पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४९४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी तैसें वृद्धाप्य होय । आलेपण तें वायां जाय । जे तो शतंवृद्ध आहे । नेणों कैंचा ॥ ८५ ॥ झाडिलींचि कोळे झाडी । तया न फळे जेविं बोंडी । जाहला अग्नि तरी राखोंडी | जाळील काई ॥ ८६ ॥ म्हणोनि वार्धक्याचेनि आठवें । वार्धक्या जो नागवे । तयाच्या ठायीं जाणावें । ज्ञान आहे ॥ ८७ ॥ तैसेचि नाना रोग । पडिघाती पुढां आंग । तंव आरोग्याचे उपेग । करूनि घाली ॥ ८८ ॥ सापाच्या तोंडीं । पडिली जे उंडी । ते लाऊन सांडी । प्रबुद्ध जैसा ॥ ८९ ॥ तैसा वियोगें जेणें दुःखें । विपत्ति शोक पोखे । तें स्नेह सांडूनि सुखें । उदासु होय ॥ ५९० ॥ आणि जेणेंजेणें कडें । दोप सूतील तोंडें । तया कर्मरंध्री गुंडे | नियमाचे दाटी ॥ ९९ ॥ ऐसऐसिया आइती । जयाची परी असती । तोचि तो ज्ञानसंपत्ती । गोसांवी गा ॥ ९२॥ आतां आणीकही एक । लक्षण अलौकिक । सांगेन आइक | धनंजया ॥ १९३॥ असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु । नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टापपत्तिषु ॥ ९ ॥ सम० - असक्त लिप्त ना होणें पुत्र दार-गृहादिकीं । अनिष्ट इष्टही होतां समचित्तत्व सर्वदा ॥ ९॥ आर्या-सक्त न होतां असणें अलिप्त सर्वत्र दार-सुत-गेहीं । समचित्त नित्य होणें इष्टानिष्टोपपत्ति योगही ॥ ९ ॥ ओवी - स्त्रीपुत्रगृहाचे ठार्थी संगरहित । विषय नाहीं आसक्त । इष्ट-अनिष्टाचे ठायीं चित्त । समचि असे ॥ ९ ॥ तरि जो या देहावरी । उदासु ऐसिया परी । खिता जैसा विढारीं । बैसला आहे ॥ ९४ ॥ कां वृक्षाची साउली । वाटे जातां मीनली । घरावरी वृद्धदशा आली म्हणजे ही शरीरप्राप्ति व्यर्थ होईल, मग तो शतायुषी असला तरी त्यांत काय अर्थ आहे, हे समजत नाहीं. ८५ एकदा झाडल्याने ज्यांतले कण गळून गेले आहेत, अशीं तिळाच्या बोंडांची ताटें पुन्हां झाडलीं तर जसा बोंडांतून कण पडत नाहीं, अग्नि असला तरी तो जसा राखाडी जाळूं शकत नाहीं, तसें, एकदा म्हातारपण आलें म्हणजे शंभर वर्षे आयुष्यही ज्याला आहे त्याच्या हातून कांहींही घडत नाहीं; ८६ म्हणून 'म्हातारपण येणार आहे,' ही आठवण ठेवून जो त्याच्या हातीं न सांपडण्याची युक्ति तरुणपणांतच करतो, त्या पुरुषाच्या ठिकाणीं खरें ज्ञान आहे, असें जाणावें. ८७ तसंच जोपर्यंत नानाप्रकारचे रोग दत्त म्हणून पुढे उभे राहिले नाहींत, तोपर्यंत या निरोगी शरीराचा पुरापुरा उपयोग तो करून घेतो. ८८ सापाने चघळलेली अन्नाची डी जसा शहाणा मनुष्य पार फेंकून देतो, ८९ तद्वत् ज्याच्या वियोगानं दुःखें, संकटें, शोक, यांचं पोषण होतें तें सर्व ऐहिक ममत्व टाकून तो आत्मसुखानें निःस्पृह होऊन राहतो; ५९० आणि ज्याच्या द्वारांनी दोष आपलीं तोंडें आंत शिरकावूं पहातात, त्या त्या कर्माच्या द्वारांत यमनियमाचे गुडदे चिणून तीं साफ बुजवून टाकतो. ९१ अशा प्रकारें जो मोठ्या युक्तीनें व सावधपणाने वागतो, तो एकटाच ज्ञानसंपत्तीचा स्वामी आहे, असें समज. ९२ अर्जुना, आतां तुला आणखी एक लक्षण सांगतों, तें ऐक. ९३ वाटसरू जसा धर्मशाळेंत बसतो, त्याप्रमाणंच जो शरीराविषयीं उदासीन राहतो; ९४ वाटेनें १ शतायुषी. २ तिळांच्या बोंडांची ताटें, ३ प्रासतात. ४ युक्तीने. ५ प्रवासी, वाटसरू,