पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४८९ आणि सचााचिये परी । ईष्टापूर्तें करी । परी केलेपण शरीरी । वसों नेदी ॥ २५ ॥ वर्णाश्रमपोपकें । कर्मे नित्यनैमित्तिकें । यामाजीं कांहीं न ठके । आचरतां ।। २६ ।। परि हैं मियां केलें । कीं हें माझेनि सिद्धी गेलें । ऐसें नाहीं ठेविलें । वासनेमाजीं ॥ २७ ॥ जैसें अवचितपणें । वायूसि सर्वत्र विचरणें । कीं निरभिमान उदैजणें । सूर्याचें जैसें ॥ २८ ॥ कां श्रुति स्वभावता बोले | गंगा काजेंविण चाले । तैसें अवष्टंभहीन भलें | वर्तणें ज्याचें ॥ २९ ॥ ऋतुकाळीं तरी फळती | परी फळलों हें नेणती । तयां वृक्षांचिये ऐसी वृत्ति । कर्मी सदा ।। ५३० ।। एवं मनीं कमीं बोलीं । जेथ अहंकारा उखी जाहली । एकावळीची काढिली | दोरी जैसी ॥ ३१ ॥ संबंवेंवीण जैसीं । अ असती आकाशीं । देहीं कर्मे तैसीं । जयासि गा ॥ ३२ ॥ मद्यपाआंगींचें वस्त्र | कां लेपाहातींचें शस्त्र । बैलावरी शास्त्र | बांधलें आहे ॥ ३३ ॥ तया पाडें देहीं । जया मी आहें हे सेचि नाहीं । निरहंकारता पाहीं । तया नांव || ३४|| हैं संपूर्ण जेथें दिसे । तेथेंचि ज्ञान असे । इयेविषीं अनारिसें । बोलों नये ॥ ३५ ॥ आणि जन्ममृत्यु दुःखें । व्याधि वार्धक्य कैलुपें । तियें आंगा न येतां देखे | दुरूनि जो ॥ ३६ ॥ साधकु विवसिया । कां उपसर्गु योगिया । पावे ठायी आढळेल, त्याच्या ठिकाणीं विपुल ज्ञान वसत आहे, असें तूं जाण २४ जो एकाद्या सकाम मनुष्याप्रमाणेच विहिरी खोदणे, तळ्यांना घाट बांधणे, धरण रचणे, वगैरे सर्व जनोपयोगी कामें करितो, परंतु केलेपणाचा अभिमान अंगाला शिवूं देत नाहीं; २५ वर्णाश्रम चालविणारी नित्यनैमित्तिक कर्में जो केल्यावांचून राहत नाहीं, २६ परंतु 'मी हैं अमके कार्य सिद्धीला नेलें, ' अशा प्रकारची भावना ज्याच्या ठिकाणी तिळमात्र नसते; २७ जसा वारा स्वभावगुणानं सर्व ठिकाणी संचार करतो, अथवा सूर्य निरहंकारबुद्धीनें उगवतो, २८ किंवा वेद सहजपणे ज्ञानकथन करतात, किंवा गंगा निर्हेतुकपणे वाहत असते, तसे जो निरभिमानाने सर्व प्रकारचं वर्तन करतो; २९ योग्य हंगामाला वृक्ष फळें देतात, परंतु फळदानाची साहंकार जाणीव जशी त्यांना नसते. त्याप्रमाणेच अहंभावाशिवाय जो नित्य कर्म आचरतो; ५३० याप्रमाणें मनांत, कर्मात व वाचेंत . ज्याच्याठायीं अहंकाराचा नाश झाला आहे; ज्याप्रमाणे एका पेडाची दोरी बळावी, ३१ किंवा आकाशांत ढगे वावरतात पण त्यांचा आकाशाला डाग लागत नाहीं, त्याप्रमाणें ज्याच्या देहाकडून कर्मे घडूनही तो निर्लेप राहतो; ३२ दाखवाजाच्या अंगावरलें वस्त्र, किंवा चित्राच्या हातांतलें शस्त्र, किंवा बैलाच्या पाठीवरचं शास्त्रग्रंथांचे ओझें ३३ त्याप्रमाणेंच ज्याच्या ठिकाणी अहंस्फुरण व्यर्थ असतें म्हणजे ज्याला त्याची आठवणही नसते, त्या पुरुषाच्या अशा स्थितीला ' निरहंकारता ' हें नांव आहे. ३४ ही निरहंकारता ज्याचेठायीं पूर्णपणे आढळून येते, त्याच्याच ठिकाणीं ज्ञान राहत असतें, यांत तिळमात्र संदेह नाहीं. ३५ जन्म आणि मृत्यु हीं दुःखें, आणि रोग, म्हातारपण, इत्यादि संकटें, ह्रीं अंगाला डमूं न देतां, जो निर्लेपपणे त्यांकडे पहात राहतो; ३६ तो कसा ? तर १ सार्वजनिक उपयोगाकरितां खोदलेल्या विहिरी, तलाव, इत्यादि. २ नाश ३ स्मरण ४ मळ, पाप. ५ विनशीला ६ उपाधी, उपय. ६२