पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ५०१ तैसा संयोगवियोगें । चढे वोहटे ॥ ६५ ॥ पडली वारयाचिया घोळसां । धुळी चढे आकाशा । हरिखा वळघे तैसा । स्तुतीवेळे ॥ ६६ ॥ निंदा मोटकी आइके । आणि कपाळ धरूनि ठाके । थें विरे वारेनि शोखे | चिखल जैसा ॥ ६७ ॥ तैसा मानापमानी होये । जो कोण्हीचि ऊर्मी न साहे । तयाच्या ठायीं आहे । अज्ञान पुरें ॥ ६८ ॥ आणि जयाचिया मनीं गांठी । वरिवरी मोकळी वाचा दिठी । आंगें मिळे जीवें पाठी । भलतया दे ||६९॥ व्याधाचें चारा घालणें । तैसें प्रांजळ जोगावणें । चांगांची अंतःकरणें । विरु करी ॥ ६७० ॥ गार शेवाळें गुंडाळली । कां निंबोळी जैसी पिकली । तैसी जयाची भली । वाह्यक्रिया ॥ ७१ ॥ अज्ञान तयाचिया ठायीं । ठेविलें असे पाहीं । या बोला आन नाहीं । सत्य मानीं ॥ ७२ ॥ आणि गुरुकुळें लाजे । जो गुरुभक्ती उभजे । विद्या घेऊनि माजे । गुरुसींचि जो ॥ ७३ ॥ तयाचें नाम घेणें । तें वाचे शूद्रान्न होणें । परि घडलें लक्षणें । बोलतां इयें ॥ ७४ ॥ आतां गुरुभक्ताचें नांव घेवों । तेणें वाचेसि प्रायश्चित्त देवों | गुरुसेवका नांव पावों । सूर्य जैसा ।। ७५ ।। येतुलेनि पांगु पापाचा । निस्तरेल हे वाचा | असतें, किंबहुना तो अज्ञानाचा गड्डाच जाणावा, कारण त्याचें जिणें निव्वळ हिंसामय असतें: ६४ आणि जसा वारा आंत भरला म्हणजे भाता फुगतो आणि दावला म्हणजे चिंबतो, तसा संयोग - वियोगानें जो अनुकमें चढतो किंवा खंगतो; ६५ वाऱ्याच्या सोसाट्यांत सांपडलेली धूळ जशी आकाशांत उडते, तसा कोणी स्तुति केली असतां जो आनंदानें चढून जातो; ६६ परंतु जराशी निंदा कानी पडली, म्हणजे जो कपाळाला हात लावून बसतो; चिखल पाण्याच्या थेंबानें भिजतो आणि वाऱ्याने सुकतो, तशी अवस्था ज्याची मानापमानानें होते; म्हणजे ज्याला कोणताही मनोविकार सहन होत नाहीं; त्याच्या अंगीं पुरतें अज्ञान आहे, असें समजावें. ६७, ६८ आणि जो आंतल्या गांठीचा आहे; जो वरवर मोकळेपणाने बोलतो व पाहतो, आणि एकाला आलिंगन देऊन, दुसऱ्यालाच अंतःकरणापासून मदत करतो; ६९ मृगादिक जनावरांना मारण्याच्या इराद्यानें जसा पारधी त्यांना मोह घालण्यासाठीं चारा पसरतो, तसा जो दिखाऊ साळसूदपणाने कळकळ दाखवून भल्या माणसांचीं अंतःकरणें आपलीं अंकित करतो; ६७० शेवाळीनें गुंडाळलेली गार किंवा पिकून पिवळी धमक झालेली निंबोळी, ह्यांच्यासारखी ज्याची दिखाऊ वृत्ति मोठी भली सुधी असते; त्याच्या ठिकाणीं अज्ञान नांदत असतें, यांत लेशमात्र संशय नाहीं. ७१, ७२ आणि ज्याला गुरुकुळाची लाज वाटते, गुरुभक्तीचा ज्याला कंटाळा आहे, जो गुरूपासून विद्या संपादन करून उलट त्याच्याशींच माजोरीपणा करतो; ७३ त्याचें नांव वाचेनें घेणें म्हणजे जिभेनें शूद्रान्न चाखण्यासारखें आहे; परंतु हीं लक्षणें सांगतांनां तें उच्चारणं भागच पडलें ! ७४ आतां गुरुभक्ताचें नांव घेऊन या दूषित जिभेला प्रायश्चित्त देतों, कारण गुरुभक्ताचें नांव सूर्याप्रमाणें जिकडे तिकडे प्रकाशाचा विस्तार करतें. ७५ या एवढ्याच प्रायश्चित्तानं या वाणीचा गुरुद्रोही मनुष्याच्या नामोच्चाराने घडलेल्या पापाचा भार १ सोसाय्यति. २ पाहो, प्रकाश करते,