पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी निर्मळु होय बोलें । वेदांचेनि ॥ ६५ ॥ भलते बुद्धि वळी । रेज आरिसा उजळी | सौंदणी फेडी थिगळी | वस्त्रांचिया ॥ ६६ ॥ किंबहुना यियापरी । बाह्य चोख अवधारीं । आणि ज्ञानदीपु अंतरीं । म्हणौनि शुद्ध ॥ ६७ ॥ एन्हवीं तरी पांडुसुता । आंत शुद्ध नसतां । बाहेरि कर्म तो तत्त्वतां । विटंबु गा ॥ ६८ ॥ मृत जैसा शृंगारिला । गाढव तीर्थी न्हाणिला | कडुदुधिया माखिला । गुळे जैसा ॥ ६९ ॥ वासगृहीं तोरण बांधिलें । कां उपवासी अन्नें लिंपिलें । कुंकुमसेंदुर केलें । कांहीनेनें ॥ ४७० ॥ कळस ढिमाचे पोकळ । जो वरील ते झळाळ । काय करूं चित्रींव फळ | आंतु शेण ॥७१॥ तैसें कर्म वरिचिलेकडां। न सरे थोर मोलें कुडा | नव्हे मदिरेचा घडा । पवित्र गंगें ॥७२॥ म्हणोनि अंतरीं ज्ञान व्हावें । मग वाह्य लाभेल स्वभावें । वरि ज्ञान कर्मे संभवे । ऐसें के जोडे ॥ ७३ ॥ यालागीं बाह्य भागु । कर्मे धुतला चांगु । ज्ञानें फिटला वंगु । अंतरींचा ॥ ७४ ॥ तेथ अंतरबाह्य गेलें । निर्मळत्व एक जाहलें । किंबहुना उरलें । शुचित्वचि ॥ ७५ ॥ म्हणोनि सद्भाव जीवगत । बाहेर दिसती फांकत । स्फटिकगृहींचे डोलत । दीप जैसे ॥ ७६ ॥ विकल्प जेणें उपजे । नाथिली विकृति निपजे । अप्रवृत्तीचीं बीजें । अंकुर घेती ॥ ७७ ॥ यांच्या मिळणीनें बाह्यशुद्धि जशी होते; ६५ प्रत्येक कामांत बुद्धीच बलिष्ठ आहे; जशी रेती आरशाला स्वच्छ करते, किंवा परटाचें सतेलें वस्त्राचा डाग धुवून काढते, ६६ त्याप्रमाणे बाहेर निर्मळ होऊन अंतरंगांतही ज्ञानाचा दिवा तेवत असल्यामुळे जो शुद्ध झाला आहे; ६७ नाहींतर, अर्जुना, अंतरंग शुद्ध नसतां बाहेरचा कर्माचा थाटमाट म्हणजे नुसती फसवणूक होईल. ६८ मढ्याला जसें सजवावें, गाढवाला तीर्थस्नान घडवावें, कडु दुध्याला गुळाने माखावें, ६९ ओसाड घराला केळीचं तोरण बांधावें, उपाशी मनुष्याचें अंग अन्नानें लिंपावें, विधवेनें कुंकूं लावावें, ४७० पोकळ कळसाला मुलामा द्यावा, किंवा शेणाचें फळ जसें रंगवावें, ७१ तसाच प्रकार या वरकम कर्मकांडाचा आहे. निरसाला कधीं मोठी किंमत येत नाहीं, आणि दारूचा घडा गंगेच्या पाण्यानंही शुद्ध होत नाहीं. ७२ म्हणून अंतरंगांत ज्ञान असलें पाहिजे, तसें तें असले म्हणजे मग बाह्य शुद्धि आपोआप लाभते; पण वरकर्मी शुद्धिक्रियांनीं ज्ञान प्राप्त होतें, असें कधींतरी झाले आहे काय ? ७३ म्हणून कर्मानं ज्याचा बाह्य भाग चांगला चोखाळला आहे आणि ज्ञानानें अंतरंग निष्कलंक झालें आहे; ७४ त्याच्या ठायीं अंतर्बाह्य हा भेदच नाहींसा होऊन एकजात निर्मळता एकवटते; सारांश त्याचे अंगीं शुचित्वच शिल्लक असतें, ७५ म्हणून, कांचेच्या घरांतील दिव्यांचें तेज जसें बाहेर लखाखतें, तसे त्याच्या अंतरंगांतील शुद्ध भाव इंद्रियद्वारा बाहेर प्रकट होतात. ७६ ज्यांच्यामुळे संशय उत्पन्न होतो, किंवा नसतेच विचार संचरतात आणि कुकर्माचीं बीजें अंकुरतात, ७७ ते विषय त्यानें ऐकले १ माती, रेती. २ कपडा धुण्याचे सतेलें. ३ डाग, कळंक, मळ.