पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जेणें तोपें मानवे । अनपेक्षिताही करवे । मानु तोचि ॥ ४५ ॥ जो मानापमानातें साहे । सुखदुःख जेथ सामा ये। निंदास्तुती नोहे । दुखंड जो ॥ ४६ ॥ उन्हाळेनि जो न तपे । हिमवंतीं न कां । कायसेनिही न वासिपे । पातलेया ॥ ४७ ॥ स्वशिखरांचा भारु । नेगे जैसा मेरु । कीं धरा यज्ञसूकरु | वोझें न म्हणे ॥ ४८ ॥ नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती । तैसा नाना दंडीं प्राप्तीं । घामेजेना ॥ ४९ ॥ घेउनी जळाचे लोट | आलिया नदीनदांचे संघाट | करी वाड पोट । समुद्र जेवीं ॥ ३५० ॥ तैसें जयाचियाठायीं । न साहणें कांहींचि नाहीं । आणि साहतु असे ऐसेंही । स्मरण रे || ५१ || आंगा जें पातलें । तें करूनि घाली आपुलें । तेथ साहतेनि नवलें । घेपिजेना ॥ ५२ ॥ हे अनाक्रोश क्षमा । जयापाशीं प्रियोत्तमा । जाण तेणें महिमा । ज्ञानासि गा ॥ ५३ ॥ तो पुरुष पांडवा | ज्ञानाचा वोलावा । आतां परिस आर्जवा । रूप करूं ॥ ५४ ॥ तरि आर्जव तें ऐसें । प्राणाचें सौजन्य जैसें । आवडे तयाही दोषे । एकचि गा ॥ ५५ ॥ तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेंविं चंडांशु | जगा एकुचि अवकाशु | आकाश जैसें ॥५६॥ तैसें जयाचें मन । माणुसप्रती आनान । नव्हे आणि वर्तन । ऐसें पैं स्वीकारतो; ४५ जो मानापमान सहन करतो, सुखदुःखांना सारखींच लेखतो, आणि निंदास्तुतीनें ज्याची चलबिचल होत नाहीं; ४६ जो उन्हानें तापत नाहीं, थंडीनं कांपत नाहीं, आणि कसाही प्रसंग आला तरी भागत नाहीं कीं भीत नाहीं; ४७ मेरुपर्वताला जसा आपल्या शिखरांचा भार वाटत नाहीं, किंवा नारायणाचा तिसरा अवतार जो यज्ञवराह तो जसा पृथ्वीच्या ओझ्याबद्दल कुरकुरत नाहीं, ४८ किंवा असंख्य भूतमात्राच्या दावाने पृथ्वी जशी दवत नाहीं, तसाच जो सुखदुःख इत्यादि द्वंद्वे अंगास लागलीं असतां घावरा होत नाहीं; ४९ नदनद्यांचे समुदाय पाण्याचे अपरंपार लोट घेऊन आले, तरी त्या सर्वाना सांठवण्यापुरतं आपले पोट समुद्र जसें मोठें करतो, ३५० तसें ज्याच्यासंबंधे, अमुक एक सहन करावयाचें नाहीं, असें कधींच घडत नाहीं; आणि इतके करूनही, 'आपण अमुकअमुक सहन करीत आहों' असं ज्याला मुदलींच भान नसतें; ५१ जें जें प्राप्त होतें तें तें जो आत्मस्वरूप मानून सहन करतो, त्याला सहनशीलतेचें कौतुक करण्याचें कारणच राहात नाहीं; ५२ तेव्हां अशा तऱ्हेची भेदभावविरहित जी क्षमा, ती, सख्या अर्जुना, ज्या पुरुषाच्या ठिकाणीं नांदते, त्या पुरुषामुळेच ज्ञान महत्त्वाला चढतें, असें समज. ५३ पार्था, तो पुरुष म्हणजे ज्ञानाचा आधार होय. असो, आतां आर्जवाचे निरूपण करतो, तें ऐक. ५४ कोणत्याही प्राण्यासंबंधें प्राणतत्त्व जसें एकाच प्रकारचें भलेपण दाखवते, तसंच आर्जव हेंही भेदभावरहित वर्तन ठेवते. ५५ जसा सूर्य कोणाचं तोंड पाहून, ते आवडल्यासच ) प्रकाश पाडतो असें घडत नाहीं, किंवा आकाशतत्त्व जसे सर्व अवकाशाला समभावानं व्यापून टाकतें, ५६ तसं ज्याचें मन माणसामाणसाशीं निरनिराळ्या प्रकारें १ कोणाच्याही. २ उद्देश, संबंधानें,