पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला २५ आपुलें | जाणावें लागे ॥ ३६ ॥ हें ऐसें कैसें करावें । जे आपुले आपण मारावे । जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट ||३७|| हां जी मार्गी चालतां । पुढां सिंह दिसे अवचिता । तो चुके तंव चुकवितां । लाभु आथी ॥ ३८ ॥ असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ कवणु देवा | लाभु सांगें ॥ ३९ ॥ कां समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणी एका कवळूनि । जाळूं सके ॥ ४० ॥ तैसे दोप हे मूर्त । आंगी वीजों असती पाहात । हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें ॥ ४१ ॥ ऐसें पार्थ तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं । या कल्मपाची थोरी । सांगेन तुज ॥ ४२॥ कुलक्षये प्रणश्यंति कुलधर्माः सनातनाः । धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्माभिभवत्युत ॥ ४० ॥ सम० - कुलक्षयचि बुडती कुलधर्मपरंपरा । धर्मनाशं सर्व कुळ अधर्मा वश्य होतसे ॥ ४० ॥ आर्या-बुडती कुलक्षयानें कुळिचे प्राचीन धर्म हे सारे । धर्माच्या नाशाने न शिरे वंशीं अधर्म कैसा रे ॥४०॥ ओवी - ज्या वंशी कुलक्षय झाला । त्याचा कुळधर्म बुडाला । धर्म गेलियावरी कुळा । पाप अवश्य होतसे ॥४०॥ जैसें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे । तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥ ४३ ॥ तैसा गोत्रींचि परस्परें । जरी वधु घडे मत्सरें । तरी तेणें महादोपें घोरें । कुळचि नाशे ॥ ४४ ॥ म्हणऊनि एणें पापें । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मचि आरोपे । कुळामाजी ॥ ४५ ॥ अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यति कुलस्त्रियः । स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ॥ ४१ ॥ सम० - अधर्माच्या बळें कृष्णा दुष्टा होती कुलखिया । त्यांच्या दोष वृष्णिनाथा होतसे वर्णसंकर ॥ ४१ ॥ आर्या - शिरुनी अधर्म कृष्णा वंशींच्या दूषित स्त्रिया करितो । वनिता दूषित होतां होतो उत्पन्न वर्णसंकर तो ॥४१॥ ओवी - कृष्णा अधर्म झालियावरी । दुष्ट होती कुळाच्या नारी । अधर्म चाल लियावरी । वर्णसंकर होतसे ॥४१॥ तेथ सारासार न विचारावें । कवणें काय आचरावें । आणि विधि- पाहिलेच पाहिजे. ३६ आपणच आपला गोतावळा मारावा, असें कृत्य आम्हीं कसें करावें ! जाणूनबुजून उघड्या डोळ्यांनीं काळकूट विष प्यावें काय ? ३७ अहो, वाटेने जात असतां, जर एकदा सिंह पुढे आडवा आला, तर बाजूला सरून त्याला चुकविण्यांतच लाभ आहे. ३८ देवा, आयता प्रकाश सोडावा आणि अंधाऱ्या कूपांत शिरावें, यांत सांगा बरें कोणता लाभ आहे तो ? ३९ अथवा समोर आग दिसत आहे, पण जर तिला टाळून आपण गेलों नाहीं, तर ती एका क्षणांत आपल्यास व्यापून जाळूं शकेल. २४० त्याप्रमाणेच, हे प्रत्यक्ष दोप आपल्या अंगावर कोसं पहात आहेत, ही गोष्ट कळत असतांही या कृत्याला आम्हीं कसें सज्ज व्हावें ? " ४१ अशा प्रकारें बोलून, अर्जुन त्या वेळी आणखी म्हणाला, "देवा इकडे लक्ष असूं द्या. हें पाप किती भयंकर आहे, तं आतां सांगतो. ४२ जसे लांकडावर लांकूड घांसावें, म्हणजे थोडासा विस्तव होतो, पण तोच भडकून सर्व लांकडे जाळतो, ३४ तसाच एक गोत्रोत्पन्नांमध्ये जेव्हां दुष्टाव्याने एकमेकांचा घात केला जातो, तेव्हां त्या भयंकर महापातकाने सर्वच कुछ नम्र होते, ४४ म्हणून, या पापकृत्यानें कुलधर्म लोपून जाईल, आणि मग कुलामध्यें अधर्म बोकाळेल. ४५ अशी स्थिति झाली असतां, बरेवाईटाचा विचार होणं शक्यच नसतें, कोणीही कांहींतरी करावें, १ पई, कोसळूं. ४