पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५०६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी व्युत्पत्तिअहंकारु । तपोज्ञानें अपारु | ताठा चढे ॥ २४ ॥ अंत्यु राणिवे बैसविला । आरें धारणु गिळिला । तैसा गर्ने फुगला | देखसी जो ।। २५ ।। जो लाटणें ऐसा न लवे | पाथरु तेविं न द्रवे । गुणियासि नांगवे । फोर्बेसें जैसें ।। २६ ।। किंबहुना तयापासीं । अज्ञान आहे वाढीसीं । हें निकरें गा तुजसीं । बोलत असों ॥। २७ ॥ आणीकही धनंजया । जो गृहदेहसामग्रिया । न देखे कॉलचेया । जन्मातें गा ॥ २८ ॥ कृतघ्ना उपकार केला । कां चोरा व्यवहारु दिधला । निसर्ग अस्तविला । विसरे जैसा ||२९|| वोढाळितां लाविलें । तें तैसेंचि कान पूंस वोलें । कीं पुढती ओढां आलें । जैसें ॥ ७३० ॥ वेडूक सापाचिया तोंडीं । जातसे सबुडबुडीं । तो मक्षिकांचिया कोडी | स्मरेना कांहीं ॥ ३१ ॥ तैसीं नवही दारें स्रवती । आंगीं देहाची लुती जिती। जेणें जाली तें चित्तीं । सलेना जया ॥ ३२ ॥ मातेच्या उदरकुहरीं । पचूनि विष्टेच्या दारीं । जठरीं नवमासवरी | उकडला जो ॥ ३३ ॥ ते गर्भीची जे व्यथा । कां जें जालें उपजतां । तें कांहींचि सर्वथा । नाठवी जो ॥ ३४ ॥ मलमूत्रपंकीं । जें लोळतें बाळ अंकीं । तें देखोनि जो न थुंकी । त्रासु नेघे ॥ ३५ ॥ कालचि ना जन्म गेलें । पाहेच पुढती आलें । ऐसें हें दूध 'जसें विष बनतें, २३ तसा जो सद्गुणी असून मत्सरी आहे, ज्ञानी असून अहंकारी आहे, आणि ज्याला आपल्या तपाचा व ज्ञानाचा अपरंपार गर्व चढला आहे; २४ अंत्यज राज्यावर बसविला, किंवा आराने खांब गिळला, म्हणजे ते जसे फुगतात, तसा जो गर्वानें फुगलेला आढळतो; २५ लाटण्याप्रमाणेच जो लवत नाहीं, धोंड्याप्रमाणेंच कधीं द्रवत नाहीं, आणि, जसें फुरसें मांत्रिकाला आराठत नाहीं, तसा जो कोणत्याही गुणी माणसाच्या धाकांत राहात नाहीं; २६ अर्जुना, थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे जो पुरुष असा असतो, त्याच्या ठिकाणीं अज्ञान नेहमीं चढतेंवाढतें असतें, हें मी तुला निश्चयाने सांगतों. २७ आणखी, अर्जुना, जो या घराची व शरीराची सर्व प्रकारें जोपासना करतो, परंतु मागील किंवा पुढील जन्माचा कधींच विचार करीत नाहीं ; २८ कृतघ्न मनुष्यावर केलेला उपकार, चोराच्या स्वाधीन केलेला पैका, किंवा निलाजऱ्या मनुष्याची केलेली कानउघाडण ( हीं जशीं केवळ फुकट जातात, २९ ओढाळपणानें घरांत शिरल्यामुळें कान व शेपूट कापून हांकून लावलेले कुत्रे, कानाशेपटाचें रक्त सुकण्यापूर्वीच पुन्हां ओढाळपणा करीत घरांत शिरतें, ७३० सापाच्या तोंडांत सपशेल जात असतांनासुद्धां जसा बेडूक माशांना पकडण्याकरितां जीभ बाहेर काढतोच कीं नाहीं, ३१ त्याप्रमाणे सर्व नऊ इंद्रियांचीं द्वारं सारखी पाझरत असल्यामुळे अंगाला जी लूत लागली आहे, तिनंही ज्याला खेद होत नाहीं ; ३२ आईच्या पोटाच्या गुहेत मळाच्या दादयांत जो नऊ महिनेपर्यंत उकडला, पण त्या गर्भावस्थेतील दुःख किंवा जन्मास येतांना घडलेले कष्ट, जां कधींच आठवीत नाहीं: ३३,३४ मळमूत्राच्या चिखलांत मुलांना लोळतांना पाहून जो थुंकत नाहीं आणि कंटाळत नाहीं; ३५ कालच मागचा जन्म गेला आणि उद्यांच पुढचा जन्म येणार १ अंत्यज २ खांब, मेढ, ३ मांत्रिकास ४ फुरसे, ५ मागच्या व पुढच्या ६ निलाजरा. ७ पुच्छ, शेपूट,