पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५०२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जो गुरुतल्पगाचा । नामीं जाला ॥ ७६ ॥ हा ठायवरी । तया नामाचें भय हरी | मग म्हणे अवधारीं । आणिके चिन्हें ॥ ७७ ॥ तरी आंगें कर्मै ढिला । जो मनें विकल्पें भरला । अडवींचा अवगळला । कुहा जैसा ॥ ७८ ॥ तया तोंडीं कांटिवडें । आंतु नुसधी हाडें । अशुचि तेणें पाडें । सवाह्य जो ॥७९॥ जैसें पोटालागीं सुणें । उघडें झांकलें न म्हणे । तैसें आपलें परावें नेणें । द्रव्यालागीं ॥। ६८० ॥ इया ग्रामसिंहानिया ठायीं । जैसा मिळणी ठावो अटावो नाहीं । तैसा स्त्रीविपयीं कांहीं । विचारीना ॥ ८१ ॥ कर्माचा वेळ चुके | कां नित्य नैमित्तिक ठाके । तें जया न दुखे । जीवामाजीं ॥ ८२ ॥ पापीं जो निर्मुगु । पुण्याविषयीं अति निलागु । जयाचिया मनीं वेगु । विकल्पाचा ॥ ८३ ॥ तो जाण निखिळा । अज्ञानाचा पुतळा । जो बांधोनि असे डोळां । वित्ताशेतें ॥ ८४ ॥ आणि स्वार्थे अळुमाळें । जो धैर्यापासोनि चळे । जैसें तृणवीज ढळे | मुंगियेचेनि ॥ ८५ ॥ पावो सुदलिया सवें । जैसे थिल्लर कालवे । तैसा भयाचेनि नांवें । गजवजे जो ॥ ८६ ।। मनोरथांचिया धारेसा । वाहणें जयाचिया मानसा । पूरी पडिला जैसा । दुधिया पाहीं ॥ ८७ ॥ वायूचेनि साँवायें । धूं दिगंतरा जाये । दुःखवार्ता होये । तैसें जया ॥ ८८॥ नाहींसा होईल. ७६ आजयंत गुरुद्रोह्याच्या नामोच्चाराने जेवढे पाप घडलें असेल, तेवढे सर्व या गुरुभक्ताच्या नामोच्चारानें साफ धुऊन टाकलें जाईल. असो. आतां अज्ञानाची दुसरीं लक्षणें श्रवण करा. ७७ जो आचरणांत डळमळीत असून नेहमीं संशयानें बुजबुजलेला असतो; रानांतल्या अमंगळ आडाच्या तोंडांत जसे कांटेकुटे भरलेले असतात आणि आंत केवळ हाडें सांचलेलीं असतात, त्यासारखा जो आंतबाहेर निव्वळ घाणेरडा आहे; ७९ ज्याप्रमाणें पोटानें वखवखलेला कुत्रा उघडें झांकलें न म्हणतां जें मिळेल त्यावर ताव देतो, त्याप्रमाणें जो द्रव्य मिळण्याच्या लोभानें आपलें कीं दुसऱ्याचें याचा विचारच करीत नाहीं; ६८० जसा कुत्र्यांना नीति- अनीति हा विचार नसतो, तसा जो अविचारानें वाटेल तेथें रममाण होतो; ८१ कर्तव्यकर्माची वेळ चुकली किंवा नित्यनैमित्तिक कर्मे करण्याची राहिली, तरी ज्याच्या मनाला तिळमात्रही दुःख होत नाहीं; ८२ ज्याला पापाचाराची लाज वाटत नाहीं, पुण्याची ज्याला मुळींच चाड नाहीं, आणि ज्याच्या चित्तांत संशय नेहमीं सळसळत असतो; ८३ तो स्पष्ट अज्ञानाचा पुतळा समजावा. ज्याची नजर नेहमीं धनप्राप्तीवर आहे; ८४ आणि, मुंगीच्या धक्क्यानंही जशीं गवतांचीं बीजें गळतात, त्याप्रमाणें जो एवढ्याशा स्वार्थानें धैर्यापासून चळतो; ८५ आणि पाय पडल्याबरोबर जसें डबकें ढवळून जातें, तसा जो भयाचें नांव ऐकिल्याबरोबर थरारून जातो; ८६ पुरांत पडलेला दुध्याभोपळा जसा वाहात जातो, तसा जो मनोरथांच्या लोंढ्याबरोबर मनाने वाहटीला लागतो; ८७ वाऱ्याबरोबर जशी धूळ दूर दिशेला जाते, तसा जो दुःखवार्तेनें परदेशी १ निलाजरा. २ धारेबरोबर. ३ संगतीनें,