पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४८७ आंगेंजीवें जोडे । तें ज्ञानाचें उघडें । निधान साचें ॥ १ ॥ आणि इसोळु जैसा घेरा । कां दंदिया हतियेरा । न विसंबे भांडारा | बद्धकु जैसा ॥२॥ का एकलौतिया बाळका । वरि पडौनि ठाके अंबिका। मधुविषीं मधुमक्षिका । लोभिणी जैसी ॥ ३ ॥ अर्जुना जो यापरी । अंतःकरण जतन करी । नेदी उभे ठाकों द्वारीं । इंद्रियांच्या ॥ ४ ॥ म्हणे काम बागुल आइकेल । हे आशा सियारी देखैल | तरी जीवा टेंकैल । म्हणोनि विहे ॥ ५ ॥ बाहेरी धीटे जैसी । दादुगा पति कैळासी । करी टेहणी तैसी । प्रवृत्तीसी ॥ ६ ॥ सचेतनीं वाणेपणें । देहासकट आटणें । संयमावरी करणें । बुजुनि घाली ॥ ७ ॥ मनाचिया महाद्वारीं । प्रत्याहाराचिया ठाणांतरीं । जो यमदम शरीरीं । जागवी उभे ॥ ८ ॥ आधारीं नामी कंठीं । वंधत्रयाची घरटी | चंद्रसूर्यसंपुटीं । सुये चित्त ॥ ९ ॥ समाधीचे शेजेपासीं । बांधोनि घाली ध्यानासी । चित्त चैतन्यसमरसीं । आंतु रते ।। ५१० ॥ अगा अंतःकरण निग्रहो जो | तो हा हें जाणजो । हा आथी तेथ विजो । ज्ञानाचा पैं ॥ ११ ॥ जयाची आज्ञा आपण । शिरीं वाहे अंतःकरण | मनुष्यकारें जाण । ज्ञानचि तो ॥ १२ ॥ स्थैर्य ज्या पुरुषाच्या शरीराला व मनाला लाभलें आहे, तो पुरुष ज्ञानधनाचा उघडा ठेवा आहे, असे जाण. १ जसें पिशाच आपल्या झाडाला, द्वन्द्वयुद्ध करणारा आपल्या हत्याराला, किंवा लोभी आपल्या धनठेव्याला दृष्टीआड होऊं देत नाहीं; २ किंवा आपल्या एकुलत्या एक मुलाला आई जशी नेहमीं अंगाजवळ घेऊन बसते, अथवा मधमाशीला मधाचा जसा अनिवार लोभ असतो; ३ त्याप्रमाणें, अर्जुना, जो आपल्या अंतःकरणाची एकतानतेनें जतन करतो आणि त्याला इंद्रियांच्या दारांत पाऊलही ठेवू देत नाहीं; ४ " जर माझ्या या बाळाचें नांव कदाचित् कामनामक बागुलबोवाच्या कानीं पडेल, किंवा आशानामक डांकणीची नजर याच्याकडे लागेल, तर हें जीव सोडील. " या कल्पनेनें जो भितो. ५ बाहेरख्याली स्त्रीला जसा दांडगा नवरा बांधून ठेवतो, तशी जो प्रवृत्ति अगदीं डांबून टाकतो; ६ सजीव देह खंगून त्यासह प्राण जरी आहूं लागले, तरी जो इंद्रियांना कोंडून निग्रहांत ठेवतो; ७ मनाच्या मुख्य दरवाजावर आणि निवृत्तीच्या पायावर जो आपल्या शरीररूपी दुर्गात शमदम ठाम जागते राखतो; ८ मूलाधार, मणिपुर, आणि विशुद्ध या तीन चक्रांत वज्र, ओढियाण, आणि जालंधर, या तीन बंधांची गस्त ठेवून, जो आपलें चित्त इडा व पिंगला या दोन नाड्यांच्या संधीवर प्रविष्ट करतो; ९ समाधीच्या शय्येवर ध्यानाला जखडून निजवतो, आणि ज्याचें चित्त चैतन्याशी एकरूप होऊन रममाण होते; ५१० ज्यानें असे केलें असेल, त्याला अंतःकरणनिग्रह साधला आहे, असें समज. असा अंतःकरणनिग्रह म्हणजे ज्ञानाचा विजयच होय. ११ ज्या पुरुषाची आज्ञा त्याचें अंतःकरण निमूटपणें आणि बहुमानानें पाळितं, तो पुरुष मूर्तिमंत ज्ञान जाणावा. १२ १ पिशाच, २ पछाडलेल्या माणसाला. ३ बाहेरख्याली बायको. ४ बांधतो. ५ कमतरतेनें. ६ विजयो, विजय.