पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ४८३ चाड । जया इयेविषींचें कोड । जो हे सेवेवांचून गोड । न मनी कांहीं ॥ ५३ ॥ तो तत्त्वज्ञानाचा ठावो । ज्ञाना तेणेंचि आवो । हें असो तो देवो । ज्ञानभक्तु ॥ ५४ ॥ हें जाण पां साचोकारें । तेथ ज्ञान उघडेनि दारें | नांदत असे जगा पुरे | इया रीती ॥ ५५ ॥ जिये गुरुसेवेविखीं । माझा जीव अभिलाखी । म्हणोनि सोयचुकी । बोल केली ॥ ५६ ॥ ए-हवीं असतां हातीं खुळा । भजनावधानीं आंधळा । परिचर्यलागीं पांगुळा । पासूनि मंदु ॥ ५७ ॥ गुरुवर्णनी मुका । आळशी पोशिजे फुका । परि मनीं आथी निका । सानुरागु ॥ ५८ ॥ तेणेंचि पैं कारणें । हें स्थूळ पोसणें । पडलें मज म्हणे । ज्ञानदेवो ॥ ५९ ॥ परि तो बोलु उपसाहावा । आणि वोळगे अवसरु देयावा । आतां म्हणेन जी बरवा । ग्रंथार्थचि ॥ ४६० ।। परिसा परिसा श्रीकृष्णु । जो भूतभार सहिष्णु । तो वोलतसे विष्णु । पार्थ आइके ॥ ६१ ॥ म्हणे शुचित्व गा ऐसें । जयापाशीं दिसे । आंग मन जैसें । कापुराचें ॥ ६२ ॥ कां रत्नाचें दळवाडें । जैसें सवाह्य चोखडें । आंतवाहेरि एके पांडें । सूर्य जैसा ॥ ६३ ॥ बाहेरीं कर्मों क्षाळला । भीतरी ज्ञानें उजळला । इहीं दोहीं परी आला । पांखाळा एका ॥ ६४ ॥ मृत्तिका आणि जळें । बाह्य येणें मेळें । उत्कंठा लागली आहे, जो गुरुसेवेशिवाय इतर कांहींही गोड मानीत नाहीं; ५३ तो पुरुष तत्त्वज्ञानाचा आधार आहे, त्याच्यामुळेंच ज्ञान आकाराला येतें, इतकेंच नव्हे, तर तो ज्ञानी भक्त प्रत्यक्ष देवच होय. ५४ खरोखरच त्या भक्ताच्या ठायीं ज्ञान अगदीं मुक्तद्वाराने राहतें आणि तें इतकें असतें कीं सर्व जगाला पुरून उरते. ५५ श्रोते हो, अशा गुरुसेवेविषयीं माझ्या अंतःकरणांत उत्कट उत्कंठा आहे, म्हणून मी हा एवढा पाल्हाळ केला आहे. ५६ नाहीं तर, मी हात असूनही थोटा, भजनाच्या जपणुकीविषयीं आंधळा, आणि गुरुसेवेच्या कामी पांगळ्याहून पांगळा आहे. ५७ आणि गुरुवर्णन करण्याच्या कामी मीं मुका असून, फुकटचें खाऊन रहाणारा पक्का आळशी आहे. मात्र माझ्या मनांत खरें खरें गुरुप्रेम आहे, ५८ आणि त्या प्रेमामुळेंच या स्थळाचा येवढा विस्तार मला करावा लागला, असें मी ज्ञानदेव तुम्हांला सांगत आहे. ५९ श्रोते हो, मी आतांपर्यंत जें बोलली तें कृपेनं सहन करावें आणि आपली आणखी सेवा करण्यास मला अवसर द्यावा. यानंतर मी ग्रंथाचाच अर्थ नीटपणे विशद करणार आहें. ४६० श्रोते हो, ऐका, ऐका; सृष्टीचा भार सहन करण्यास समर्थ असा नारायणाचा पूर्णाश श्रीकृष्ण हे बोलत आहेत व अर्जुन श्रवण करीत आहे. ६१ श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, ऐक. ज्याचें शुचित्व इतके आहे, कीं ज्याचें अंग आणि मन जणूं काय कापराचेच केलें आहे, ६२ किंवा रत्नाचा पिंड जसा अंतर्बाह्य स्वच्छ असतो, अथवा सूर्य जसा आतबाहेर सारखाच तेजस्वी असतो, ६३ तसा जो बाहेर कर्माचरणानें आणि अंतरीं ज्ञानानें उजळल्यामुळे उभयपरी सारखाच निर्मळ असतो; वेदमंत्राचा उच्चार करून माती आणि पाणी १ ला घोटा, २ निर्मळतेला, 66 ६४