पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावां ४७३ लागीं व्याज | ग्रंथाचें केलें ||३३|| तरि तुम्हां रसिकांजोगें । व्याख्यान शोधावें लागे । म्हणूनि जी मतांगें । वोलों गेलों ॥ ३४ ॥ तंव कथेसि पसरु जाहला । श्लोकार्थ दृरि गेला । कीजो क्षमा यया वोला । अपत्या मज ॥ ३५ ॥ आणि घांसाआंतिल हेर । फेडितां लागे वेळु । तें दूपण नव्हे खडेछु । सांडावा की ॥ ३६ ॥ कां संवैचोरां चुकवितां । दिवस लागलिया माता । कोपावें कीं जीविता । जिंता कीजे ॥ ३७ ॥ परि यावरील हैं नव्हे । तुम्हीं उपसाहिलें तेंचि बरवें । आतां अवधारिजो देवें । बोलिलें ऐसें ॥ ३८ ॥ म्हणे उन्मेर्खेसुलोचना । सावध होईं अर्जुना । करूं तुज ज्ञाना । वोळखी आतां ॥ ३९ ।। तरि ज्ञान गा तें एथें । वोळख तूं निरुतें । आक्रोशेंवीण जेथें | क्षमा असे || ३४० ॥ अगाध सरोवरीं । कमळिणी जियापरी । कां सदैवाचिया घरीं । संपत्ति जैसी ॥ ४१ ॥ पार्थी तेणें पाडें । क्षमा जयातें वाढे । तेही लक्षे तें फुडें । लक्षण सांगों ॥ ४२ ॥ तरि पडियंतें लेणें । आंगीं भावें जेणें । धरिजे तेविं साहणें । सर्वचि जया ॥ ४३ ॥ त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवांचे मेळावे । वरि पडिलिया नव्हे । वांकुडा जो ॥ ४४ ॥ अपेक्षित पावे । तें तुमची कृपा मला संपादन करावयाची आहे, आणि त्या हेतूस्तव हे ग्रंथरचनेचें मी नुसतं निमित्त केले आहे. ३३ म्हणून, तुम्हां रसिक श्रोत्यांना रुचेल असें शुद्ध, निर्दोष, निरूपण करणें प्राप्त आहे; या कारणास्तव मी निरनिराळ्या मतांचा ऊहापोह करण्याच्या भरीस पडलों. ३४ पण असें करण्यांत अवाच्या सवा विस्तार झाला आणि मूळश्लोकाचा अर्थ कोठल्या कोठेच राहिला ! तरीपण या बालकाला आपण क्षमा केली पाहिजे. ३५ अहो, अन्नाच्या घांसांतला खडा काढतांना जरा वेळ लागला, तर तो कांहीं दोष नव्हे, कारण खडा हा काढलाच पाहिजे. ३६ वाटेंत भेटलेल्या ठगाला चुकविण्यांत वेळ मोडल्यामुळे मुलाला घरी येण्यास उशीर झाला, तर आईनें त्याच्यावर रागवावें कीं त्याच्यावरून लिंबलोण उतरून त्याची दृष्ट काढावी ? ३७ परंतु, हें प्रकरण आणख लांबवणं योग्य नाहीं. आपण मला क्षमा केली, यांतच सर्व पावलें. आतां श्रीकृष्णदेव काय म्हणाले तें श्रवण करावे. ३८ भगवान् म्हणाले, " बा अर्जुना, ज्ञानांजनानें तुझी दृष्टि निवळली आहे, तर आतां सावध हो. तुला आतां खऱ्या ज्ञानाची ओळख करून देतो. ३९ अरे, जिच्यांत खेदाची यत्किंचितही भेसळ नाहीं, अशी 'क्षमा' ज्या ठिकाणीं नांदते, तेथेंच खरंखरें ज्ञान आहे, असें तूं ओळख. ३४० खोलखोल डोहांत जशा कमळाच्या वेली किंवा देवशाली पुरुषाच्या घरीं जशी संपत्ति, ४१ तशीच, अर्जुना, त्या पुरुषाच्याठायीं क्षमा भरारते; ही 'क्षमा' ओळखण्याचीं लक्षणें आतां तुला स्पष्टपणें सांगतों, तीं ऐक. ४२ आवडता दागिना ज्या आवडीनं आपण अंगावर धारण करतो, त्याच आवडीने जो सर्व कांहीं सहन करतो; ४३ तीन्ही प्रकारच्या तापांचे जरी डोंगर अंगावर कोसळले, तरी जो यत्किंचितही तेढा होत नाहीं; ४४ इष्ट वस्तूप्रमाणेच अनिष्ट वस्तूही जो बहुमानानें १ खडा, २ ठगाला. ३ र्निबलोण ४ ज्ञानाने स्वच्छ झाले आहेत डोळे ज्याचे अशा. ६०