पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी 1 बोलकेपणाचेनि क्षोभें । लाग सरूं न लभे । वोला प्रभु ॥ २२ ॥ सामान्या आणि विशेखा । सकळै कीजेल देखा । तरि कानाच्या मुखा । कडे न्याल ना तुम्ही ||२३|| शंकेचेनि गदळें । जैं शुद्ध प्रमेय मैळे । तैं मागुतिया पाउलीं पळे | अवधान येतें ॥ २४ ॥ कां करूनि बोबुळियेची बुंथी | जळें जियें ठाती । तयांची वास पाहाती । हंस काई ।। २५ ।। कां अभ्रापैलीकडे । जें येत चांदिणें कोडें । तें चकोरं चांचुवडें । उचलीतीना ||२६|| तैसे तुम्ही वास न पाहाल | ग्रंथु नेघा वरि कोपाल | जरी निर्विवाद नव्हैल | निरूपण ॥२७॥ न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें । तें व्याख्यान जी तुमतें | जोडूनि नेदी ॥ २८ ॥ आणि माझें तंव आघवें । ग्रंथन येणेंचि भावें । जे तुम्ही संत होआवें । सन्मुख सदां ॥ २९ ॥ एन्हवीं तरी साचोकारें । तुम्ही गीतार्थाचे सोइरे । जाणोनि गीता एकसरें । धरिली मियां ||३३०|| जे आपले सर्वस्व द्याल | मग येतें सोडवूनि न्याल | म्हणोनि ग्रंथु नव्हे बोल । साचचि हे ॥३१॥ कां सर्वस्वाचा लोभु धरा । बोलीचा अव्हेरु करा । तरि गीते मज अवधारा । एकचि गति ॥ ३२ ॥ किंबहुना मज | तुमचिया कृपा काज । म्हणून तुमच्यासारख्या जाणत्या संतांच्या सभेपुढे वक्तृत्व जरा जास्त रंगांत आलें, तर, महाराज, त्यांत दोषाला फारशी जागा खास नाहीं. २२ सामान्य श्रोते आणि विशेष अधिकारी श्रोते, यांतील संस्कृतिभेद लक्षांत न घेतां, जर सरसकट सगळ्यांना एकाच मालिकेंत ढकलून मी निरूपण करूं लागलों, तर तुम्ही त्याला आपल्या कानाच्या पाळीला शिवूही देणार नाहीं. २३ शुद्ध सिद्धांताच्या निरूपणाला शंकेचें समाधान न झाल्यामुळे गळपणा आला, कीं श्रोत्यांचे विषयाकडे वेधणारें लक्ष मागल्याच पावलीं पळत सुटतें ? २४ शेवाळीनं झांकलेलें जें पाणी असतें, त्याच्याकडे हंस ढुंकूनही पहात नाहींत ; २५ अथवा ढगांच्या आड चांदणें असले, तर चकोरपक्षी आपलीं चंचुपुढें उत्सुकतेनें वर उचलीत नाहींत, २६ तद्वत् जर मी आपले निरूपण निर्विवाद व निःशक केलें नाहीं, तर तुम्हीही श्रवणाविषयीं आदर दाखविणार नाहीं, ग्रंथाला हात लावणार नाहीं, इतकेंच नव्हे, तर आणखी तुम्ही रागालाही चढाल. २७ इतर मतांचें निराकरण करून, ज्यांत आक्षेपाचें तोंड बंद केलें नाहीं, तें विवेचन तुम्हाला ग्राह्य होणार नाहीं. २८ आणि मी जें हें ग्रंथाचें गुंफण करीत आहे, यांत माझा मुख्य हेतु असा आहे, कीं, तुम्ही संतजनांनी मला नेहमीं प्रेमाने व कृपेने पहावे. २९ खरोखर पाहिलें तर तुम्ही या गीतार्थाचे निकट संबंधी आहां, हे जाणूनच ही गीता मी आपल्या जीवाशी कवटाळली आहे. ३३० तेव्हां तुम्ही आपले ज्ञान सर्वस्व देऊन हिला सोडवून न्याल, असें मी समजतों; कारण, गीता हा ग्रंथ नव्हे, तर ही माझ्याजवळ ओलीस ठेविलेली तुमची वस्तू आहे ! ३१ आणि जर का तुम्ही आपल्या ज्ञान सर्वस्वाला लोभीपणानं माझ्यापासून चोरून ठेवाल आणि या गीतेला अशीच माझ्या गहाणांत डांबून कुवत राहू द्याल, तर या गीतेचा आणि माझा एकच परिणाम होईल ! ३२ सारांश १ शेवाळीची २ तारण, ओलीस दिलेली वस्तू.