पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४९८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी दाविलें ज्ञेय देखे । तैसेनि उन्मेखें । आथिला जो || ६३० || जेवढी ज्ञानाची वृद्धि | तेवढीच जयाची बुद्धि । तो ज्ञान हैं शाब्दी । करणें न लगे ॥ ३१ ॥ पैं ज्ञानाचिये प्रभेसवें । जयाची मति ज्ञेयीं पावे । तो हातधरणिया शिवे । परतत्त्वातें ॥ ३२ ॥ तोचि ज्ञान हें बोलतां । विस्मयो कवण पांडुसुता । काय सवितयातें सविता । म्हणावें असे ॥ ३३ ॥ तंव श्रोते म्हणती असो । न सांग तयाचा अतिसो । ग्रंथोक्ति तेथ आइसो । घालिसी कां ॥ ३४ ॥ तुझा हाचि आम्हां धोरु । वक्तृत्वाचा पोहुणेरु । जे ज्ञानविपो फारु । निरोपिला ॥ ३५ ॥ रसु होआवा अतिमान्नु । हा घेतासि कविमंत्र । तरी अवंतृनि शत्रु । करितोसि कां गा ॥ ३६ ॥ ठायीं वैसतिये वेळे । जे रससोय घेऊनि पळे । तियेचा येरु वोर्डेवु मिळे । कोणा अर्था || ३७ ॥ आघवांचि विषीं भाँदी । परि सांजवणी टेकों नेदी । ते खुरतोडी नुसधी । पोसी कवण ||३८|| तैसी ज्ञानीं मति न फांके | येर जल्पती नेणों कौतुकें । परि तें असो निकें । केलें तुवां ॥ ३९ ॥ जया ज्ञानलेशोद्देशें । कीजती योगादि सायासें । तें धणीचें आणि तुझिया ऐसें । निरूपण । ६४० ॥ अमृताची सातवांकुडी | दाखविलेलें परतत्त्व दिसते; ६३० आणि परमात्मतत्त्वाला पाहण्याइतकें ज्याचे ज्ञान मोठें आहे त्याची बुद्धीही तितकीच मोठी असते; मग तो पुरुष ज्ञानस्वरूप होतो, हे उघड शब्दांनी सांगितलेंच पाहिजे असें नाहीं. ३१ खरोखरच, ज्ञानतेजाबरोबर ज्याची बुद्धि ज्ञेयवस्तूला येऊन भेटते, तो आत्मतत्त्वाला प्रत्यक्ष हस्तस्पर्शच करतो. ३२ मग अर्जुना, अशा पुरुषाला प्रत्यक्ष ज्ञानच म्हटलें, तर त्यांत नवल काय ? अरे, सूर्य म्हणजे सूर्य ह्याचें काय स्पष्टीकरण करावें लागतें ? " ३३ या संधीस श्रोते म्हणाले, “अरे, या विषयाची आतां लांबण लावू नको. उगीच ग्रंथनिरूपणांत हा आडफांटा कशाला घालतोस ? ३४ तूं ज्ञानविषय मोठ्या विस्ताराने सांगितलास, हा तुझ्या वाग्विलासाचा पाहुणचार आम्हांस पुष्कळ झाला. ३५ रसाळपणाची रेलचेल असावी, हा कवि- जनांचा मंत्र तूं घेतला आहेस, तर मग आम्हांला आमंत्रण देऊन, आमचा ऐन प्रसंगी हिरमोड करून आम्हांला शत्रु करण्याचा अविचार तूं कसा करतोस ? ३६ पानावर बसण्याच्या वेळेला जी सुग्रण शिजविलेले अन्न घेऊन पळून जाते, तिनें इतर रीतीने केलेला आदरसत्कार काय कामाला येणार ? ३७ सर्व गोष्टींत चांगली आहे, पण संध्याकाळी दूध काढतांना जी ओटीखाली बसूंही देत नाहीं, ती लाथाळ गाय नुसती कोण बरं पोसील ? ३८ त्याप्रमाणे बुद्धीचा ज्ञानांत फैलाव न झाल्यामुळे दुसरे निरूपणकार कांहीं तरी भलभलतें बरळतात तें समजतही नाहीं. परंतु हें जाऊं द्या. तुझं निरूपण मात्र फारच चांगले झाले. ३९ ज्या ज्ञानाचा एक कण तरी लाभावा म्हणून योगसाधनादिकांचे कष्ट करतात, तें ज्ञानच मूळचें समाधानकारक, आणि तशांत तुझ्यासारखे रसाळ निरूपण ! मग काय सांगावें ? ६४० अमृताच्या पावसाचें सातारें बसलें, तर त्यांत वाईट काय ? १ पाहुणचार. २ आदरसत्कार. ३ चांगली.