पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૯૮૨ सार्थ श्रीज्ञानेश्वरी काज करी हो । मानसेंशीं ॥ ४१ ॥ एखादियां वेळां । श्रीगुरूचिया खेळा | लोण करी सकळा । जीविताचें ॥ ४२ ॥ जो गुरुदास्यें कृशु । जो गुरुप्रेमें सपोषु । गुरुआज्ञे निवासु । आपण जो ॥ ४३ ॥ जो गुरुकुळें मुकुलीनु । जो गुरुबंधु मौजन्यें सुजनु । जो गुरुसेवाव्यसनें सव्यसनु । निरंतर ॥ ४४ ॥ गुरुसंप्रदायधर्म । तेचि जयाचे वर्णाश्रम | गुरु परिचर्या नित्यकर्म । जयाचें गा ॥ ४५ ॥ गुरु क्षेत्र गुरु देवता । गुरु माता गुरु पिता । जो गुरुसेवेपरौता । मार्ग नेणे ॥ ४६ ॥ श्रीगुरूचें द्वार | तें जयाचें सर्वस्व सार | गुरुसेवकां सहोदर । प्रेमें भजे ॥ ४७ ॥ जयाचें वक्त्र | वाहे गुरुनामाचे मंत्र | गुरुवाक्यावांचूनि शास्त्र । हातीं न शिवे ॥ ४८ ॥ शिवतलें गुरुचरणीं । भलतैसें हो पाणी । तया तीर्थे यात्रे आणी । त्रैलोक्यींचीं ॥ ४९ ॥ श्रीगुरूचें उशिटें । लाहे जैं अवचटें । तैं तेणें लाभ विटे | समाधीसी ||४५० || कैवल्यसुखासाठीं । परमाणु घे किरीटी । उधळती पायांपाठीं । चालतां जे ॥ ५१ ॥ हें असो सांगावें किती । नाहीं पारु गुरुभक्ती । परी गा उत्क्रांतमति । कारण हैं ।। ५२ ।। जया इये भक्तीची - तें करण्यास धांव ठोकतें, आणि मनाबरोबर पैजेनें चढाओढ करून तें काम तडीस नेतें; ४१ एखादे वेळीं तो गुरूंनी मस्करीनें उच्चारलेला शब्दही पाळण्यासाठीं आपल्या सर्व जीवाची कुर्वडी करतो; ४२ जो गुरुसेवेंत शरीराला झिजवतो, जो गुरुप्रेमानें पुत्र होतो, जो गुरूंच्या आज्ञेला एकटाच आधार होतो, ४३ जो गुरुकुळाने स्वताला कुलीन समजतो, जो गुरुबंधूंबरोबर सौजन्याने वागण्यांतच सुजनत्व मानतो, गुरूंची सेवा हेच ज्यांचं व्यसन आहे, ४४ गुरुसंप्रदायाचे नियम हेच ज्यांच वर्णाश्रमधर्म होतात, गुरुभक्ति हैं ज्याचें नित्यकर्म आहे, ४५ गुरूंनाच जा क्षेत्र, देवता, माता, पिता, इत्यादि मानितो आणि गुरुसेवेपलीकडे जो कोणताही आत्मकल्याण साधण्याचा मार्ग जाणीत नाहीं; ४६ श्रीगुरूचें दार हेंच ज्याचें सारसर्वस्व - खरें खरें सत्यतत्त्व- होते; जो गुरूंच्या सेवकांना सख्या भावांप्रमाणे प्रेमाने वागवतो; ४७ ज्याच्या वदनांत गुरुनामाचा मंत्र निरंतर राहतो आणि गुरुवाक्यावांचून दुसऱ्या कोणत्याही शास्त्राला जो हातीं धरीत नाहीं; ४८ गुरुचरणींचं पाणी जो त्रिभुवनांतील सर्व तीर्थाहून श्रेष्ठ मानतो; ४९ श्रीगुरूंचें उ अन्न जर कदाचित् लाभलें, तर त्याच्यापुढे जो आत्मसमाधीचेही महत्त्व कांहींच समजत नाहीं ; ४५० अर्जुना, श्रीगुरु चालत असतां, त्यांच्या पायांपासून जे धुळीचे कण मागें उडत असतात, त्यांतील एक परमाणूही जो मोक्षसुखाच्या मोबदला घेण्यास उत्सुक असतो; ५१ पण हें पुरे झालें, याचा विस्तार किती करावा ? गुरुभक्तीला खरोखरच सीमा नाहीं; केवळ गुरुभक्तीचा उभडा आल्यामुळे हा पाल्हाळ केला आहे, झालें. ५२ अर्जुना, ज्याला या भक्तीची आवड आहे, ज्याला हिच्याबद्दल पैज २ उचंबळून आलेले मन.