पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४९६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ६ ॥ रिगतां वल्लभापुढें । नाहीं आंगीं जीवीं सांकडें । तिये कांतेचेनि पाडें । एकसरला जो ॥ ७ ॥ मिळोनि मिळतच असे । समुद्री गंगाजळ जैसें । मी होऊनि मज तैसें | सर्वस्वें भजती ||८|| सूर्याचां होणां होइजे । कां सूर्यासवेंचि जाइजे । हैं विकलेपण साजे । प्रभेमि जेवीं ॥ ९ ॥ पें पाणियाचिये भूमिके | पाणी तळपे कौतुकें । ते लहरी म्हणती लौकिकें । एन्हवीं तें पाणी ॥। ६१० ॥ जो अनन्यु यापरी । मी जाहलाही मातें वरी । तोचि तो मूर्तधारी । ज्ञान पैं गा ॥ ११ ॥ आणि तीथ धौतें तटें । तपोवनें चोखटें। आवडती कपाटें । वसवं जया ॥ १२ ॥ शैलकक्षांची कुहरें । जळाशयपरिसरें । अधिष्ठी जो आदरें | नगरा न ये ॥ १३ ॥ बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदाची खंती । जाण मनुष्याकारें मूर्ति । ज्ञानाची तो ॥ १४ ॥ आणिकही पुढती | चिन्हें गा सुमति । ज्ञानाचिये निरुती - । लागीं सांगों ॥ १५ ॥ अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् । एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ॥ ११ ॥ सम० --अध्यात्मबोधीं नित्यत्व जर्डी ज्ञानार्थ पाहणें । हीं ज्ञानसाधनें यांचीं उलटीं अलक्षणें ॥ ११ ॥ आर्या - अध्यात्मज्ञानरती तत्वज्ञानार्थदृष्टि है ज्ञान । कथिलें तुज म्यां पार्था जें या व्यतिरिक्त तेंचि अज्ञान ॥ ११ ॥ ओवी - अध्यात्म तत्पर होणं । तत्वज्ञानें विषयांतें नेमणें । जाणिवेचें जें जाणणें । उलटीं अज्ञानलक्षणें ॥ ११ ॥ तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे । तें जया दिसे । ज्ञानास्तव ॥ १६ ॥ तें एकवांचूनि आनें । जिये भवस्वर्गादि ज्ञानें । तें अज्ञान ऐसा मनें | निश्चय केला ||१७|| स्वर्ग जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी । माझ्या सन्निध असल्यामुळें जो आमच्याबरोबरच एका शय्येवर पहुडतो; ६ जसें पतीजवळ जातांना धर्मपत्नीला कांहीं संकट वाटत नाहीं, तद्वत् जो माझ्याकडे खुल्या मनानें येतो; ७ समुद्रांत सर्वस्वीं मिसळून जसें गंगेचे पाणी राहते, तसा जो माझ्या स्वरूपाशीं समरस होऊन सर्वस्वी माझी भक्ति करतो; ८ सूर्याबरोबर उगवावें आणि सूर्याबरोबर मावळावें, असें सूर्याचें अंकितपण जसें सूर्यप्रभेला शोभतं ९ आणि पाण्याच्या पृष्ठभागावर पाण्याला सहज उसळी आली म्हणजे तिला जसे लोक ' लहरी ' म्हणतात, परंतु वास्तविक तें पाणीच असतें; ६१० त्याप्रमाणेंच जो एकनिष्ठ भक्त माझ्याशी एकरूप होऊन मला सेवितो, तो केवळ ज्ञानाचा पुतळा असतो. ११ आणि ज्या पुरुषाला तीर्थे, पवित्र नद्यांची तीरें, शुद्ध तपोवनें, रानांतील गुहा, अशा ठिकाणीं राहण्याची आवड असते; १२ पर्वतांच्या कुशींतील खोरी, व सरोवराकांउंचे प्रदेश, हीं जो मोठ्या आदरानें सेवतो, आणि जो नगराला मुळींच येत नाहीं; १३ ज्याला एकांतवास फार मानवतो आणि मनुष्यवस्तीचा तिटकारा वाटतो, तो पुरुष म्हणजे मानवदेहधारी ज्ञानच होय. १४ अर्जुना, ज्ञानाचें नीट स्पष्टीकरण व्हावे म्हणून तुला आणखी कांहीं लक्षणें कथन करतों. १५ परमात्मा म्हणून जें एकमेवाद्वितीय वस्तु आहे, तें ज्या ज्ञानानें दिसतें, १६ ते एकच खरं ज्ञान, बाकींचीं जीं संसार, स्वर्ग, इत्यादीसंबंधींचीं ज्ञानें, तीं सर्व वस्तुतः अज्ञान होत, असा ज्याच्या मनानें निर्णय केला आहे: १७ स्वर्गज्ञानाला जो तिलांजलि देतो, संसारविषयाला जो कानींही पड़