पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८० सार्थ श्रीज्ञानेश्वरी द्वारपाळु || १६ || पाउवा मी होईन । तियां मीचि लेववीन । छत्र मी आणि करीन । वारीपण ॥ १७ ॥ मी तळ उपरु जाणविता | चंवरधरु हातु देता । स्वामीपुढें खोलता | होईन मी ॥ १८ ॥ मीचि होईन सांगळा । करूं सुईन गुरुळां । सांडिती तो नेपळा । पडिघा मीचि ।। १९ ।। हर्डेप मी वोळगेन । मीचि उगा घेईन । उळिंग मी करीन । आंघोळीचें ॥ ४२० ॥ होईन गुरूचें आसन | अळंकार परिधान | चंदनादि होईन उपचार ते ॥ २१ ॥ मीच होईन सुरु । वोगैरीन उपाहारु । आपणपें श्रीगुरु । ववाळीन ||२२|| जे वेळी देवो आरोगिती । तेव्हां पांतीकरू मीचि पांती । मीचि होईन पुढती । देईन fast ॥ २३ ॥ ताट मी काढीन । सेज मी झाडीन । चरणसंवाहन । मीचि करीन ॥ २४ ॥ सिंहासन होईन आपण । वरि गुरु करिती आरोहण । होईन पुरेपण | वोळंगेचें ॥ २५ ॥ श्रीगुरूचें मन । जया देईल अवधान । तो मी पुढां होईन । चमत्कारु ॥ २६ ॥ तया श्रवणाचे आंगणीं । होईन शब्दांचिया अक्षौहिणी । स्पर्श होईन घसणी | आंगाचिया ॥ २७ ॥ श्रीगुरूचे डोळे | अवलोकनें स्नेहाळें । पाहती तियें सकळें । होईन रूपें ॥ २८ ॥ तिये रसने जो जो रुचेल । तो तो रसु पाहरा करीन. १६ मीच त्यांच्या पादुका होऊन त्या मीच त्यांच्या पायांवर चढवीन. मीच छत्रीही होईन, आणि आळीपाळीची चाकरीही मीच करीन. १७ वाटेच्या उंचसखलपणाची मीच इशारत देईन. त्यांचा चवरी वारणारा, हात देणारा, आणि दिवटी धरणाराही मीच होईन. १८ मीच त्यांची झारी होऊन त्यांना गुळा देईन आणि ते जो चूळ टाकतील त्याला धरणारा पडधाही मीच होईन. १९ त्यांचें पानदान मीच होईन आणि ते जो विड्याचा चोथा थुंकतील तोही मी घेईन. त्यांच्या स्नानाची तयारीही मीच करीन. ४२० त्यांचें आसन, अलंकार, वस्त्र, व चंदनादि उपचार मी होईन. २१ मी सैंपाकी होऊन त्यांना अन्नाचा महानैवेद्य वाढीन आणि आपल्या आत्म्याने त्यांना ओवाळीन. २२ श्रीगुरुदेव जेव्हां जेवतील, तेव्हां त्यांच्या पंक्तीला मीच बसेन आणि भोजनानंतर मीच पुढे होऊन त्यांना विडा देईन. २३ त्यांचे ताट मी काढीन, त्यांचे अंथरूण घालीन, आणि पायही चेपीन. २४ मी मंत्रक होईन आणि त्यावर मग गुरुमहाराज बसतील. एकंदरीत मी गुरुसेवेचा अगदीं कळस करीन. २५ नंतर श्रीगुरूंचें मन ज्यांत रमेल तो चमत्कारविनोदही मीच होईन. २६ त्यांचे ग्रंथश्रवण चाललें असतां शब्दांचे समूह मीच होईन; आणि ते जेव्हां अंग खाजवतील तेव्हां स्पर्शज्ञानाचे रूपही मीच धरीन. २७ जे जं म्हणून श्रीगुरु स्नेहपूर्ण दृष्टीने पाहतील तें तें रूप मीच धारण करीन. २८ त्यांच्या जिभेला जो जो रस आवडेल, त्यांच्या नाकाला जो जो सुवास ३ चुळाला. ४ पानदान. ५ थुंकलेला चोथा ६ साहित्य, तयारी. ८ वाटीन, १ दिवटी धरणारा. २ झारी. ९ जेवतात. १० सेवेचें. ११ समूह. ७ सैंपाकी