पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५०९ वृद्धाप्यतेची | संज्ञा ये मरणाची । परि जया तारुण्याची | भुली न फिटे ॥ ६२ ॥ तो अज्ञानाचें घर । हें साचचि घे उत्तर । तेवींचि परियेसी थोर । चिन्हें आणिक || ६३ || तरि वाघाचिये अडवे । एक वेळ आला चरोनि दैवें । तेणें विश्वासें पुढती धांवे | वसू जैसा ॥ ६४ ॥ कां सर्पधराआंतु । अवचटें ठेवा आणिला स्वस्थ । येतुलियासाठी निश्चितु । नास्तिक होय ।। ६५ ।। तैसेंचि अवचटें हैं। एकदोनी वेळां लाहे । एथ रोग एक आहे । हैं मानीना जो ॥ ६६ ॥ वैरिया नीद आली । आतां दंड़ें माझीं सरलीं । हें मानी तो सपिलीं । मुकला जेवीं ॥ ६७ ॥ तैसी आहारनिद्रेची उजरी । रोग निवांतु जोंवरी । तंव जो न करी । व्याधिचिंता ॥ ६८ ॥ आणि स्त्रीपुत्रादिमेळे । संपत्ति जंव जंब फळे | तेणें रजें डोळे । जाती जयाचे ॥ ॥ ६९ ॥ सवेंचि वियोगु पडेल । विळौनि विपत्ति येईल । हें दुःख पुढील । देखेना जो ॥ ७७० ॥ तो अज्ञान गा पांडवा । आणि तोही तोचि जाणावा । जो इंद्रियें अव्हासवा । चारी एथ ॥ ७१ ॥ वयसेनि जेवायें | संपत्तीचेनि साँवायें । सेव्यासेव्य जाये । सरकटितु ॥ ७२ ॥ न करावें तें करी । असंभाव्य मनीं धरी । चिंतूं नये तें विचारी । जयाची मति ॥ ७३ ॥ रिघे जेथ न रिघावें । मागे म्हातारपणाचीं लक्षणें अंगावर दिसूं लागलीं असतांही ज्याचा तारुण्याचा भ्रम दूर होत नाहीं; ६२ तो पुरुष अज्ञानाचें माहेरघर समजावा. अर्जुना, आणखीही अज्ञानाचीं कांहीं ठळक चिह्नं ऐक. ६३ वाघाच्या रानांत चरून सुदैवानें बचावून आल्यावर जसा विश्वासाच्या धिटाईनें पोट पुन्हां त्या रानांत शिरतो; ६४ किंवा सर्पाच्या बिळांतून एकदा द्रव्याचा ठेवा, सर्पदंश न होतां आणला, म्हणून जसा ठेवा आणणारा मनुष्य 'त्या बिळांत सापच नाहीं ' किंवा ' असला तर तो चावत नाहीं, ' असें म्हणूं लागतो; ६५ त्याप्रमाणेच एकदोनदां कुपथ्य करून आपले शरीर सुस्थित आहे, असें पाहून जो रोगाचें अस्तित्व मान्य करीत नाहींसा होतो; ६६ वैरी निजला आहे, ' म्हणून आतां माझं वैर आणि त्यापासून होणारी संकटे हीं संपलीं, ' असें म्हणून स्वस्थ राहणारा प्राणी जसा आपल्या पिलांसकट प्राणांना मुकतो; ६७ त्याप्रमाणे आहार व निद्रा हीं व्यवस्थित चालत असल्यामुळे जोपर्यंत रोगाचा पगडा बसला नाहीं, तोंपर्यंत जो रोगाविषयीं निश्चिन्त असतो; ६८ आणि स्त्री, पुत्र, इत्यादिकांच्या परिवारासह जो जो संपत्तीपासून अधिकाधिक विषय संपादित होतात, तों तों त्या धुळीनें जो अधिकाधिक आंधळा होतो: ६९ यांचा एकदम वियोग घडेल आणि एका क्षणांत आपत्तीचा घाला पडेल, हें भावी दुःख ज्याला दिसत नाहीं; ७७० अर्जुना, असा जो पुरुष तो केवळ अज्ञान होय. आणि तोही पुरुष अज्ञानच होय, जो इंद्रियांना विषयांचे अन्न अवाच्या सव्वा भरवितो; ७१ जो तारुण्याच्या आवेशाने आणि संपत्तीच्या संगतीनें, सेव्य किंवा असेव्य न पाहतां, सरसकट भरकटत जातो; ७२ ज्याचें मन जें करूं नये तें करतें, जं असंभवनीय आहे त्याची आशा धरतं, आणि जें विचारांतही आणूं नये त्याचें चिंतन करते; ७३ १ आवेशाने २ संगतीनें,