पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/५००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा 1 ४७५ तें ॥ ५७ ॥ जे जगेंचि सनोळख | जगेंसीं जुनाट सोयरिक | आप पर है भाख । जाणणें नाहीं ॥ ५८ ॥ भलतेणेंसी मेछु । पाणिया ऐसा ढाळु । कवणेविखीं आळु | नेघे चित्त ॥ ५९ ॥ वारियाची धांव । तैसे सरळ भाव । शंका आणि हांव | नाहीं जया || ३६० || मायेपुढे बाळका | रिगतां न पडे शंका | तैसें मन देतां लोकां । नांलोची जो ॥ ६१ ॥ फांकलिया इंदीवरा । परिवारू नाहीं धनुर्धरा । तैसा कोनकोंपरा | नेणेचि जो ॥ ६२ ॥ चोखाळपण रत्नाचें । रत्नावरी किरणाचें । तैसें पुढां मन जयाचें । करणें पाठीं ॥ ६३ ॥ आलोचूं जो नेणे । अनुभवचि जोगावणें । धरी मोकली अंतःकरणें । नव्हेचि जया ॥ ६४ ॥ दिठी नोहे मिणी । बोलणें नाहीं संदिग्ध । कवणेंस हीनबुद्धी | राहटीजे ना ॥ ६५ ॥ दाही इंद्रियें प्रांजळें । निष्प्रपंचें निर्मळें । पांचही पालव मोकळे । आठही पाहर ॥ ६६ ॥ अमृताची धार । तैसें उजू अंतर । किंबहुना जो माहेर । या चिन्हांचें ॥ ६७ ॥ तो पुरुष सुभटा | आर्जवाचा आंगवटा । जाण तेथेंचि घरटा । ज्ञानें केला || ६८ || आतां ययावरी । गुरुभक्तीची परी । सांगों गा नवागतां, सर्वाशीं एका परीचें वर्तन ठेवतें; ५७ कारण, जगाची स्थिति खरीखरी ओळखल्यामुळें, जगाबरोबर आपला आत्मैक्याने अगदीं पुरातन निकट संबंध आहे, हें पुरं वाणल्यामुळें, आपपरभावाचें ज्याला भानच होऊं शकत नाहीं; ५८ पाण्याप्रमाणें जो कोणत्याही व्यक्तीशीं मिसळून जातो; ज्याचें चित्त कोणाहीविषयी आढी बाळगीत नाहीं; ५९ ज्याचे विचारविकार नेहमीं वाऱ्याच्या प्रवाहासारखे सरळच वाहतात, आणि ज्याला शंका किंवा कोणत्याही गोष्टीची ओढ यांचा स्पर्शही होत नाहीं; ३६० आईच्यापुढे यायला जशी मुलाला शंका वाटत नाहीं, तशा लोकांपुढे आपल्या मनोवृत्ति प्रकट करतांना ज्याला अवघड वाटत नाहीं; ६१ अर्जुना, एकदां कमळ उमललें, म्हणजे जसा त्याचा कोणताही भाग मिटलेला राहात नाहीं, त्याप्रमाणें ज्यांचे मन उघडलें म्हणजे त्याला कोठेही झांकलेला किंवा लपविलेला कोनकोंपरा उरत नाहीं; ६२ आधीं रत्न स्वच्छ असावें, तशांत त्यावर तेजस्वी किरण पडावा, त्याप्रमाणें ज्याचें मन मूळचेच निर्मळ आहे, आणि त्या मनामागून घडणारी क्रियाही तितकीच निर्मळ असते; ६३ 'सांगूं, न सांगूं, ' असें जो कधींच न करता, खराखरा अनुभव प्रकट करतो; मन अर्धवट झांकणें, अर्धवट उघडणें, हें ज्याला मुळींच माहीत नाहीं; ६४ ज्याच्या दृष्टींत ओशाळेपणा नसतो, ज्याच्या बोलण्यांत अर्धवट किंवा अस्पष्ट कांहींच नसते; जो कोणाबरोबरही हलकटपणानें वर्तत नाहीं; ६५ ज्याचीं दाही इंद्रियें अगदीं निष्कपट, मोकळी, व शुद्ध असतात; दिवसाचे आठी प्रहर ज्याच्या प्राणाचे पांची पदर मोकळे, उघडे, असतात; ६६ अमृताच्या धारेप्रमाणें ज्याचें अंतरंग सरट असतें; पुरुषाचे ठिकाणी सुखाने नांदत असतात; ६७ वीरश्रेठा अर्जुना, तो आहे व त्याच्याठायीं ज्ञान आपले घर करून राहतें, असें समज. ६८ १ विचारांत पडत नाहीं. सारांश, हीं सर्व चिह्न ज्या पुरुष आर्जवगुणाचा पुतळा आतां, चतुरश्रेष्ठा अर्जुना,