पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५०३ वाधणाचिया परी । जो आश्रो केहींचि न धरी । क्षेत्रीं तीथीं परीं । थारों नेणें ॥ ८९ ॥ कां मातलिया सरडा । पुढती वूड पुढती शेंडा | हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥ ६९० ॥ जैसा रोविल्याविणें । रांजणु थारों नेणे । तैसा पडे तैं राहणें । एन्हवीं हिंडे ।। ९१ ॥ तयाच्या ठायीं उदंड । अज्ञान असे वितंड | जो चांचल्यें भावंड | मर्कटाचें ॥ ९२ ॥ आणि पैं गा धनुर्धरा । जयाचिया अंतरी । नाहीं वोढौवारा । संयमाचा ।। ९३ ।। लेडिये आला लोंढा । न मनी वाळवेचा वैरंडा । तैसा निपेधाचिया तोंडा । विहेना जो ॥ ९४॥ व्रतातें आड मोडी । स्वधर्मु पायें वोलांडी । नियमांची आस तोडी । जयाची क्रिया ।। ९५ ।। नाहीं पापाचा कंटाळा | नेणे पुण्याचा जिव्हाळा | लाजेचा पेंडवळा | खाणोनि घाली ॥ ९६ ॥ कुळेंसीं जो पाठिमोरा । वेदाज्ञेसी दुन्हा | कृत्याकृत्यव्यापारा । निवाडु नेणे ॥ ९७ ॥ वसू जैसा मोकाटु | वारा जैसा अफाटु । फुटला जैसा पाटु । निर्जनींचा ॥९८॥ आंधळे हातिरूं मातलें । कां डोंगरी जैसे पेटलें । तैसे विपयीं सुटलें । चित्त जयाचे ॥ ९९ ॥ पैं उर्धे काय न पडे । मोकाटु कोणा नातुडे | ग्रामद्रारींचें आडें । नोलांडी कोण || ७०० ॥ जैसें सत्रीं अन्न जालें । कां सामान्या होतो; ८८ वादळाप्रमाणें जो कोठेही ठाम राहात नाहीं, क्षेत्रांत, तीर्थात किंवा कोणत्याही नगरांत राहणें ज्याच्या कधीं मनांतही येत नाहीं; ८९ किंवा माजलेला सरडोका जसा झाडाच्या बुंध्यापासून शेंड्याकडे आणि शेंड्याकडून बुंध्याकडे फुकट धांवपळ करीत असतो, तसे ज्याचे सारखे निष्फळ हिंडणवारे चाललेले असतात; ६९० जसा बिनबुडाचा रांजण पुरल्याशिवाय स्थिर राहात नाहीं, तसा जो पडला तरच राहतो, नाहींतर एकसारखी भ्रमन्ती करतो; ९१ त्याच्या ठिकाणी अज्ञान अगदीं भरपूर सांचलेलें असतें. माकडासारखा तो चंचल आहे; ९२ आणि, अर्जुना, ज्याच्या अंतःकरणाला निग्रहाचा जोर नसतो; ९३ ओढ्यामध्यें पाण्याचा लोंढा लोटला म्हणजे त्याला जशी वाळूच्या बांधाची क्षिति वाटत नाहीं, तसा जो निषेधाच्या दर्शनानें भयभीत होत नाहीं; ९४ जो आपल्या आचाराने व्रताला खंडित करतो, स्वधर्माला लाथाडतो, आणि यमनियमांना निराश करतो; ९५ ज्याला पापाचा कंटाळा नसतो आणि पुण्याचा लळा नसतो; लाजेची वेल तर जो मूळापासूनच खणून उपटतो; ९६ जो आपल्या कुळपरंपरेला जुमानीत नाहीं, वेदाज्ञेला जो दूरच राखतो, आणि कृत्य काय व अकृत्य काय याचा कधीं निर्णय जाणत नाहीं; ९७ जो पोळासारखा उनाड, वान्यासारखा अफाट, आणि निर्जन जागतल्या पाटासारखा सैरावैरा नाचणारा असतो; ९८ आंधळा हत्ती जसा चवताळावा, किंवा डोंगरांत जसा वणवा भडकावा, तसे ज्याचें चित्त विषयांमध्यें ताळतंत्र सोडून भरकटत असतें; ९९ अरे उकिरड्यावर काय टाकले जात नाहीं ? उनाद ढोराला कोण पकडतो ? गांववेशीचा उंबरठा कोण ओलांडीत नाहीं ? ७०० जसें अनसत्रांतलं अन्न कोणीही खावें, किंवा वेश्येला तारुण्यतेज आलें १ वावटळाप्रमाणे २ घरवैव ३ वलंडा, बांध, धरण. ४ उकिरड्यावर.