पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४९० सार्थ श्रीज्ञानेश्वरी उणेयापुरेया | वोथंवां जेवीं ॥ ३७ ॥ वैर जन्मांतरींचें । सर्पा मनौनि' न वचे । तेवं अतीतां जन्माचें । उणें जो वाहे ॥ ३८ ॥ डोळां हरेळ न विरे । घाईं कोर्ते न जिरे । तैसें काळींचें न विसरे । जन्मदुःख ॥ ३९ ॥ म्हणे यगर्ते रिगाला । अहा मूत्ररंध्रे निघाला । कैटा रे मियां चाटिला । कुचस्वेदु ॥ ५४० ॥ ऐसऐसिया परी । जन्माचा कांटाळा धरी । म्हणे आतां तें मीन करीं । जेणें ऐसें होय ॥ ४१ ॥ हाँरी उमँचावेया । जुंवारी जैसा ये डाया । कीं वैरा बापाचेया । पुत्र जंचे ॥ ४२ ॥ मारिलियाचेनि रागें । पाठीचा जेवीं सूड मागे । तेणें आक्षेपें लागे । जन्मापाठीं ॥ ४३ ॥ परि जन्मती ते लाज । न सांडी जयाचें निजं । संभाविता निस्तेज । न जिरे जेवीं ॥ ४४ ॥ आणि मृत्यु पुढां आहे । तोचि कल्पांतीं कां पाहे । परी आजीच होये । सावधु जो ॥ ४५ ॥ माजीं अथावे म्हणतां । थडियेचि पांडुसुता । पोहणार आइता | कासी जेवीं ॥ ४६ ॥ कां न पवतां रणाचा ठावो । सांभाळिजे जैसा आवो । वोडेंण सहजे घावो । न लागतांचि ॥ ४७ ॥ पहिचा पेण वाटवर्धी । तंव आजीचि होइजे सावधा । जीवु न वचतां औपधा । धांविजे जेवीं ॥ ४८ ॥ जसा साधक पिशाचाला, योगी पुरुष उपाधीला, किंवा ओळंबा सरळपणाला अथवा वांकडेपणाला स्वतः न चळतां पाहतो, तसा; ३७ सापाच्या मनांतला जन्मांतरींचाही डूक नाहींसा होत नाहीं, तसा जो मागील जन्माचे दोष स्मरत असतो; ३८ डोळ्यांत रेतीचा कण विरत नाहीं, किंवा जखमेंत वाणाचें शल्य जिरत नाहीं, त्याप्रमाणें जन्माचें दुःख ज्याला डवचल्यावांचून राहत नाहीं, ३९ जो निरंतर म्हणत असतो, कीं, "मी पुत्राच्या चरांत सांपडलों, मूत्रद्वारांतून बाहेर पडलों, आणि, हाय, हाय, रे, स्तनाचा घाम गोडीनें चाटला !" ५४० असे विचार मनांत घोळून ज्याला जन्माचा तिटकारा येतो, आणि “ जेणेंकरून पुन्हां जन्म प्राप्त होईल असे कृत्य मी आतां करणारच नाहीं,” असा जो मनाचा धडा करतो; ४१ गमावलेलें द्रव्य पुन्हां परत कमावण्याकरितां जसा जुगारी पुन्हां डाव टाकण्याला तयार होतो, अथवा बापाच्या वैऱ्याचा सूड घेण्यासाठी मुलगा टपून राहतो, ४२ किंवा मारानें चिडून जसा एकादा मारणाराचा त्वेषानें पाठलाग करतो, त्याप्रमाणेंच जो आवेशानें जन्माच्या मार्गे हात धुऊन लागतो; ४३ जशी संभाविताला मानहानि खपत नाहीं, तशी जन्माला आल्याची लाज ज्याच्या मनाला निरंतर डांचत असते; ४४ आणि 'पुढे मध्येच अपरंपार डोह आहे,' असे कोणी सांगतांच, अर्जुना, पोहणारा जसा कांठावरच काच्या मारतो किंवा रणांत जाऊन उभं राहण्यापूर्वीच धोरणी पुरुष आपलें अवसान सांभाळतो, अथवा घाव पडण्याच्या आधींच जशी ढाल पुढे करावयाची असते, अथवा उद्यांच्या मुक्कामाच्या जागीं दगा होण्याचा संभव आहे असं समजतांच आजच आगाऊ सावध राहावें लागतें, किंवा प्राण जाण्याच्या अगोदरच जशी औषधाकरितां धांवाधांव करण्याची असते, तसा मृत्यु आज घडो किंवा कल्पांती घडो, १ ओळंबा. २ सापाच्या मनांतून. ३ खडा, रेतीचा कण. ४ बाणाचें टोंक, शल्य. ५ पुवाच्या चरांत. ६ हाय, हाय रे . ७ गमावलेले पुन्हां मिळविण्यासाठी ८ जपतो, टपून असतो. ९ आवेशानें १० चित्त ११ अपरंपार डोह. १२ ढाल. १३ दुसऱ्या दिवसाचा मुकाम १४ दग्याचा.