पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. अध्याय तेरावा AGE वरि पडलिया पीयूषधारा । नाना अल्पोदकींचा सागरा | आला मासा ॥८१॥ ना तरी के निधान देखिलें । कां आंधळया डोळे उघडले । भणंगाचिया आंगा आलें | इंद्रपद ॥ ८२ ॥ तैसें गुरुकुळाचेनि नांवें । महासुखें अति थोरावे । जे कोडंही पोटाळवे । आकाश कां ॥ ८३ ॥ पैं गुरुकुळीं ऐसी | आवडी जया देखसी | जाण ज्ञान तयापासीं । पोइकी करी ॥ ८४ ॥ आणि अभ्यंतरिलियेकडे | प्रेमाचेनि पवाडें । श्रीगुरूचें रूपडें । उपासी ध्यानीं ॥ ८५ ॥ हृदयशुद्धीचिया आवारी । आराध्य तो निश्चल ध्रुव करी । मग सर्व भावेंसी परिवारीं । आपण होय ॥ ८६ ॥ कां चैतन्याचिये पोवेळीं । माजीं आनंदाचिया राउळीं । श्रीगुरुलिंगा ढाळी | ध्यानामृत ॥ ८७ ॥ उदैजतां वोधार्काी | बुद्धीची डाळ सात्त्विका । भरोनियां त्र्यंबका । लाखोली वाहे ॥ ८८ ॥ काळशुद्धी त्रिकाळीं । जीवदशा धूप जाळी । ज्ञानदीपें वोंवाळी | निरंतर ॥ ८९ ॥ सामरस्याची रससोय । अखंड अर्पितु जाय । आपण भराडा होय । गुरु तो लिंग ॥ ३९० ॥ ना तरी जीवाचिये सेजे । गुरु कांतु करूनि भुंजे । ऐसी प्रेमाचेनि भोजें । बुद्धि वाहे ॥ ९९ ॥ कोएके अवसरी । व्हावा, किंवा लहानशा डबक्यांतला मासा सागरांत पडावा, किंवा अठरा विश्वे दरिद्याला गुप्त ठेवा दिसावा, अथवा आंधळ्याला दृष्टि यावी, किंवा एकाद्या भणंगाला इंद्रपद लाभावें, ८१, ८२ तसा गुरुकुळाचे नांव ऐकिल्याबरोबर जो सुखरसानें ओतप्रोत भरून येऊन इतका फुगतो, कीं, आकाशालासुद्धां त्यानें सहज आपल्या कवेंत कवटाळावें; ८३ अशा प्रकारची गुरुकुटाची आवड ज्याच्या ठिकाणीं तुला आढळेल, त्याच्या सेवेला ज्ञान निरंतर सिद्ध असतें, असें, अर्जुना, तूं समजावेंस. ८४ तो आपल्या अंतःकरणांत प्रेमगुणाच्या सामर्थ्यानें श्रीगुरूची मूर्ति उपस्थित करून तिची ध्यानद्वारे उपासना करतो. ८५ आपल्या हृदयाच्या निर्मळपणाच्या कोटांत आपल्या आराध्य गुरुदेवतेला अढळपणे बसवून, आपण स्वतःच त्याचा सर्व परिवार मोठ्या भक्तिभावानें होतो. ८६ ज्ञानाच्या चतन्यावर आत्मानंदाच्या मंदिरांत श्रीगुरुमूर्तीची स्थापना करून तो तिच्यावर ध्यानामृताची धार धरतो. ८७ ब्रह्मबोधाचा सूर्योदय होतांच बुद्धीची परडी सात्त्विक भावांनी भरून त्यांची लाखोली श्रीगुरूप शंकराला तो वाहतो. ८८ दिवसाच्या तीन्ही सांजा ( म्हणजे सकाळी, मध्याह्नीं व सायंकाळी ) शास्त्रोक्त वेळीं जीवभावाचा धूप जाळून, ज्ञानाच्या दिव्याने तो गुरुदेवतेला नेहमीं ओवाळतो. ८९ मग याचा नैवेद्य सगळाच अर्पण करतो. अशा रीतीनं तो स्वतः पुजारी होतो आणि गुरु आराध्यदेवतेची मूर्ति होतो. ३९० किंवा एकादे वेळी त्याची बुद्धि जीवाच्या शय्येवर गुरुराजाला पति कल्पून त्याच्या संगतीचं सुख भोगते आणि प्रेमाचे कौतुक अनुभवते. ९१ एकादे वेळी त्याच्या अंतरंगांत प्रेमाचा असा लोट येतो, कीं, १ सेवा. २ ज्ञानाच्या. ३ ओट्यावर. ४ डाळी, परडी,