पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४८५ तें आइके देखे अथवा भेटे । परि मनीं कांहींचि नुमटे | मेघरंगें न कांटे | व्योम जैसें ॥ ७८ ॥ एहवीं इंद्रियांचेनि मेळें । विषयांवरी तरी लोळे । परि विकाराचेनि विटाळें । लिंपिजेना ।। ७९ ।। भेटलेया वाटेवरी । चोखी आणि माहारी । तेथ नातळे तियापरी । राहाटों जाणे ॥ ४८० ॥ कां पतिपुत्रांतें आलिंगी । एकचि ते तरुणांगी । तेथ पुत्रभावाच्या आंगीं । न रिगे कामु ।। ८१ ।। तैसें हृदय चोख । संकल्पविकल्पी सनोळख । कृत्याकृत्य विशेख । फुडें जाणे ॥ ८२ ॥ पाणियें हिरा न भिजे । आधणीं हरेछु न शिजे । तैसी विकल्पजातें न लिंपिजे । मनोवृत्ति ॥ ८३ ॥ तया नांव शुचिपण । पार्था गा संपूर्ण । हें देखसी तेथ जाण । ज्ञान असे ||८४|| आणि स्थिरता साचें । घर रिगाली जयाचें । तो पुरुष ज्ञानाचें । आयुष्य गा ||८५ || देह तरी वरिचिलीकडे । आपुलियापरी हिंडे । परि वैसका न मोडे । मानसींची ॥८६॥ वत्सावरौनि धेनूचें | स्नेह राना न वचे । नव्हती भोग सतियेचे । प्रेमभोग ॥ ८७ ॥ कां लोभिया दूर जाये । परि जीव ठेवांचि ठाये । तैसा देहो चाळितां नव्हे । चळु चित्ता ॥ ८८ ॥ जातया अभ्रासवें | जैसें पाहिले किंवा त्याला ते विषय येऊन लगटले, तरी, जसें आकाश ढगांच्या रंगाने मळत नाहीं, तसाच त्याच्या मनावर विषयांचा कांहींच संस्कार घडत नाहीं. ७८ खरें पाहिलें, तर तो इंद्रियांच्या समूहासह विषयांमध्ये लोळत असतो, परंतु विकारांचा लेप त्याला तिळमात्रही लागत नाहीं. ७९ वाटेमध्ये सुंदर महारीण दृष्टीस पडली तरी तिच्याबद्दल जसा कोणी अभिलाष बाळगीत नाहीं, त्याप्रमाणेच हाही विषयांसंबंधें निःस्पृह वर्तन ठेवतो. ४८० एकच स्त्री पतीला आणि मुलाला आलिंगन देते, परंतु पुत्रप्रेमांत जसा कामविकाराला पाय ठेवतां येत नाहीं, ८१ त्याचप्रमाणें हृदय शुद्ध असले म्हणजे त्यांत संकल्पविकल्पाची डाळ शिजत नाहीं पण, कृत्य काय आणि अकृत्य काय, हे मात्र त्याला स्पष्ट ठाऊक असतें. ८२ जसा पाण्यानें हिरा भिजत नाहीं किंवा अधणाने खडा शिजत नाहीं, तसे त्याचे मनाचे भाव विकल्पानें दूषित होत नाहींत. ८३ अर्जुना, अशा स्थितीला 'शुचित्व' हे नांव आहे, आणि हें जेथे असेल, तेथें ज्ञान असतें असें तूं समज. ८४ आणि ज्या पुरुषाचे अंगीं 'स्थिरता' घर करून नांदत असेल, तो पुरुष ज्ञानाला जीवंत राखतो असें जाण. ८५ देह आपल्या परीनं बाह्य आचार करीत असतो, परंतु त्यामुळे त्याच्या मनाची डळमळ मुळींच होत नाहीं. ८६ जसें गोमातेचें वात्सल्य वासराला टाकून रानांत भटकण्याला जात नाहीं, किंवा पतिव्रतेचे विलास जसे वैषयिक प्रेमाला चाळवीत नाहींत, ८७ अथवा जसा लोभी दूर गेला, तरी त्याचा जीव पुरलेल्या द्रव्याच्या ठिकाणींच गुंतून राहतो, तसा देहाच्या चळवळीनं स्थिर पुरुषाच्या मनाला चळ सुटत नाहीं. ८८ धांवणाऱ्या ढगांवरोबर जसें १ मते २ खडा.