पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आकाश न धांवे । भगणचक्रीं न भ॑वे । ध्रुव जैसा ॥ ८९ ॥ पांथिकाचिया येरझारा । सर्वे पंथ न वचे धनुर्धरा । कां नाहीं जेवीं तरुवरां । येणें जाणें ||४९०|| तैसा चळणवळणात्मकीं । असोनि ये पांचभौतिकी । भूतोमीं एकीं । चळिजेना ॥९१॥ वाहुळीचेनि वळें । पृथ्वी जैसी न ढळे । तैसा उपद्रवउमाळे । न लोटे जो ॥ ९२ ॥ दैन्यदुःखीं न तपे । भयशोकीं न कंपे । देहमृत्यु न वासिपे । पातलेनि ||१३|| आर्तिआशापडि भरें | विविधव्याधिगजरें | उज् असतां पाठिमोरें | नव्हे चित्त ॥ ९४ ॥ निंदा निस्तेज दंडी । कामलोभा वरपडी । परी लोंब नव्हे वांकुडी | मानसाची ॥ ९५ ॥ आकाश हैं वोसरो । पृथ्वी वरि विरो । परि नेणे मोहरों । चित्तवृत्ति ॥ ९६ ॥ होती हांला फुलीं । पासैवणा जेविं न घली । तैसा न लोटे दुर्वाक्यशेलीं । सळिला सांतां ॥ ९७ ॥ क्षीरार्णवाचिया कल्लोळी | कंपु नाहीं मंदराचळीं । आकाश न जळे जाळीं । वणवियाच्या ।। ९८ ।। तैसा आला गेला ऊर्मि । नव्हे गजवज मनोधर्मी । किंबहुना धैर्य क्षमी । कल्पांतींही ॥ ९९ ॥ | पैं स्थैर्य ऐसी भाख । बोलिजे जे सविशेख । ते हे दशा गा देख | देखणेया ||५०० || हें स्थैर्य निधडें | जेथ आकाश धांवत नाहीं, किंवा तारागणांच्या भोवंडीनें ध्रुवतारा फिरत नाहीं, ८९ अथवा प्रवाशाच्या येरझारांबरोबर जसा रस्ता येरझारा करीत नाहीं, किंवा, अर्जुना, आजूबाजूच्या वृक्षांना ये-जा घडत नाहीं, ४९० त्याप्रमाणे या पंचभूतात्मक शरीराचे चलनवलन होत असतांही कोणत्याही भूताच्या बन्टानें तो पुरुष अंतरंगीं चळला जात नाहीं. ९१ वावटळीच्या सोसाट्यानें जशी पृथ्वी ढळत नाहीं, तसा सुखदुःखादि उपाधींच्या उसळीनें तो स्थिर पुरुष चलित होत नाहीं. ९२ दैन्यदुःखानें तो संतापत नाहीं, भयशोकानें कांपत नाहीं, कीं देहाला मरण आले असतां घाबरा होत नाहीं. ९३ वासना व इच्छा यांच्या आवेशाने किंवा विविध रोगांच्या गलबल्यानें, त्याचें उजू चित्त कधीही उलटे किंवा यांकडे होत नाहीं. ९४ निंदा, अपमान, व दंडन घडलें असतां किंवा कामक्रोधाचा घाला पडला असतांही त्याच्या स्थिर मनाचा केंसही वांकडा होत नाहीं. ९५ आकाश कोसळून पडो किंवा पृथ्वी फाटून जावो, परंतु त्याची चित्तवृत्ति कधीही मागें मुरडत नाहीं. ९६ फुलांनीं मारला असतां जसा हत्ती बाजूला वळत नाहीं, तसा दुष्ट वचनांच्या वाणांनीं तो मुळींच चाळवला जात नाहीं. ९७ जसा क्षीरसागराच्या लाटांनी समुद्रमंथनाच्या वेळी मंदरपर्वतानें डोल खालला नाहीं, किंवा वणव्याने जसे आकाश जळत नाहीं, ९८ तशा सुखदुःखादिकांच्या कितीही लाटा आल्या व गेल्या, तरी त्याचे मनोभाव गोंधळत नाहींत, किंबहुना प्रत्यक्ष कल्पांत झाला तरीही त्याचें धैर्य आपल्या सामर्थ्याने टिकते. ९९ 'स्थैर्य ' या नांवानें ज्या गुणाचा उल्लेख केला आहे, अर्जुना, तो गुण म्हणजे या प्रकारची मानसिक अवस्था होय, हें नीट समजून घे. ५०० अशा प्रकारचें अभंग १ हत्ती, २ हाणला असतां, ३ बाजूला. ४ दुष्ट वचनाच्या बाणांनी, ५ छळला असतां,