पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४९३ ॥ ७३ ॥ स्त्रिया म्हणती विवसी । वाळें जाती मूच्छीं । किंबहुना चिळसी । पात्र होईन ॥ ७४ ॥ उभळीचा उजगरा | सेजियां साइलियां घरा । शिणवल म्हणती म्हातारा । बहुतां हा ॥ ७५ ॥ ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं । देखे मग मनीं । विटे जो गा ॥ ७६ ॥ म्हणे पाहे हें येईल । आणि आतांचं भोगितां जाईल । मग काय उरेल । हितालागी ॥ ७७ ॥ म्हणोनि नाइकणें पावे । तंव आइकोनि घाली आघवें । पंगु न होतां जावें । तेथ जाय ॥ ७८ ॥ दृष्टी जंव आहे । तंव पाहावें तेतुलें पाहे । मूकत्वा आधी वाचा वाहे । सुभाषितें ॥ ७९ ॥ हात होती खुळे । हैं पुढील मोटके कळे । तंव करूनि घाली सकळें । दानादिकें ॥ ५८० ॥ ऐमी दशा येईल पुढें । तैं मन होईल वेडें । तंव चिंतूनि ठेवी चोखडें । आत्मज्ञान ॥८१॥ जैं चोर पाहे झोंवती । तंव आजीचि रुसिजे संपत्ति । कां झांकझांकी वाती । न वचतां कीजे ॥ ८२ ॥ तैसें वार्धक्य यावें । मग जैं वायां जावें । तें आतांचि आघवें । सवतें करी ॥ ८३ ॥ आतां मोडूनि ठेलीं दुर्गे । कां वळित धरिलें खेगें । तेथ उपेक्षूनि जो निघे । तो नागवला कीं ॥ ८४ ॥ जातील. ७३ बायका मला भूत म्हणतील, मुलें मला पाहून घावरींघुवरी होतील; एकंदरीत मी केवळ हिडीसपणाचा विषय होईन ! ७४ कफाचा उमाळा आला म्हणजे मी जें ' खो खो ' करीन, त्यामुळे शेजान्यांची झोप मोडून, ते म्हणतील, कीं, " हा म्हातारा किती जणांना तरी त्रास देणार? " ७५ असो, अशा प्रकारें वृद्धपणाचें भावी लक्षण जो तरुणपणांतच लक्षांत आणतो आणि मग या सर्वांचा मनांत अगदीं वीट घेतो; ७६ जो मनांत म्हणतो, “अखेर अशी किळसवाणी अवस्था या शरीरास येणार आणि आतांचे शरीरभोग भोगून संपणार, मग माझें कल्याण साधण्याला माझ्याजवळ राहाणार तरी काय ? ७७ म्हणून, जोपर्यंत बहिरेपण आलें नाहीं, तोच सर्व कांहीं ऐकावें, आणि पांगळेपण जडलें नाहीं, तोंच जें ठिकाण आपणास गांठावयाचें आहे, तथें जावें; ७८ जोपर्यंत दृष्टि शाबूद आहे, तोंच जेवढे पाहवेल तेवढे पाहावें; बाचा मुकी झाली नाहीं, तोंच गोड भाषण बोलावें, ७९ पुढे हात लुले होणार, हें आपल्यास चुटपुरतें कळलें आहे, तेव्हां तसें होईपर्यंत दानादिक सर्व पुण्यकृत्यें त्यांच्याकडून करवून घेतली पाहिजेत. ५८० अशी हीन अवस्था जेव्हां पुढे येईल, तेव्हां चित्त अगदीं वेडे होऊन जाईल, म्हणून तोंपर्यंतच शुद्ध ज्ञानाचा संग्रह करणें अवश्य आहे, ८१ उद्यां चोर आपली संपत्ति लुटणार आहेत, असें कळलें, तर आजच तिची वासलात लावावी, हें चांगलें. दिव्याची वात विझाली नाहीं तोंच झांकापाक केली पाहिजे; ८२ त्याप्रमाणेच वृद्धपण येईल आणि मग हे सर्व शरीर वायां जाईल, तेव्हां या शरीरापासून निर्लेप राहण्याला आतांच आरंभ करणें, हें योग्य. ८३ किल्ले कोट मोडकळीस आले आहेत किंवा आकाशांत ढगांचे अवडंबर सुरू होऊ पहात आहे, असें दिसत असतांही तिकडे दुर्लक्ष करून जो पुढे पाऊल घालील, त्याचा घात खास होणार, ८४ त्याप्रमाणें १ थोडेसें २ उयो, ३ दगांनी