पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

む अध्याय तेरावा ४९१ ए-हवीं ऐसें घडे । जो जळत घरीं सांपडे । तो मग न पवाडे । कुहा खणों ॥ ४९ ॥ चोढिये पाथरु गेला । तैसेनि जो बुडाला । तो वोंवेहीसकट निमाला | कोण सांगे ॥ ५५० ॥ म्हणोनि समर्थसी वैर । जया पडिलें हाडखाइर । तो जैसा आठही पाहर । परजूनि असे || ५१ || ना तरी केळवली नोवरी। कां संन्यासी जयापरी । तैसा न मरतां जो करी । मृत्युसूचना ॥५२॥ पैंगा जो ययापरी । जन्मेंचि जन्म निवारी | मरणें मृत्यु मारी । आपण उरे ॥ ५३ ॥ तया घरीं ज्ञानाचें । सांकडें नाहीं साचें । जया जन्ममृत्यूचें | निमाले शल्य ॥ ५४ ॥ आणि तयाचिपरी जरा । न टेकतां शरीरा । तारुण्याचिया भरा - | माजीं देखे || ५५ || म्हणे आजिच्या अवसरी । पुष्टि जे शरीरीं । ते पाहे होईल काचरी | वाळली जैसी ||५६ ॥ निदैवाचे व्यवसाय | तैसे ठाकती हातपाय | अमंत्रिया राजाची परी आहे | बळा यया ॥ ५७ ॥ फुलांचिया भोगा - । लागीं प्रेम टांगां । तें करेयचा गुडघा । तैसें होईल ॥ ५८ ॥ वोढाळाच्या खुरीं । आँखाडवातें बुरी । ते दशा माझ्या शिरीं । पावेल गा ।। ५९ ।। पद्मदळेंसी इसाळें । भांडतात हे डोळे । ते होती पडवळें । केव्हांतरी घडणार आहे, हें पक्के समजून तो आजपासूनच सावध राहतो; ४५, ४६, ४७, ४८ नाहीं तर असें घडून येतें, कीं मनुष्य जळत्या घरांत सांपडतो, आणि मग कांहीं त्याला विहीर खणण्याला सवड सांपडत नाहीं; ४९ डोहांत धोंडा पडावा त्याप्रमाणें तो भीतीच्या आरोळ्या ठोकीत गडप होतो, त्याची कोणाला दादही नसते ! ५५० म्हणून ज्याचें बळवानाशीं हाडवैर पडलें आहे, तो जसा आठी प्रहर अगदीं सावधपणें सज्ज राहतो, ५१ अथवा लग्नाचें केव्ळवण झालेली नवरी माहेरच्या वियोगाला आणि संन्यास घेणारा पुरुष संसाराच्या त्यागाला आधी- पासूनच तयार असतो, तसा जो पुरुष मरणापूर्वीच मरण लक्षांत ठेवून वर्तत असतो; ५२ आणि याप्रमाणें जो या जन्मानें पुढील जन्मांना व या मृत्यूनें पुढील मृत्यूंना नाट लावतो आणि केवट आत्मस्वरूपाने उरतो; ५३ त्याच्या घरीं ज्ञानाला कांहींच उणें नसतें. ज्याला जन्ममृत्यूची जाचणी राहिली नाहीं, ५४ आणि त्याप्रमाणेच ज्याच्या शरीराला वृद्धपण कधींच न चिकटल्या - मुळें जो नेहमीच तारुण्याच्या भरांत स्वतांला राखतो; ५५ जो आपल्याशीं म्हणतो, “ आज या शरीरांत जी पुष्टी दिसत आहे, ती वाळलेल्या काचरीप्रमाणें होणारी आहे. ५६ दुर्दैवी पुरुषाच्या व्यवहाराप्रमाणे हे हातपाय केव्हां तरी थकून व्यर्थ होतील, आणि ज्याला सल्ला देण्याला मंत्री नाहीं अशा राजाप्रमाणे या बळाची अवस्था होईल. ५७ ज्या या मस्तकाला हल्लीं फुलांचा इतका शोक आहे, तें हें मस्तक उंटाच्या गुडघ्यासारखं टेंगळांनी खडबडीत व्हावयाचे आहे. ५८ ओढाळ गुराच्या खुराला जशी आषाढ महिन्यांतील वाऱ्यानें बुरशी येऊन पायच्याचा रोग होतो, तसाच प्रकार माझ्या डोक्याचा होणार आहे. ५९ हे डोळे आज कमळाच्या पाकळ्यांबरोबर स्पर्धा करीत १ समर्थ होतो. २ डोहांत. ३ मस्तकाला ४ उंदाचा. ५ आषाढ मासांतील वाऱ्यानें ६ 'पायाचे' नांवाचा गुरांचा रोग, ७ ईप्यनें, चढाओढीनें,