पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा ૪૦૨ माग म्हणती ॥ ४ ॥ तैसिया साचा उपास्ती | गोसावी प्रसन्न होती । तेथ मी विनंति | ऐसी करीन ॥ ५ ॥ म्हणेन तुमचा देवा । परिवारु जो आघवा । . येतुले रूपें होआवा । मीचि एक ॥ ६ ॥ आणि उपकरती आपुली | उपकरणें आथी जेतुलीं । माझीं रूपें तेतुलीं । होआवीं स्वामी ॥ ७ ॥ ऐसा मागेन वरु | तेथ हो म्हणती श्रीगुरु । मग तो परिवार | मीचि होईन ॥ ८ ॥ उपकरणजात सकळिक । तें मीचि होईन एकैक । तेव्हां उपास्तीचे कौतुक | देखिजेल ॥ ९ ॥ गुरु बहुतांची माये । परि एकलौति होऊनि ठाये । तैसें करून आण वाये । कृपे तिये ॥ ४१० ॥ तया अनुरागा वेधु लावीं । एकपत्नीव्रत घेववीं | क्षेत्रसंन्यासु करवीं । लोभाकरखीं ॥ ११ ॥ चतुर्दिक्षु वारा | न लाहे निघों बाहिरा । तैसा गुरुकृपे पांजिरा । मीचि होईन ॥ १२ ॥ आपुलिया गुणांची लेणीं। करीन गुरुसेवे स्वामिणी । हें असो होईल गंवसणी । मी भक्तीसी ॥ १३ ॥ गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं । ऐसिया मनोरथांचिया सृष्टि । अनंता रची || १४ || म्हणे श्रीगुरूचें भवन । आपण मी होईन । आणि दास होऊनि करीन । दास्य तेथिंचें ॥ १५ ॥ निर्गमागमी दातारें । जे वोलांडिजती उंबरे । ते मी होईन आणि दारें । । । करीन, कीं, त्यांनीं प्रसन्न होऊन म्हणावें, 'वाहवा रे शिष्य ! तुला काय पाहिजे तो आतां वर माग ! '४ आणि अशा प्रकारें गुरु खरोखर प्रसन्न झाले, म्हणजे मी त्यांना विनंति करीत म्हणेन, " स्वामीमहाराज, तुमचा जो कांहीं परिवार असेल, तो सर्व परिवार मी एकट्यानेच व्हावें, अशी इच्छा आहे. ५,६ आणि तुमच्या उपयोगास येणारीं जीं जीं उपकरणी आहेत, त्यांचें रूपही मींच धरावें. " ७ असा मी स्वामींजवळ वर मागेन, आणि मग ते, 'तथास्तु' म्हणतील, आणि मी एकटाच त्यांचा सर्व परिवार होईन. ८ मी जेव्हां त्यांची सर्व उपकरणी होईन, तेव्हांच गुरुसेवेचें खरें कौतुक इस पडेल. ९ गुरुराज ही सर्वाची माउली आहे, पण ती माझ्या एकट्याचीच होईल, अशा तऱ्हेची किट भीड मी त्यांना घालीन. ४१० त्यांच्या प्रेमालाही मी असें वेधीन, कीं, त्यांनी माझ्याशी एकपत्नीव्रताप्रमाणे आचरण ठेवावें; आणि गुरूंच्या प्रेमानें निरंतर माझ्या शिंवंत रहावें असें त्यांच्याकडून क्षेत्रसंन्यासव्रत आचरवीन. ११ जसा नित्य वाहणाराही वारा चार दिशांच्या गराड्या- बाहेर जात नाहीं, तसा गुरुकृपेलाही मी पिंजरा होऊन कोंडून धरीन. १२ श्रीगुरुसेवास्वामिणीला मी आपल्या सर्व सद्गुणांच्या नगांनी सजवीन; इतकेंच नव्हे, तर गुरुभक्तीची गंवसणी मी एकटाच होईन आणि दुसऱ्या कोणालाही ती होऊ देणार नाहीं. १३ गुरूंच्या प्रसादाचा पाऊस पडूं लागला, म्हणजे त्याच्या खाली मीत्र पृथ्वी होऊन राहीन." अशा प्रकारचे मनोरथाचे अनंत मनोरे तो रत्रीत असतो. १४ तो म्हणतो, “मी श्रीगुरूंचें घर होईन आणि तेथे दासासारखा रावेन. १५ उदार दाते गुरुस्वामी जातायेतां जे उंबरठे ओलांडतील ते उंबरंतु मीच होईन आणि द्वारांशीं द्वारपाळ होऊन मीच