पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૪૭૮ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अनुरागु भरे अंतरीं । कीं तया नाम करी । क्षीराब्धि ॥ ९२ ॥ तेथ ध्येयध्यान बहु सुख । तेच शेपतुळिका निर्दोख । वरि जळशयन देख | भावी गुरु ॥ ९३ ॥ मग वोळगती पाय । ते लक्ष्मी आपण होय । गरुड होऊनि उभा राहे । आपणचि ॥ ९४ ॥ नाभीं आपण जन्मे । ऐसें गुरुमूर्तिप्रेमें। अनुभवी मनोधर्मे । ध्यानसुख ॥ ९५ ॥ एकाधिये वेळे | गुरु माय करी भावबळें । मग स्तन्यसुखें लोळे | अंकावरी ॥ ९६ ॥ ना तरी गा किरीटी । चैतन्यतरुतळवटीं । गुरु धेनु आपण पाठीं । वत्स होय ॥ ९७ ॥ गुरुकृपास्नेहसलिलीं । आपण होय मासोळी । कोणे एके वेळीं । हेंचि भावी ॥ ९८ ॥ गुरुकृपामृताचें वडप | आपण सेवावृत्तीचें होय रोप | ऐसेसे संकल्प । विये मन ॥ ९९ ॥ चक्षुपवीण | पिल्लं होय आपण । कैसें पें अपारपण | आवडीचें ॥ ४०० ॥ गुरूतें पक्षिणी करी । चारा घे चांचूवरी । गुरु तारू घरी । आपण कास ॥ १ ॥ ऐसे प्रेमाचेनि थावें । ध्यानचि ध्यानातें प्रसवे । पूर्णसिंधू हेलावे | फुटती जैसे ॥ २ ॥ किंबहुना यापरी । श्रीगुरुमूर्ति अंतरीं । भोगी आतां अवधारीं । वाह्यसेवा ॥ ३ ॥ तरि जीवीं ऐसे आवांके । म्हणे दास्य करीन निकें । जैसेनि गुरु कौतुकें | 1 तो त्याला क्षीरसमुद्र हें नांव देतो. ९२ या प्रेमसमुद्रांत ध्यानसुखाच्या निर्मळ शेषमंचकावर गुरुरूपी नारायण जळसंत्र्यांत निद्रा करीत आहेत. ९३ मग या गुरुनारायणाची पाय चुरणारी लक्ष्मी तो स्वतःच होतो, आणि जवळ हात जोडून उभा असणारा गरुडही आपणच बनतो ! ९४ त्या गुरुनारायणाच्या नाभिकमळापासून जन्मणारा ब्रह्मदेवही तो स्वतःलाच कल्पितो. अशा रीतीनें तो गुरुमूर्तीच्या प्रेमानें मानसिक ध्यानसुखाचा अनुभव घेतो. ९५ एकादे वेळीं श्रीगुरु ही आपली आई आहे, अशी कल्पना करून तो तिच्या मांडीवर लोळतो व स्तनपानाचा सोहळा उपभोगतो. ९६ किंवा, अर्जुना, ज्ञानवृक्षाच्या शीतळ छायेत श्रीगुरु ही धेनुमाता आहे अशी संभावना करून तो स्वतः तिचें वांसरू होतो. ९७ किंवा एकादे वेळीं तो अशी भावना करतो, की, श्रीगुरुकृपा हे पाणी आहे आणि आपण स्वतः त्यांत मासळी झालों आहों. ९८ किंवा गुरुकृपा ही पर्जन्यवृष्ट आहे आणि आपण त्या वृष्टीने वाढणारे सेवावृत्तिरूपी रोप आहों, अशीही त्याची कल्पना कधीं कधीं भरारते. ९९ अरे, या आवडीच्या प्रकारांना कांहीं अंतच नाहीं. तो कधीं कधीं असें कल्पितो, कीं, ज्याला अझून चोंच व पंख नीटसे फुटले नाहींत, असें आपण एक पक्ष्याचे पिलूं आहों ! ४०० आणि गुरु ही माता पक्षीण आहे आणि तिच्या चोंचींतून आपण चारा घेत आहीं, असें तो समजतो. कधीं तो गुरूला तारू मानितो आणि त्याच्या कामेला आपण लागलो आहों, अशी कल्पना करतो. १ अशा प्रकारें, जसें उधानास चढलेल्या समुद्राला लावे येतात, तशी त्याच्या प्रेमाच्या लोंढ्यानें ध्यानाची परंपरा चालू राहते. २ सारांश, अशा रीतीने तो आपल्या मनानें निरंतर गुरुमूर्तीचा उपभोग घेत असतो, आतां, तो श्रीगुरुची दृश्य सेवा कशी करतो, तें ऐक. ३ त्याच्या मनांत नेहमीं असें वागत असतें, कीं " मी श्रीगुरूंची अशी सेवा