पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५०७ कांहीं वाटलें । नाहीं जया || ३६ || आणि पैं तयाचि परी । जीविताची फरारी । देखोनि जो न करी । मृत्युचिंता ॥ ३७ ॥ जिणेयाचेनि विश्वासें । मृत्यु एक एथ असे । हैं जयाचेनि मानसें । मानिजेना ||३८|| अल्पोदकींचा मासा । हें नाटे ऐसिया आशा । न वचेचि कां जैसा । अगाध डोहां ॥३९॥ कां गोरीचिया भुली । मृग व्याधा दृष्टि न घाली । गळुन पाहतां गिळिली | उंडी मीनें ॥ ७४० || दीपाचिया झगमगा । जाळील हैं पतंगा । नेणवेचि पैं गा । जयापरी ॥ ४१ ॥ गव्हारु निद्रासुखें । घर जळत असे तें न देखे | नेणतां जेवीं विखें | रांधिलें अन्न ॥ ४२ ॥ तैसा जीविताचेनि मिपें । हा मृत्युचि आला असे । हें नेणेचि राजसें । सुखें जो गा ॥ ४३ ॥ शरीरींचि वाढी । अहोरात्रांची जोडी । विषयसुखप्रौढी । साचचि मानी ||४४ || परि बापुडा ऐसें नेणे । जें वेश्येचें सर्वस्व देणें । तेंचि तें नागवणें । रूप एथ ॥ ४५ ॥ संवचोराचें साजणें । तेंचि तें प्राण घेणें । लेपा स्नपन करणें । तोचि नाशु ॥ ४६ ॥ पांडुरोगें आंग सुटलें । तें तयाचि नांवें खुंटलें । तैसैं नेणें भुललें । आहारनिद्रा ॥४७॥ सन्मुख शूला । धांवतया पायें चपळा । प्रतिपदीं ये जवळा । मृत्यु जेवीं ॥ ४८ ॥ तेवं देहा जंव जंव वादु । जंव जंव दिवसांचा पवाडु | जंव जंव सुरवाडु । भोगांचा हा ॥ ४९ ॥ तंव तंव याचा जो विचारही करीत नाहीं ; ३६ आणि तसाच या आयुष्याच्या भरभराटींत ज्याला मरणाचा आठव होत नाहीं; ३७ 'आपण जीवंत आहों आणि असेच राहणार,' अशा भरंवशानें ज्याच्या मनाला मृत्यूचं अस्तित्वही पटत नाहीं; ३८ लहानशा डबक्यांतला मासा जसा 'हें कधींच आटणार नाहीं, ' असें म्हणून खोल डोहांत जात नाहीं, किंवा गाण्याला भुलून हरिण जसें पारध्याला पाहण्याचे विसरतें, किंवा गटाकडे लक्ष न देतां मासा जसा आमिपाला गिळतो; ३९, ७४० दिव्याची लखलख पाहिली, म्हणजे हा आपल्याला जाळील याची जाणीव जशी पतंगाला राहात नाहीं, ४१ घर जळत असतांही जसा मूर्ख मनुष्य निजून राहतो, किंवा अजाणानें जसें विषाबरोबर अन्न शिजवावें, ४२ त्याप्रमाणे " जीविताच्या निमित्तानें हा मृत्यूचाच घाला माझ्यावर आला आहे.” असें जो राजस सुखांत मग्न होऊन जाणत नाहीं ; ४३ जो रात्रंदिवस शरीरच कमावतो आणि विषयसुखाचें वैभव खरें मानतो; ४४ परंतु ज्या बिचाऱ्या मूढाला कळत नाहीं, कीं, वेश्येनें आपल्याला सर्वस्व अर्पण करणें म्हणजेच आपला नाश आहे, ४५ ठकाची मैत्री म्हणजेच प्राणघेणी आहे, भिंतीवर रंगाने काढलेल्या चित्राला स्वच्छ करण्यासाठी धुणें म्हणजेच त्याचा नाश करणें आहे, ४६ आणि पांडुरोगानें आंग थुलथुलीत होणें म्हणजे अंग नष्ट होणेंच समजावें, तसेंच जो आहारनिद्रेला भुलून निर्बुद्ध होतो; ४७ समोर असलेल्या सुट्टाकडे धांवणाऱ्याला जसा प्रत्येक पावलागणीक मृत्यु जवळ जवळ ओढवतो, ४८ तसा जों जों देह वाढतो, जसे जसे अधिकाधिक दिवस लोटतात, जसाजसा विषयभोगाचा सुकाळ होत जातो, ४९ तों तों मरणाची छाया