पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ ८ ॥ सम० - विषयांमाजि वैराग्य निरहंकार सर्वदा । जन्म मृत्यु जरा रोग दुःख हे दोष पाहणे ॥ ८ ॥ आर्या-त्याग अहंकाराचा अणि वर्जन इंद्रियार्थ तोषांचे दर्शन घडीघडीही जन्मजराव्याधिदुःखदोषांचें ॥ ८ ॥ ओवी - विषयवैराग्य सुखदुःख । अहंकार नाहीं देख । जन्म मरणध्याधिदुःख यांचे ठायीं दोषदर्शन ॥ ८ ॥ आणि विषयांविखी । वैराग्याची निकी । पुरवणी मानसी कीं । जिती आथी || १३ || वमिलिया अन्ना । लाळ न घोंटी रसना । कां आंग न सूये आलिंगना । प्रेताचिया ॥ १४ ॥ विप खाणें नागवे । जळत घरीं न रिघवे । व्याघ्रविवरा न वचवे । वस्ती जेवीं ॥ १५ ॥ धडाडीत लोहरसीं । उडी न घालवे जैसी । न करवे उशीशी । अजगराची ।। १६ ।। अर्जुना तेणें पाडें । जयासी विषयवार्ता नावडे । नेदी इंद्रियांचेनि तोंडें । कांहीं जावों ॥ १७ ॥ जयाचे मनीं आलस्य । देहीं अतिकाये । शमदमीं सौरस्य । जयासि गा ॥ १८ ॥ तपोव्रतांचा मेळावा | जयाचे ठायीं पांडवा | युगांत जया गांवा - | आंतु येतां ॥ १९ ॥ बहु योगाभ्यासीं हांव । विजनाकडे धांव । न साहे जो नांव । संघाताचें ॥। ५२० ।। नाराचांचीं आंथरणें । पूयपंकीं लोळणें । तैसें लेखी भोगणें । ऐहिकींचें || २१ || आणि स्वर्गातें मानसें । ऐकोनि मानी ऐसें । केहिले पिशितं जैसें । श्वानाचें कां ।। २२ ।। तें हें विषयवैराग्य । जें आत्मलाभाचें भाग्य । येणें ब्रह्मानंदा योग्य | जीव होती ॥ २३ ॥ ऐसा उभयभोगीं त्रासु । देखसी जेथ बहुवसु । तेथ जाण रहिवासु । ज्ञानाचा तूं ॥ २४ ॥ आणि विषयांविषयीं विरक्ति ज्याच्या मनांत पुरती जीवंत आहे; १३ ओकारीनें जसें जिभेला पाणी सुटत नाहीं, किंवा मढ्याला प्रेममिठी मारायला जसें कोणी अंग पुढे करीत नाहीं, १४ किंवा विष कोणीही गिळीत नाहीं, कीं जळत्या घरीं शिरत नाहीं किंवा वाघाच्या गुहेत वसती करीत नाहीं, १५ सळसळणाऱ्या लोखंडाच्या रसांत जसा कोणी उडी घालीत नाहीं किंवा अजगरावर उशीप्रमाणे टेकून निजत नाहीं, १६ तशी विषयाची गोष्ट ज्याला रुचत नाहीं आणि जो इंद्रियांच्या द्वारं कोणताही विषय ग्रहण करीत नाहीं; १७ ज्याचें मन विषयासंबंधें उदासीन असतें, शरीर अतिकुश असतें, आणि शमदमाची ज्याला फार हौस वाटते; १८ अर्जुना, ज्याच्या ठिकाणी सर्व तपोव्रतें एकत्र जुळलेलीं असतात आणि गांवांत भरवस्तीत राहणें ज्याला कल्पांतासारखें दुःखद वाटते; १९ ज्याला योगाभ्यासाचा फार हव्यास आहे, जो निर्जन एकांतस्थानाकडे धांव घेतो आणि मनुष्यसमाजाचे ज्याला नांवही खपत नाहीं; ५२० बाणांच्या अंथरुणावर निजणें किंवा वाच्या चिखलांत लोळणें, यासारखंच जो ऐहिक विषय भोगणें किळसवाणें समजतो; २१ स्वर्गसुखाचें वर्णन श्रवण करून' जो त्या सुखाला कुत्र्याच्या सडलेल्या मांसाप्रमाणे मानतो; २२ त्याचें जं हें वैराग्य, तेंच आत्मलाभाचें वैभव होय; अशा वैराग्याने जीव ब्रह्मानंद भोगण्याला पात्र होतात. २३ अशा प्रकारें ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही सुखोपभोगांसंबंधें विरक्ति ज्याच्या १ कुजलेले, २ मांस,