पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अवधारीं । चतुरनाथा ।। ६९ ।। आघवियाची दैवां । जन्मभूमि हे सेवा | जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातेंही ॥। ३७० ।। ते आचार्योपास्ति । प्रकटिजैल तुजप्रती । वैलों दे एकांती | अवधानाची ॥ ७१ ॥ तरि सकळ जळसमृद्धि । घेऊनि गंगा निघाली उदधी । कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहाली ॥ ७२ ॥ नाना वेंटाळूनि जीवितें । गुणागुण रेखितें | प्राणनाथा उचितें | दिधलें प्रिया ॥ ७३ ॥ तैसें सवाद्य आपुलें । जेणें गुरुकुळीं वोपिलें । आपणपें केलें । भक्तीचें घर ॥ ७४ ॥ गुरुगृह जये देशीं । तो देशुचि वसे मानसीं । विरहिणी कां जैसी । वल्लभातें ।। ७५ ।। तियेकडोनि येतसे वारा। देखोनि धांवे सामोरा । आड पडे म्हणे घरा । वीजें कीजो ॥ ७६ ॥ साचा प्रेमाचिया भुली । तया दिशेसीचि आवडे बोली । जीवु थानापति करूनि घाली । गुरुगृही जो ॥ ७७ ॥ परि गुरुआज्ञा धरिलें । देह गांवीं असे एकलें । वांसरुवा लाविलें । दावें जैसें ॥ ७८ ॥ म्हणे के हैं विरडें फिटेल । के तो स्वामी भेटेल | युगाहनि वडिल | निमिप मानी ।। ७९ ।। ऐसेया गुरुग्रामींचें आलें । कां स्वयें गुरूंनींचि धाडिलें । तरी गतायुष्या जोडलें । आयुष्य जैसें ॥। ३८० ।। कां सुकतया अंकुरा । यानंतर तुला गुरुभक्तीची रीति कथन करतों, ती लक्ष देऊन ऐक. ६९ ही गुरुसेवा म्हणजे भाग्यांची जननी आहे, कारण ज्या जीवाची स्थिति शोक करण्यासारखी आहे, त्या जीवालाही ही ब्रह्मस्वरूप प्राप्त करून देते. ३७० अशा प्रकारची ती गुरुभक्ति मी तुला प्रकट करून सांगणार आहें, तूं आपले अवधान आतां अगदीं एकाग्र कर. ७१ अरे, सर्व जळाची संपत्ति बरोबर घेऊन जशी नदी समुद्राकडे जावी, किंवा सर्व महासिद्धान्तांसह वेदविद्या ब्रह्मपदीं स्थिर व्हावी; ७२ किंवा जशी सती स्त्री आपले पंचप्राण एकत्र गोळा करून आपल्या सर्व गुणावगुणांसह ते आपल्या प्रियपतीस अर्पण करते; ७३ तसें ज्यानें आपलें सर्वस्व गुरुकुलाला अर्पण केलें आहे, आणि जो स्वतः गुरुभक्तीचं माहेरघर झाला आहे; ७४ ज्याप्रमाणें विरहिणी स्त्री आपल्या पतीचें चिंतन करीत असते, त्याप्रमाणं जो गुरुगृहाच्या स्थानाचें निरंतर चिंतन करतो; ७५ त्या स्थानाकडून वारा येतांना पाहून जो त्याच्या सन्मानार्थ धांवत सामोरा जातो, आणि लोटांगण घालून, 'माझ्या घरी या,' अशी प्रार्थना करतो. ७६ खया प्रेमाच्या भुलावणीनं ज्याला नेहमीं गुरुगृहाच्या दिशेवरोबरच बोलणं आवडतं, आणि जो आपल्या जीवाला गुरुगृहींचा ठाणगा करून ठेवतो; ७७ जसे वासरूं दाव्यानं गोठ्यांत बांधलेलें असतें, तसें ज्याचं शरीर गुरूच्या आज्ञेनें बांधल्यामुळेंच गुरूपासून दूर आपल्या गांवीं डांबून राहते; ७८ पण त्या वासराप्रमाणेंच जो निरंतर मनांत म्हणत असतो, कीं, " या दाव्याची ही गुळखी केव्हां तुटेल आणि त्या गुरुस्वामीचे दर्शन मला केव्हां होईल ?” गुरुविरहाचा प्रत्येक क्षण ज्याला युगाहूनही मोठा वाटत असतो; ७९ अशा स्थितीत जर कोणी गुरूंच्या गांव माणूस आले किंवा गुरूंनीच कोणास त्याच्याकडे पाठविलें, तर मरणाराला आयुष्य लाभल्याप्रमाणे ज्याला वाटते; ३८० किंवा सुकणाऱ्या अंकुरावर जसा अमृताचा वर्षाव १ सर्व, २ आगमन, ३ ठाणेदार,