पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ૮ म्यां होइजेल | गंधरूपें कीजेल । घ्राणसेवा ॥ २९ ॥ एवं बाह्यमनोगत | श्रीगुरुसेवा समस्त | वेंटाळीन वस्तुजात । होऊनियां ॥ ४३० || जंव देह हैं असेल । तंव वोळगी ऐसी कीजेल | मग देहांती नवल | बुद्धि आहे ॥ ३१ ॥ इये शरीरींची माती । मेळवीन तिये क्षिती । जेथ श्रीचरण उभे ठाती । श्रीगुरूचे ॥ ३२ ॥ माझा स्वामी कवतिकें | स्पर्शजति जियें उदकें । तेथ लया नेईन निकें । आप आप || ३३ || श्रीगुरु वोंवाळिजती । कां भवनीं जे उजळिजती । तयां दीपांचिया दीप्तीं । ठेवीन तेज ॥ ३४ ॥ चंवरी हन विंजणा | तेथ लयो करीन प्राणा । मग आंगाचा वोळंगणा । होईन मी ||३५|| जिये जिये अवकाशीं । श्रीगुरु असती परिवारेंसी । आकाश लया आकाशीं । नेईन तिये || ३६ || परि जीतु मेला न संडीं । निमेषु लोकां न घडीं । ऐसेनि गणाविया कोडी | कल्पांचिया ||३७|| येतुलेवरी विसा । जयाचिया मानसा । आणि करूनियांहि तैसा । अपारु जो ॥ ३८ ॥ रात्र दिवस नेणे । थोडें वहु न म्हणे । म्हणियाचेनि दाटपणें । साजा होय ॥ ३९ ॥ तो व्यापारु येणें नांवें । गगनाहूनि थोरावे | एकला करी आघवें । एकेचि काळीं ॥ ४४० ॥ हृदयवृत्तीपुढां । आंगचि घे देवडा | मानवेल, तो रस आणि तो सुवास मीच होईन." २९ याप्रमाणें सर्व वस्तुमात्र आपण होऊन समस्त गुरुसेवेला आपण एकट्याने कंवटाळावें, असें तो दृश्य सेवेसंबंधे आपले मनांत म्हणत असतो. ४३० जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अशी सेवा केली जाते, आणि देहपात झाला म्हणजे गुरुसेवेचा कांहीं निराळाच प्रकार त्याच्या बुद्धीला सुचतो. ३१ तो म्हणतो, “ देहपात झाल्यावर या शरीराची माती त्याच जमिनींत मी मिसळीन कीं जेथें श्रीगुरूचे चरण उभे राहात असतात. ३२ माझे गुरु ज्या पाण्याला सहज स्पर्श करीत असतील, त्या पाण्यांत आपल्या शरीरांतील जलांश मिळवून टाकीन. ३३ जो दिवा श्रीगुरु ओंवाळतात किंवा जो दिवा त्यांच्या घरांत लावला जातो, त्या दिव्याच्या तेजांत मी आपल्या शरीरांतील तेजोंश घालीन. ३४ गुरूंची चवरी किंवा पंखा यांच्या ठिकाणी मी आपला प्राणवायु ठेवीन म्हणजे मला गुरुमूर्तीची सेवा व स्पर्श हीं दोन्ही लाभतील. ३५ ज्या ज्या स्थळीं गुरुमूर्ति असेल, तेथील आकाशतत्त्वांत मी आपल्या शरीरांतील आकाशांश लीन करीन, ३६ मी जीवंत असलों कीं मेला असलों, तरी हें गुरुसेवेचं व्रत म्हणून कधीही सोडणार नाहीं. अशा सेवेच्या कल्पांतकोटी मोजीत असतां, एक क्षणभरसुद्धां ही सेवा दुसन्या कोणास करूं देणार नाहीं." ३७ अशा थाटाचं धैर्य ज्याच्या अंगीं आहे, आणि ज्याच्या गुरुसेवेला स्थलकालाची वगैरे कांहीं मर्यादा नसते; ३८ जो सेवा करीत असतां रात्र - दिवस जाणीत नाहीं कीं थोडें फार म्हणत नाहीं; उलट गुरूंनी आज्ञा केलेल्या कामगिरीच्या कठीणपणानें जो अधिकच ताजा टवटवीत होतो; ३९ गुरूंनी सांगितलेले काम जरी गगनापेक्षां मोठे असले, तरी जो एकटाच उरकून टाकतो; ४४० गुरूंनीं कार्याची आज्ञा केली कीं ज्याच्या मनापूर्वी शरीरच १ धांव. ६१