पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 अध्याय तेरावा ४९५ तुली । आस्था नाहीं ॥ ९५ ॥ साउली सरिसीच असे । परी असे हैं नेणिजे जैसें । स्त्रियेचें तैसें । लोलुप्य नाहीं ॥ ९६ || आणि प्रजा जे जाली । तिये वैस्तीकरें आलीं । कां गोरुवें वैसलीं । रुखातळीं ॥ ९७ ॥ जो संपत्तीमाजीं असतां । ऐसा गमे पांडुसुता । जैसा कां वाटे जातां । साक्षी ठेविला ॥ ९८ ॥ किंबहुना पूंसा । पांजरियामाजी जैसा । वेदाज्ञेसी तैसा । विहान असे ।। ९९ ।। एन्हवी दारागृहपुत्रीं । नाहीं जया मैत्री । तो जाण पां धात्री । ज्ञानासि गा || ६०० || महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षी सरिसे । इष्टानिष्ट तैसें । जयाच्या ठायीं ॥ १ ॥ कां तीन्ही काळ होतां । त्रिधा नव्हे सविता । तैसा सुखदुःखीं चित्ता । भेदु नाहीं ॥ २ ॥ जेथ नभाचेनि पाडें । समत्वा उणें न पडे । तेथ ज्ञान रोकडें । वोळख तूं ॥ ३ ॥ मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी । विविक्तदेश सेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १० ॥ सम० - अद्वैतयोगें मद्रूपीं भक्ति अव्यभिचारिणी । कंटाळणे लोकसभे एकांतीं बसणें सदा ॥ १० ॥ आर्या-पार्था अनन्ययोगें अव्यभिचारी मतीस मम भजनीं । तैसी या जनसंगीं अप्रीति प्रीति पांडवा विजनीं ॥ १० ॥ ओंवी - असाधारण योगेंकरूनी । दृढ भक्ति धरूनी । एकांत स्थळीं बैसोनी । प्रीति नाहीं लोकांठायीं ॥ १० ॥ आणि मीवांचूनि कांहीं । आणीक गोमटें नाहीं । ऐसा निश्चयोचि पाहीं । जयाचा केला ॥ ४ ॥ शरीर वाचा मानस । पियाली कृतनिश्चयाचा कोश | एक मीवांचूनि वास । न पाहती आन ॥ ५ ॥ किंबहुना निकट निज | जयाचें जाहलें मज । तेणें आपणयां आम्हां सेज । एकी केली जातांना लागणाऱ्या झाडाच्या सांवलीचा जितका आपलेपणा वाढावा, तितकाही आपलेपणा ज्याला घराविषयीं वाटत नाहीं ९५ आपली छाया आपल्याबरोबरच असते, पण तिचें स्मरणही आपल्याला नसतें, तशी ज्याला स्त्रियेची लालूच मुळींच नसते, ९६ आणि जीं मुलेबाळें झालीं असतील, ती केवळ वांटेची वाटसरू वस्तीकरितां आलीं आहेत किंवा तीं म्हणजे झाडाच्या छायेखालीं जमलेली गुरांची खिल्लारें आहेत, असें जो समजतो; ९७ अर्जुना, संपत्तीच्या राशीवर लोळत असतांही जो केवळ वाटेने जाणाऱ्या तिन्हाइताप्रमाणें तिचा साक्षीमात्र असतो; ९८ एकंदरीत जसा पिंजऱ्यांतला पोपट तसा जो वेदाज्ञेची मर्यादा संभाळून नीतीनें वागतो, ९९ तथापि जो बायकोमुलांच्याठायीं मायाममतेनें गुंतून जात नाहीं, तो ज्ञानाचें पालन करणारा आहे, असें जाण. ६०० उन्हाळ्यांत किंवा पावसाळ्यांत जसे महासागर सारखेच तुडुंब असतात, त्याप्रमाणें, इष्ट घडो वा अनिष्ट घडो, जो नेहमीं अविकृत राहतो; १ दिवसाचे तीन भाग पडतात, पण सूर्य कांहीं जसा तीन तहांचा होत नाहीं, तसेंच सुखदुःखानें ज्याच्याठायीं भिन्नत्व उत्पन्न होत नाहीं; २ गगनाप्रमाणेच ज्याच्या ठिकाणीं पुरोपूर समभाव बिंबलेला आढळतो, अर्जुना, तेथें ज्ञान रोकठोक राहत आहे, असें तूं ओळख. ३ माझ्यावांचून अधिक चांगलें असें कांहीं एक नाहीं, असा ज्याच्या मनाचा धडा झाला आहे, ४ ज्याचे शरीर, वाणी, आणि मन, हीं या दृढ निश्चयाचें सत्त्व प्यायली आहेत आणि माझ्यावांचून दुसऱ्या कोणाचीही तीं वाट पहात नाहींत, ५ एकंदरींत ज्याचें अतःकरण निरंतर १ मुलेबाळे २ वस्तीला आलेले वाटसरू. ३ गुरें. ४ पोपट.