पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५०५ तों न चासे । विपयांसि जो ॥ १२ ॥ जाण तयाच्या ठायीं । अज्ञानासि पारु नाहीं । आतां आणि कांहीं । चिन्हें सांगों ।। १३ ।। तरि देह हाचि आत्मा । ऐसेया जो मनोधर्मा । वळघोनियां कर्मा | आरंभु करी ॥ १४ ॥ आणि उणें कां पुरें । जें जें कांहीं आचरे । तयाचेनि आविष्करें | कुंथों लागे ॥ १५ ॥ डोइये ठेविलेनि भोजें । देवलविसें जेवीं फंजे । तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले ।। १६ ।। म्हणे मीचि एक आथीं । माझ्याचि घरीं संपत्ति | माझी आचरती रीति । कोणा आहे ॥ १७ ॥ नाहीं माझेनि पाडे वाड | मी सर्व एकचि रूढ | ऐसा गर्वतुष्टिगंड | घेऊनि ठाके ॥ १८ ॥ व्याधि लागलिया माणुसा । न येचि भोग दाऊं जैसा । निकें न साहे जो तैसा । पुढिलांचं ॥ १९ ॥ पैं गुणु तेतुला खाय । स्नेह की जाळितु जाय । जेथ ठेविजे तेथ होय । मसीऐसें ॥ ७२० ॥ जीवनें शिंपिला तिडिपिडी । वीजिला प्राण सांडी । लागला तरी काडी । उरों नेदी ॥ २१ ॥ आळुमाळ प्रकाशु करी । तेतुलेनीच उवारा धरी । तैसिया दीपाचिया परी । सुविद्य जो ॥ २२ ॥ औषधाचेनि नांवें अमृतें । जैसा नवज्वरु आउँथे । कां विपचि होऊनि परते | सर्पा दूध || २३ || तैसा सद्गुणीं मत्सरु | 16 विषयांना मुळींच कंटाळत नाहीं; १२ अर्जुना, त्या पुरुषाच्या अज्ञानाला सीमाच नाहीं, असें समज. आतां, अज्ञानाचींच कांहीं आणखी लक्षणें सांगतों. १३ देह हाच आत्मा असा भाव धरून जो कर्माला आरंभ करतो; १४ आणि तो जें कांहीं उणें पुरें आचरतो, त्याचा आविष्कार करून जो हर्षार्पानें धुसपुसूं लागतो; १५ डोक्यावर देवाची प्रतिमा ठेवतांच जसा भगत अवसर चढून ताठ होतो, तसा विद्या व तारुण्य यांच्या योगानें जो ताठून उताणा चालूं लागतो; १६ आणि म्हणतो, माझ्या जोडीचा कोणीच नाहीं. संपत्तिमान् काय तो एकटा मीच. माझ्याइतकें उत्तम आचरण दुसऱ्या कोणाचे तरी आहे काय ? १७ माझ्यासारखा थोर कोणीच नाहीं, मी सर्वज्ञ आहे, मी म्हणेन तेंच सर्वत्र मान्य होते. " अशा प्रकारें ज्याला गर्वाची व स्वतःबद्दलच्या समाधानाची फुगवटी चढते; १८ व्याधिग्रस्त माणसाला जसा कोणताही भोग सहन होत नाहीं तसें ज्याला दुसऱ्याचें बरें पाहवत नाहीं. १९ जसा दिवा गुण ( म्हणजे सुताची वात) खातो आणि स्नेह (म्हणजे तेल ) जाळतो. आणि जेथे ठेवावा तेथे ममी मात्र उत्पन्न करतो, तसा जो गुण ( म्हणजे चांगल्या भावना ) न करता, स्नेहाला ( म्हणजे प्रेमाला ) जाळतो, आणि जिकडे तिकडे दुःखाची काजळी माजवती; ७२० दिव्यावर पाणी उडवले तर तो तडतडतो, वारा घातला तर विझतो, पण कोठे सहज लागला तर घराची राखरांगोळी करून काडीही राहू देत नाहीं, तसा जो कांहीं केल्या समजुतीस येत नाहीं, उलट कांगावा करता आणि संधि सांपडतांच दुसऱ्याचा घात करण्यास चुकत नाहीं; २१ दिवा थोडाच उजेड देतो, परंतु तेवढ्याच उजेडानें भारी कढत होतो, तसा जो येवढ्याशा विद्येनें केवट असह्य होतो; २२ औषध म्हणून दूध घेतलें तर जसा नवज्वर विकोपाला जातो, किंवा सर्पाला पाजलेले १ बाहुले, प्रतिमा २ भगत ३ दुधाने, ४ विकोपास जातो. ६४