पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा કર दंडीचा । जाहला ठायीं जयाचा । देखशील ॥। ११ ॥ तो जाण वेल्हाळ । ज्ञानाचे वेळीउळ । हें असो निखिळ । ज्ञानचि तो ॥१२॥ जे अहिंसा कानें ऐकिजे । ग्रंथाधारें निरूपिजे । ते पाहावी हैं उपजे । तैं तोचि पाहावा ||१३|| ऐसें म्हणितलें देवें । तें बोलें एकें सांगावें । परि फांकला हें उपसाहावें । तुम्ही मज ॥१४॥ म्हणाल हिरवे चारीं गोरूं । विसरे मागील मोहर धरूं । कां वारेलगें पाखरूं । गगनीं भरे ||१५|| तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्ति । वाहविला मती । आकळेना || १६ || तरि तैसें नोहे अवधारा । कारण असे विस्तारा । एहवीं पद तरी अक्षरां । तिहींचि ॥ १७ ॥ अहिंसा म्हणतां थोडी । परि ते चि होय उघडी । जैं लोटिजती कोडी | मतांचिया ॥ १८ ॥ एन्हवीं प्राप्त मतांतरें । थातंबूनि आंगभरें । वोलिजैल तें न सरे । तुम्हांपाशीं ॥ १९ ॥ रत्नपारखियांच्या गांवीं । जाईल गंडकी तरि सोडावी । काश्मीरी न करावी । मिडेंगण जेवीं ॥ ३२० ॥ काइसा वासु कापुरा । मंद जेथ अवधारा | पिठाचा विकरा । तियेसांतें || २१ || म्हणोनि इये सभे । देहानें, व वाचेनें, केलेला अहिंसेचा पूर्ण त्याग ज्या पुरुषांत तुला आढळेल. ११ तो पुरुष खरा ज्ञानविलासी किंवा ज्ञानाचें घरच समजावा; इतकंच नव्हे, तर तो मूर्तिमंत ज्ञानच आहे, असें जाण. १२ ज्या अहिंसेचा महिमा आपण कानाने ऐकितों व ग्रंथांच्या आधारे वर्णन केला जातो, ती अहिंसा प्रत्यक्ष पाहण्याची जर उत्कंठा उत्पन्न झाली, तर त्या पुरुषाला पहावें, म्हणजे काम होईल.” १३ असें कृष्णदेवांनीं अर्जुनाला सांगितल. हें वास्तविक मीं अगदी थोड्या शब्दांत कथन करावयास पाहिजे होतं, परंतु विवेचनाच्या भरांत पाल्हाळ बहुत झाला, याबद्दल तुम्हीं मला क्षमा करावी. १४ श्रोते हो, तुम्ही कदाचित म्हणाल कीं, "हिरवा चारा पाहिला म्हणजे गुरूं जसे आपला मागचा मार्ग विसरतें, किंवा वाऱ्याच्या झुळकीबरोबर वाहणारे पाखरू जसें आकाशांत भरारतें, १५ तसें याचं एकदा प्रेम स्फुरण पावून रसाळ भावनांच्या ओघांत हा सांपडला म्हणजे याचें चित्त याच्या ताब्यांत रहात नाहीं ! " १६ पण, श्रोतेजन हो, अशांतला खरा प्रकार नाहीं. या सर्व पाल्हाळाला निराळें कारण आहे. वास्तविक पाहिले तर 'अहिंसा' शब्द तीनच अक्षरांचा आहे. १७ तेव्हां अहिंसा म्हणजे काय हे अगदी थोडक्यांत सांगतां येण्यासारखें आहे असें वाटेल, पण अहिंसेची पूर्ण, स्पष्ट, व निःशंक फोड होण्याकरितां अनेक निरनिराळ्या मतांचं खंडण करणें अवश्य आहे. १८ नाहींतर, निरनिराळीं मतं आपल्यापुढे प्रत्यक्ष असतां, त्यांना केवळ स्वतःच्या घमंडीनं बाजूस ठेवून मी आपले विवेचन चालविलें, तर तें तुम्हांला खास खपणार नाहीं. १९ कोणी जव्हे यांच्या गावांत गेला, तर तेथें त्यानं रत्नं पारखण्याची गंडकी शिला ( म्ह० शालिग्राम ) बाहेर काढणंच योग्य; त्या ठिकाणीं स्फटिक मण्याची टिमकी वाजविण्यांत काय अर्थ १ ३२० उलटपक्षी, जेथे पिठाचीही विक्री होत नाहीं, तेथें कापराच्या वासाची चीज काय होणार ? २१ १ हिंसेचा, २ विलासी ३ निवासस्थान. ४ वर्णन, स्तोत्र.