पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला 1 २३ जे जाहले असती उद्यत | झुंजावया ॥ १९ ॥ अंतोरियां कुमरें । सांडोनियां भांडारें । शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी || २२० ।। ऐसियांतें कैसेनि मारूं । कवणावरी शस्त्र धरूं । निज हृदया करूं । घातु केवीं || २१ || हे नेणसी तूं कवण | परी पैं भीष्म द्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ।। २२ ।। एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ । पुत्र नातू केवळ । इष्टही असती || २३ || अवधारीं अति जवळिकेचे । हे सक- ळही सोयरे आमुचे । म्हणोनि दोष आथी वाचे । बोलतांचि ॥ २४ ॥ एतान्न हंतुमिच्छामि नतोऽपि मधुसूदन । अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ ३५ ॥ सम० -- मी यांतें मारुं इच्छीना हे जरी मज मारिती । त्रैलोक्यराज्यालागींही तेथे हे भूमि ते किती ॥ ३५ ॥ आर्या--मारोत मला अवघे परि मी यांलागिं मारिना देवा । त्रिभुवनराज्यास्तवही पृथ्वीचा तेथ कायसा केवा ३५ ओवी - हे मज मारिती जरी । परी मी न यांतें मारीं । त्रैलोक्यराज्य झाले जरी । पृथ्वीचा कोण केवा ॥ ३५ ॥ हे वरी भलतें करितु | आतांचि येथें मारितु । परि आपण मनें धातु । न चिंतावा ||२५|| त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त । तरी हैं अनुचित । नाचरें मी ॥ २६ ॥ जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कव- णाच्या मनीं उरिजे । सांगें मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा ॥ २७ ॥ निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥ ३६ ॥ सम० -- मारूनि धार्तराष्ट्रांसी सिद्धी काय जनार्दना । आम्हां पापचि लागे हैं आततायिहि मारितां ॥ ३६ ॥ आर्या-या धार्तराष्ट्रघातें होइल कैसा जनार्दना तोष । असतांहि आततायी वर्धितां यांतें घडेल मज दोष ॥ ३६ ॥ ओवी - धृतराष्ट्रपुत्र मारुनी । सुख न वाटे माझे मनीं । शस्त्र मारितां पाप जाऊनी । है कैवी घडे श्रीहरि ॥ ३६ ॥ जरी वधु करीन गोत्रजांचा । तरी वैसौटा होऊनि दोषांचा । मज सर्व गोत्रज येथे जमले आहेत, पण दैवाचा योग असा कांहीं उलटा घडला आहे, कीं, हे बायकामुलें, धनदौलत, सर्व कांहीं सोडून, आपलीं जीवितें शस्त्रांच्या टोकावर लटकावून, येथें परस्परांशी झुंज करण्याला सिद्ध झाले आहेत. १९, २२० मग या अशांना मीं कसें मारावें ? मी कोणावर शस्त्र उगारूं ? स्वतांच्याच हृदयाचा मी कसा घात करूं ? २१ हे असे कोण, हें कदाचित् तुमच्या लक्षांत आलें नसेल, पण ज्यांनी आमच्यावर पुष्कळ उपकार केले आहेत, तेच हे प्रत्यक्ष भीष्म व द्रोण. २२ येथे मेव्हणे, सासरे, मामे, आणि हे सारे प्रत्यक्ष भाऊ, मुलगे, व नातू, असे सर्व आमचे आप्तच आहेत. २३ देवा, लक्षांत घ्या, कीं, हे सर्व आमचे अगदीं जवळचे सोयरेधायरे आहेत. म्हणून यांच्याविषयीं अनि शब्द बोलणें म्हणजे वाचेला विटाळणेंच होय. २४ याच्यापेक्षां यांनी भलतंच केलें किंवा आम्हांला ठार मारिलें तरी चालेल, परंतु आम्हीं यांचा घात करण्याचें मनांतसुद्धां आणूं नये. २५ जरी त्रिभुवनाचे निर्वेध राज्य हाती येणार असले, तरीही मी असले अयोग्य कर्म करण्यास सिद्ध होणार नाहीं. २६ जर आम्ही हें कृत्य आज येथें आचरलों, तर कोणाच्या मनांत आमच्याविषयीं आदर उरेल ? आणि हे श्रीकृष्णा, मग आम्हांला वर मान करून तुमच्या मुखाकडे निर्धास्तपणे पाहावेल का ? २७ जर मी आपल्या कुळाचा संहार केला, तर १ स्त्रिया. २ घर. पापाचें घर होईन, आणि मग तुम्ही हातचे