पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५०४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी बीकं आलें । वांणसियेचें उंभविलें । कोण न रिंगे ॥ १ ॥ तैसें जयाचें अंतःकरण । तयाच्या ठायीं संपूर्ण । अज्ञानाची जाण । ऋद्धि आहे ॥ २ ॥ आणि विषयांची गोडी । जो जीतु मेला न संडी । स्वर्गीही खावया जोडी । एथूनी ||३|| जो अखंड भोगा जये । जया व्यसन काम्यक्रियेचें । मुख देखोनि विरक्ताचें । सचैल करी || ४ || विपो शिणोनि जाये । परि न शि सावधु नोहे । कुहिला हातीं खाये । कोढी जैसा ॥ ५ ॥ खरी टेंको नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडें । तम्ही जेविं न काढे । माघौता खरु ॥६॥ तैसा जो विषयांलागीं । उडी घाली जळतिये आगीं । व्यसनाचीं आंगीं । लेणीं मिरवी ॥ ७ ॥ फुटोनि पडे तंव । मृग वाढवी हांव । परि न म्हणे ते माव | रोहिणीची ||८|| तैसा जन्मोनि मृत्यूवरी । विपयीं त्रासितां बहुत परी । तही त्रास नेघे धरी । अधिके में || ९ || पहिलिये बाळदशे । आई बा हेंचि पिसें । तें सरे मग स्त्रीमांसें | भुलोनि ठाके ॥ ७१० ॥ मग स्त्री भोगितां थावो । वृद्धाप्य लागे येवों । तेव्हां तोचि प्रेमभावो | वाळकासि आणी || ११ || आंधळे व्यालें जैसें । तैसा वाळें परिवसे । परी जीवें मरे 1 म्हणजे तें वाटेल त्यानें लुटावें, किंवा वाण्याच्या उघड्या दुकानांत वाटेल त्याने शिरावें, १ त्याप्रमाणे ज्याचें अंतःकरण असतें, त्याच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या अज्ञानाची समृद्धि आहे, हें लक्षांत घे. २ आणि जो जिता, मेला, कसा असला तरीही विषयवासना सोडीत नाहीं, स्वर्गात विषय भोगावयास मिळावे म्हणून त्याची इहलोकींच सिद्धता करून ठेवतो; ३ जो नेहमीं विषयभोगांची जपणूक करतो, ज्याला सकाम कर्मे आचरण्याचाच सदाचा नाद, आणि जो विरागी मनुष्याचे दर्शन झाल्याबरोबर विटाळ मानून सचैल स्नान करतो; ४ विषय जरी त्याला कंटाळले, तरी, जसा महारोगी सडणाऱ्या हातांनींच अन्न खातो, तसा जो विषयांना सेवतांना कधीही कंटाळत नाहीं, आणि आपल्या कल्याणाविषयीं सावध होत नाहीं; ५ गाढवी स्पर्शही करूं देत नाहीं, लाथा मारमारून नाकाडें फोडते, तरीपण गाढव कांहीं मागें म्हणून सरत नाहीं, ६ तसा जो विषयलाभाकरितां जळत्या आगींतही उडी टाकतो आणि नाना प्रकारच्या व्यसनांचीं कुडतीं अलंकाराप्रमाणें मिरवतो; ७ छाती फुटून जाईपर्यंत हरिण पाण्याच्या लालचीनें धांवत सुटतो, परंतु हे जळ नव्हे, मृगजळाची माया आहे, असें त्याचे मनांत कधीही येत नाहीं, ८ तसा उपजल्यापासून मरेपर्यंत विषयांनी नानापरींनीं पीडिलें असतांही जो विषयांचा कंटाळा न करता, उलट त्यांना प्रेमाने कवटाळतो; ९ प्रथामारंभी बाळपणीं आईबापाचे वेड असतें तें वेड सरतें आणि मग स्त्रीदेहाच्या भुलींत गुंततो; ७१० . मग स्त्रीसंगतींत कालक्रमणा करतां करतां वृद्धदशा डोकावूं लागते, तेव्हां मग मुलांचं वेड लागते. ११ मांजरी, कुत्री, इत्यादींचं आंधळे उपजलेले पार अशी मुरकुंडी मारून राहातं, तसा जो मुलांबाळांमध्ये मुरकुंडी मारून राहतो, परंतु मरपर्यंत १ तेज, २ वाण्याचे उपड़े दुकान,