पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५०८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी 1 अधिकाधिकें । मरण आयुष्यातें जिंके । मीठ जेविं उदकें । घांसिजत असे ||७५० ।। तैसें जीवित्व जाये । तयास्तव काळु पाहे । हें हातोहातींचें न होये । ठाउ जया || १ || किंबहुना पांडवा । हा आंगींचा मृत्यु नित्य नवा । न देखे जो मावा । विपयांचिया ॥। ५२ ।। तो अज्ञानदेशींचा रावो । या वोला महाबाहो । न पडेगा ठावो । आणिकांचा || ५३ || पैं जीविताचेनि तोखें । जैसा कां मृत्यु न देखे | तैसाचि तारुण्ये पोखे । जरा न गणी || ५ || कडाडीं लोटिला गाडा । कां शिखरौनि सुटला धोंडा । तैसा न देखे जो पुढां । वार्धक्य आहे ।। ५५ ।। कां आडघोहळा पाणी आलें । कां जैसें म्हैमयाचे जुंझ मातलें । तैसें तारुण्याचें चढलें । भुररें जया || ५६|| पुष्टि लागे विघरों । कांति पाहे निसरों । मस्तक आदरी शिरो । भागीं कंप ॥ ५७ ॥ दाढी साउळ घरी | मान हालौनि वारी । तरी जो करी । मायेचा पैसु ॥ ५८ ॥ पुढील उरी आदळे । तंव न देखे जेविं आंधळें । कां डोळ्यांवरील निगळें । आळशी तोपे ॥ ५९ ॥ तैसें तारुण्य आजिचें । भोगितां वृद्धाप्य पाहेचें | न देखे तोचि साचें । अज्ञानु गा ॥ ७६० || देखे अक्षमें कुजें । कीं विटा लागे फुंजे । परि न म्हणे पाहें माझें । हेंचि भवे ॥ ६१ ॥ आणि आंगीं आयुष्यावर अधिकाधिक पडते; जसें मीठ पाण्याने धुपून जाते, ७५० तसें जीवित धुपून चाललें आहे, आणि मरण जवळ येत आहे, ही प्रत्यक्ष गोष्ट ज्याला कळत नाहीं ; ५१ सारांश, अर्जुना, ज्याला अंगाला निरंतर डकलेला मृत्यु विषयांच्या भुलीनें दिसत नाहीं; ५२ तो पुरुष अज्ञानाच्या राज्याचा अधिपति आहे याविषयीं भिन्न मतें असणें संभवत नाहीं. ५३ आणि जसा जीविताच्या सुखभरांत मृत्यूचा आठव होत नाहीं, तसाच जो तारुण्याच्या तोऱ्यांत म्हातारपण हिशोबांत घेत नाहीं; ५४ कड्यावरून लवंडलेला गाडा किंवा डोंगराच्या माथ्यावरून घसरलेला धोंडा, पुढें काय आहे ते पहात नाहीं, तसा जो वृद्धदशा लक्षांत आणीत नाहीं; ५५ किंवा जसें आडरानांतल्या ओहळाला पाणी चढावे किंवा टोणग्यांची झुंज लागावी, म्हणजे ते सैरावैरा भरकटू लागतात, तसा जा तारुण्याच्या मदानें बेताल होतो; ५६ अंग तुटत जातें, तेज कमी कमी होऊं लागतें, मस्तक थरथर लटलटतं, ५७ दाढी पिकते, मान डळमळते, तरीही जो मायेचा पसारा मांडीतच असतो; ५८ पुढे असलेली वस्तू उरावर आदळेपर्यंत जसें आंधळ्याला तिचं भान होत नाहीं, किंवा डोळ्यावर आलेल्या गुंगीनें जसा आळशाला आनंदच वाटतो, ५९ तसे आजचे तारुण्य भोगीत असतां, ज्याला उद्यांचं वृद्धपण दिसत नाहीं; अर्जुना, असा पुरुष म्हणजे मूर्तिमंत अज्ञान होय. ७६० कोणी अशक्त किंवा कुबडा पाहिला म्हणजे जो दिमाखाने त्याला वेडावू लागतो, पण पुढें आपली अवस्था अशीच होणार, हे ज्याला समजत नाहीं; ६१ आणि मरणाची सूचना देणारीं १ पांढरेपणा,