवें भावें आपल्या राहत्या खोपटीला धरून बसतो; ८६ मध मिळविण्याच्या उद्देशानें जसा भुंगा सारखा खपत असतो, तसा जो घरसंसार संभाळण्यासाठीं सारखा ताज्या