पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च । किं नो राज्येन गोविंद किं भांगैर्जीवितेन वा ॥ ३२ येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च । त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ३३ आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः । मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ३४ सम० न इच्छीं जयही कृष्ण राज्यही अथवा सुख । राज्यभोगें जीवितेंही गोविंदा काय आमुर्त ॥ ३२ ॥ राज्यभोगसुखं आम्ही ज्यांनिमित्त अपेक्षितों । टाकोनि प्राण धन ते उभे युद्धास राहिले ॥ ३३ ॥ गुरु द्रोणादि भीष्मादि हे आजे चुलते सुत । मामे श्वशुर नातू हे मेहुणे सोयिरे तसे ॥ ३४ ॥ आर्या इच्छीना मी कृष्णा गोविंदा राज्य भोगविजयांशी । नलगे स्वजनवधं मज जीवित आणि राज्यभोग विजयाशी जोडावे ज्यांसाठीं राज्यसुखा भोग तेचि हे निधना । आले सिद्ध मराया त्यागुनियां प्राणगेहमित्रधना३३ आचार्य आणि मातुल पौत्र पितामहहि पुत्र ही पितर । शालक आणि श्वशुरहि संबंधी इष्टमित्र आणि इतर अन्या - कृष्णा विजयाची चाड नाहीं । राज्यसुखाची गोडी नाहीं । राज्यभोग सकळही ॥ नलगे मज स्वामिया ३२ ज्यां कारण भोग बहुत | आपण होतों जी इच्छित । प्राणधान टाकूनि समस्त । युद्धा आले सर्वही ॥ ३३ ॥ पितृपुत्रपक्षींचे । वडील भीष्म आमुचे । द्रोण गुरु बोलिजे वाचे । मामे मेहुणे अवघेचि ॥ ३४ ॥ तया विजयवृत्ती कांहीं । मज सर्वथा काज नाहीं । एथ राज्य तरी कायी । हें पाहुनियां ॥। २१० ॥ या सकळांतें वधावें । मग जे भोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थ म्हणे ॥ ११ ॥ तेणें सुखेविण जें होईल । तें भलतैसें साहिजेल । वरी जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥ १२ ॥ परी यांसी धातु कीजे । मग आपण राज्यसुख भोगिजे । हें स्वमींही मन माझें । करूं न शके ||१३|| तरी आम्हीं कां जन्मावें । कवणालागीं जियावें । जरी वडिलां यां चिंतावें | विरुद्ध मनें ॥ १४ ॥ पुत्रातें इच्छी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ । जें निर्दळिजे केवळ । गोत्र आपुलें ॥ १५ ॥ हें मनींचि के विं धरिजे । आपण वज्राचेया होईजे । वरी घडे तरी कीजे । भले इयां ॥ १६ ॥ आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हें जीवितही उपकारावें । काजीं येयांच्या ॥ १७॥ आम्हीं दिगंतींचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोष- विजे कुळ । आपुलें जें ॥ १८ ॥ तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत । त्या विजयलाभाच्या आशेशीं मला कांहींच कर्तव्य नाहीं. हें एकंदर चित्र पाहिल्यावर, राज्यांत तरी काय अर्थ आहे ? २१० या सर्वांना ठार करावें आणि मग जे सुखोपभोग भोगावे, त्या उपभोगांना आग लागो ! " असें अर्जुन म्हणाला. ११ तो पुढें म्हणतो, "ते सुखोपभोग न लाभल्यामुळें कांहींही झाले, तरी तें सहन करितां येईल; किंबहुना, हें साधण्यासाठी प्राण वेंचावा लागला, तरीही पत्करेल. १२ परंतु यांचा वध करावा, आणि मग आपण राज्यसुख भोगावें, हें माझ्या मनाला स्वप्नांतही खपणार नाहीं ! १३ जर या गुरुजनांचें अनिष्ट आम्हीं मनांत चिंतावें, तर मग आम्हीं जन्मास तरी कशाला यावें, आणि आम्ही जगावें तरी कोणाकरितां ? १४ पुत्र व्हावा म्हणून जी प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते, तिचं फळ हेंच का, कीं आपण आपले गोत्रज समूळ नाहींसे करावे ? १५ आपण मनांत तरी आणावं कसें कीं आम्हीं यांच्याशीं वज्रासारखे कठोर होऊं ? उलट शक्य असेल तेवढे आम्हीं यांचें बरेंच करीत जावें. १६ आम्हीं जें जें संपादन करावें तें तें सर्व यांनीं भोगावं, किंबहुना, यांच्या कार्याकरितां आम्हीं स्वतांचे जीवितही भरीस घालावें. १७ दाही दिशांच्या राजे लोकांना जिंकून वास्तविक आम्हीं आपल्या गोत्रजांना संतुष्ट करावं. १८ आतां तेच हे आमचे १ जगावें.