पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५०० शि.प्र. म. सार्थ श्रीज्ञानेश्वरी जाणवे धनंजया ज्ञान नव्हे तें अपैसा | अज्ञानचि ॥ ५४ ॥ पाहें पां दिवस आघवा सरे । मग रात्रीची वारी उरे । वांचूनि कांहीं तिसरें । नाहीं जेवीं ॥५५॥ तैसें ज्ञान जेथ नाहीं । तें अज्ञानचि पाहीं । तरी सांगों कांहीं कांहीं । चिन्हें तियें ॥ ५६ ।। तरि संभावने जिये । जो मानाची वाट पाहे । सत्कारें होये । तोषु जया ॥ ५७॥ गर्दै पर्वताची शिखरें । तैसा महत्त्वावरूनि नुतरे । तयाचिया ठायीं पुरें । अज्ञान आहे ॥ ५८ ॥ आणि स्वधर्माची मांगळी | बांधे वाचेच्या पिंगळीं । उभिला जैसा देउळीं । जाणोनि कुंचा ॥ ५९ ॥ घाली विद्येचा पसारा । सुये सुकृताचा डांगोरा । करी तेतुलें मोहरा । स्फीतीचिया ॥ ६६० || आंग वरिवरी चर्ची । जनातें अभ्यर्चितां वंची । तो जाण पां अज्ञानाची | खाणी एथ ।। ६१ ।। आणि वन्ही वनीं विचरे । तेथ जळती जैसी जंगमेंस्थावरें । तैसें जयाचेनि आचारें । जगा दुःख ॥। ६२ ।। कौतुकें जें जें जल्पे । सावंळाहूनि तीख रुपे । विपाहूनि संकल्यें । मारकु जो ॥ ६३ ॥ तयातें बहु अज्ञान । तो अज्ञानाचें निधान । हिंसेसि आयतन । जयाचें जिणें ॥ ६४ ॥ आणि फुंकें भाता फुगे । रेचिलिया सवेंचि उफगे । अज्ञान म्हणजे काय हें सहज कळतें, कारण, अर्जुना, जें 'ज्ञान' नव्हे, तें आपोआपच 'अज्ञान' ठरते. ५४ अरे, दिवस सरला म्हणजे रात्रीचीच पाळी उरते, तेथें जसें तिसरें कांहींच असणें शक्य नाहीं; ५५ तसें जेथें ज्ञान नाहीं, तें अज्ञानच समज; तरी पण अज्ञान ओळखण्याचीं कांहीं ठळक ठळक लक्षणे कथन करतों. ५६ जो मोठेपणाकरितां जगतो, जो मानाला टपून बसलेला असतो, आणि आदरसत्कार झाला असतां ज्याला संतोष होतो; ५७ पर्वतांच्या शिखरांप्रमाणें जो ताठ्यानं मोठ्या पदवीवरून कधींही खालीं उतरत नाहीं, त्याच्या ठिकाणीं अज्ञानाची समृद्धि आहे, असें जाण. ५८ मांग लोक जशीं मोळाच्या दोरीला पिंपळाची पाने बांधून तिचें तोरण वेशीवर टांगतात, तसा जो आपल्या दानादिक पुण्यकर्माचं तोरण भरघोंस शब्दांनीं सजवून उभारतो; जो जाणून बुजून देवळांतल्या खराट्याच्या दांड्यासारखा ताठ उभा असतो; ५९ जो आपल्या विद्येचें देव्हारं माजवतो, आपल्या पुण्यकृत्यांचा डांगोरा पिटतो, आणि प्रत्येक गोष्ट केवळ लौकिक कीर्तीसाठी करतो; ६६० जो देहाचा दिखाऊ थाटमाट नीट करतो, पण आपल्या नादीं लागणाऱ्या लोकांना फशीं पाडतो, तो अज्ञानाची खाणच आहे, असें जाणावें. ६१ आणि वणवा रानांत पसरू लागला म्हणजे प्राणी व वनस्पस्ति यांना जसा दाह सोसावा लागतो, तसें ज्याच्या आचरणापासून जगाला दुःख भोगावें लागतें; ६२ ज्याचें सहज बोलणेही पहारीपेक्षां अधिक वचतं आणि आपल्या गर्भित हेतूनें जो विषापेक्षांही जास्त घातक होतो; ६३ त्याच्या अंगीं अज्ञान विपुल १ मोळाच्या गवताची दोरी. २ पहारेपेक्षा,