पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४९९ लागो कां अनुघडी । सुखाच्या दिवसकोडी । गणिजतु कां ॥ ४१ ॥ पूर्णचंद्रमी राती । युग एक असोनि पाहाती । तरि काय न पाहत आहाती । चकोर ते ॥ ४२॥ तैसें ज्ञानाचें बोलणें । आणि येणें रसाळपणें । आतां पुरे कोण म्हणे आकर्णितां ॥ ४३ ॥ आणि सभाग्य पाहुणा ये । सुभगाचि वाढती होये । तैं सरों नेणें रससोये । ऐसें आथी ॥ ४४ ॥ तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानीं आम्हांस लागु । आणि तुजही अनुरागु । आथि तेथ ॥ ४५ ॥ म्हणोनि यया वाखाणा । पासीं से आली चौगुणा । न म्हणों न येसी देखणा । होसी ज्ञानी ॥ ४६ ॥ तरी आतां ययावरी । प्रज्ञेच्या माजघरीं । पढ़ें साच करीं । निरूपणीं ॥ ४७ ॥ या संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदा । माझेंही जी ऐसें । मनोगत ॥ ४८ ॥ यावरी आतां तुम्हीं । आज्ञापिला स्वामी | तरि वायांचि वाग्मी | वाढों नेदीं ॥ ४९ ॥ एवं इयें अवधारा । ज्ञानलक्षणें अठरा | श्रीकृष्ण धनुर्धरा । निरूपिलीं ॥। ६५० ॥ मग म्हणे या नांवें । ज्ञान एथ जाणावें । हें स्वमत आणि आघवे । ज्ञानियेही म्हणती ॥५१॥ करतळावरी वाटोळा । डोलतु देखिजे आंवळा । तैसें ज्ञान आम्ही डोळां । दाविलें तुज ॥५२॥ आतां धनंजया महामति । अज्ञान ऐसी वदंती । तेही सांगों व्यक्ति । लक्षणेंसीं ॥ ५३ ॥ ए-हवीं ज्ञान फुडें जालिया । अज्ञान सुखाचे कोट्यवधि दिवस लाभले, तर 'हे संपणार तरी केव्हां ' अशा विचाराने ते कोणी मोजीत का बसतात ? ४१ पौर्णिमेची रात्र जरी एक सबंध युगभर टिकली, तरी चकोरपक्षी तिच्याकडे सारखी टक लावून पहात बसणार नाहींत काय ? ४२ त्याप्रमाणेच ज्ञानाचा विषय आणि असलें रसाळ निरूपण, हीं ऐकावयाला सांपडली असतां, 'पुरे, बोवा आतां, ' असें कोणी तरी म्हणेल का ? ४३ अरे भाग्यवान् पाहुणा आला आणि वाढणारी सुग्रण आहे, असा योग जुळला म्हणजे जसे जेवण कितीही लांबले तरी थोडेंच वाटतं; ४४ त्यासारखाच आजचा प्रसंग आहे, कारण, आधींच आम्हांला ज्ञानाची लालसा आणि त्यांत तुला निरूपणाची हौस ! ४५ म्हणून या कथेविषयीं आमचे अवधान चौपट वाढले आहे; म्हणून तूं ज्ञानद्रष्टा आहेस, असे म्हटल्यावांचून आम्हांस राहवत नाहीं. ४६ आतां आपल्या बुद्धीच्या माजघरांत शिरून तिच्या प्रभावानें यापुढील 'अज्ञानं यदतोऽन्यथा, ' ह्या पदाचें यथास्थित निरूपण कर, पाहूं." ४७ हें संतजनांचं वचन ऐकून मी निवृत्तिदास ज्ञानदेव म्हणालो, "महाराज, माझेही मनांत हेंच आहे. ४८ तशांत तुम्हां समर्थ संतांचीही तशीच आज्ञा झाली आहे. तरी आतां उगाच वक्तृत्व वाढवीत नाहीं. ४९ आतां, अशा प्रकारें ज्ञानाची अठरा लक्षणं श्रीकृष्णांनी अर्जुनाला निवेदन केलीं. ६५० मग देव म्हणाले, " या लक्षणांनी ज्ञान जाणावें, असें आमचें मत आहे आणि सर्व ज्ञानिजनांचेंही असेंच मत आहे. ५१ ज्याप्रमाणं तळहातावर डोलणारा आंवळा स्पष्ट पहातां येतो, तसेंच ज्ञानही तुला स्पष्ट दिसेल असें आम्हीं तें स्पष्टपणे दाखविलें आहे. ५२ आतां, अर्जुना, ज्याला 'अज्ञान' म्हणतात, तेंही तुला मी त्याच्या लक्षणांसह सांगतों. ५३ खरें पाहिलें, तर ज्ञानाचें खरें स्वरूप समजल्यावर अज्ञान