पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जोडिलास तूं हातींचा । दूरी होसी ॥ २८ ॥ कुळहरणी पातकें । तियें आंगीं जडती अशेखें । तये वेळीं तं कव के | देखावासी ॥ २९ ॥ जैसा उद्याना- माजी अनळु | संचरला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिल । स्थिर नोहे ॥ २३० ॥ का सकर्दम सरोवरु | अवलोकूनि चकोरु | न सेवितु अव्हेरु । करून निघे ॥ ३१ ॥ तयापरी तूं देवा । मज झांकऊं न येसी मावो । जरी पुण्याचा वोलावा | नाशिजैल ॥ ३२ ॥ तस्मान्नार्हा वयं हंतुं धार्तराष्ट्रान्स्वबांधवान् । स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ ३७॥ सम० - यालागी यांस माराया आम्ही योग्य न हों कधीं । होऊं स्वजनहत्येनें सुखीही केवि माधवा ॥ ३७ ॥ आर्या - यास्तव न वधावे म्यां निज बंधू धार्तराष्ट्र हे आत । निजजनघात के सें होइल सुख माधवा मला प्राप्त ॥ ३७ ॥ औत्री - म्हणोनियां नारायणा । न मारी बंधूने जाणा । यांचिया वधूनि प्राणा । सुख कैचं मज माधवा ॥ ३७ ॥ म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाळ बहुती परी । दिसतसे ॥ ३३ ॥ तुजशीं अंतराय होईल । मग सांगें आमचें काय उरेल | तेणें दुःखें हियें' फुटेल । तुजवीण कृष्णा ॥ ३४ ॥ म्हणऊनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती । हे असो मात अघ- ती | अर्जुन म्हणे ॥ ३५ ॥ यद्यप्येते न पश्यंति लोभोपहतचेतसः । कुलक्षयकृतं दोपं मित्रद्रोहे च पातकम् ॥ ३८ ॥ कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् । कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ ३९ ॥ सम• - -ते हैं न पाहति जरी लोनेंकरुनि मूढधी । कुलहत्येंत जो दोष मित्रद्रोहांत पाप जें ॥ ३८ ॥ पापापासूनियां आम्हीं कैसें न परतों हरी । कुलहत्येत जो दोष देखतांही जनार्दना ॥ ३९ ॥ आर्या - जरि है लोभावे पाहीना तो स्वकीयजनघातें । मित्रद्रोहाघातें तैसें दुस्तर कुलक्षयाघातें ॥ ३८ ॥ परि म्यां देवा कैसे पापापासोनियां न परतावें । स्वकुलक्षयदोषं जे कैसें म्यां सत्पथीं न वर्तावें ॥ ३९ ॥ ओव्या - जयावंशीं कुळक्षय झाला । तयाचा कुळाचार बुडाला । हा विचार त्यांहीं सोडिला । मित्रद्रोहेंच पातक ३८ पापापासाव परतिजें । ऐसें आम्हीं काय नेणिजे । कुळक्षय करितां दोष आणि जे। ऐसें आहे केशवा ॥ ३९ ॥ हे अभिमानमदें भुलले । जरी पां संग्रामा आले । तन्ही आम्ही हित निसटून मला दुरावाल ! २८ गोत्रघातानं समस्त पापें माझ्या अंगाला चिकटतील, मग अशा स्थितींत तुम्ही कोणाला कोठे दिसणार ? २९ जसा उपवनांत वणवा धडकलेला पाहून कोकिळ एक क्षणही तेथे ठरत नाहीं, २३० किंवा जसें चिखलट सरोवर पाहून चकोरपक्षी त्याचा स्वीकार करीत नाहीं, तर त्यास झिडकारून चालता होतो, ३१ तसाच, हे देवा, जर माझा पुण्यांचा ओलावा सुकून उन गेला, तर तुम्ही आपल्या मायेची पाखर माझ्यावर घालण्यास येणार नाहीं ! ३२ म्हणून मी हें कर्म आचरणार नाहीं, या युद्धांत शस्त्रही हातीं धरणार नाहीं, कारण हे मला अनेक प्रकारें सदोष वाटत आहे. ३३ देवा, तुमचाच आम्हांला वियोग घडला, मग आमचें काय राहिलें बरें ! बा कृष्णा, त्या दुःखप्रसंगांत तुमच्या वियोगामुळे आमचीं हृदये फुटून जातील ! ३४ म्हणून हे कौरव मारले जावे, आणि मग आम्हीं सुखोपभोग भोगावे, ही गोष्ट केवळ अशक्य आहे ! " असें अर्जुन बोलला. ३५ 66 'हे अभिमानाच्या मदाने धुंद होऊन युद्धाला प्रवर्तले आहेत, तरीपण आम्ही आपले हित १ मायेची पाखर घालण्याला २ आडकाठी, प्रतिबंध, व्यत्यय ३ हृदय, छाती.