पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ૪૨૭ दे अध्यात्मज्ञानी बुडी । सद्भावाची ॥ १८ ॥ भंगलिये वाटे । शोधूनियां अव्हांटे | निघिजे जेविं नीटें । राजपंथें ॥ १९ ॥ तैसें ज्ञानजातां करी । आघवेंचि एकीकडे सारी । मग मन बुद्धि मोहरी । अध्यात्मज्ञानीं ॥। ६२० ।। म्हणे एक हेंचि आधी । येर जाणणें ते भ्रांति । ऐसी निकरेंसी मति । मेरु होय ॥ २१ ॥ एवं निश्चयो जयाचा । द्वारीं अध्यात्मज्ञानांचा | ध्रुवदेवो गगनींचा । तैसा राहिला ।। २२ ।। तयाचिया ठायीं ज्ञान । या बोला नाहीं आन । जे ज्ञानीं वैसलें मन । तेव्हांच तो तें ॥ २३ ॥ तरि वैसलेपणें जें होये । तें वैसतांचि वेळीं नोहे । तरि ज्ञाना तया आहे । सरिसा पाडु ॥ २४ ॥ आणि तत्त्वज्ञान निर्मळ | फळे जें एक फळ । ते ज्ञेयही वरी सरळ । दिठी जया ॥ २५ ॥ ए-हवीं वोधा आलेनि ज्ञानें । जरी ज्ञेय न दिसेचि मनें । तरि ज्ञानलाही न मने । जाहला सांता ॥ २६ ॥ आंधळेनि हातीं दिवा | घेऊनि काय करावा । तैसा ज्ञाननिश्वयो आघवा । वायांचि जाय ॥ २७ ॥ जरी ज्ञानाचेनि प्रकारों । परतत्त्वीं दिठी न पैसे । ते स्फूर्तीचि असे | अंध होउनी || २८ || म्हणोनि ज्ञान जेतुलें दावी । तेतुली वस्तुचि आघवी । ते देखे ऐसी व्हावी । बुद्धि चोख ॥ २९ ॥ यालागीं ज्ञानें निदेखें | देत नाहीं, आणि केवळ निर्मळ भावनेनें अध्यात्मज्ञानांत निमग्न होतो; १८ वाट चुकली असतां, आडवाट सोडून नीट राजमार्गाला जसें लागावें, १९ तसें ह्या इतर ज्ञानांना बाजूस सारून जो आपली बुद्धि अध्यात्मज्ञानांत समोर चालवितो; ६२० जो मनांत म्हणतो, “ हें एकच सत्य आहे; इतर कोणत्याही विषयाचे ज्ञान म्हणजे निव्वळ भ्रम. " असें म्हणून जो अशा निश्चयानें मेरुपर्वताप्रमाणं आपल्या मनांत स्थिर होतो; २१ अशा रीतीनें, आकाशांतील भुवनक्षत्राप्रमाणें ज्याचा निश्चय अध्यात्मज्ञानाच्या दारांत अचळ राहलेला आहे: २२ त्याच्या ठिकाणी ज्ञान वसतें, या वचनाला कधीही बाध येणार नाहीं, कारण जेव्हां त्याचें मन ज्ञानांत स्थिर झालें, तेव्हांच तो ज्ञानस्वरूप झाला, असें समजावें. २३ आतां बसल्यावर कांहीं काटानें जें घडावयाचें तें बसल्यावरोवर क्षणांत घडत नसतें, हें खरें; तरीपण पुरुषाची मति ज्ञानांत स्थिर झाल्याबरोबर त्याला जी स्थिति येते, ती जवळ जवळ पूर्ण ज्ञानवंतासारखीच असते. २४ शिवाय, शुद्ध तत्त्वज्ञानाचें जें एकत्र फळ असतें तें फळ म्हणजे ज्ञेय वस्तु त्याला सरळ दिसूं लागते, २५ नाहीं तर, ज्ञानबोध झाला असतांही जर मनाला ज्ञेय दिसलें नाहीं, तर ज्ञानलाभ झाला असेंसुद्धां मानतां येत नाहीं. २६ आंधळ्याने हातांत दिवा घेतला, तर त्याचा काय उपयोग ? तसेच जर यदी पडलें नाहीं, तर सगळा ज्ञाननिश्चय फुकटच गेला, असं समजलें पाहिजे. २७ जर ज्ञानाच्या प्रकाशानं परमात्मतत्त्व हीला भेटलं नाहीं, तर ती ज्ञानस्फूर्तींच मुळीं आंधळी ठरते. २८ म्हणून, ज्ञान जे जे दाखवील तें तें परमात्मवस्तुस्वरूपानेच दिसावे, इतका निर्मळपणा बुद्धीला आला पाहिजे. २९ म्हणून अशा प्रकारची निर्मळ स्फूर्ति ज्याला झाली आहे, त्याला निर्दोष ज्ञानानें ६३