पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/४९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७० सार्थ श्रीज्ञानेश्वरी आंवडे ते वृत्ति किरीटी । आधीं मनौनीचि उठी । मग ते वाचे दिठी | करांसि ॥ ९९ ॥ वांचूनि मनींचि नाहीं । तें वाचेसि उमटेल काई । वींवीण भुईं | अंकुर असे || ३०० ॥ म्हणोनि मनपण जैं मोडे । तैं इंद्रियां आधींचि उवडें । सूत्रधारेंवीण साइखडें । वावो जैसें ॥ १ ॥ उगमींचि वाळूनि जाये । तें वोघीं कैंचें वाहे । जीव गेलिया आहे । चेष्टा देहीं ॥ २ ॥ तैसें मन हैं पांडवा । मूळ या इंद्रियभावा । हेंचि राहटे आघवा । द्वारीं इहीं ॥ ३ ॥ परि जिये वेळीं जैसें । जें होऊनि आंतु असे । वाहेरि ये 'तैसें । व्यापाररूपें ॥ ४ ॥ यालागीं साचोकारें । मनीं अहिंसा थांबे थोरें । जैसी पिकली हैति आदरें । बोभात निघे ॥ ५ ॥ म्हणोनि इंद्रियें तेचि संपदा । वेचितां ह्रीं उदौवादा | अहिंसेचा धंदा | करितें आहाती ॥ ६ ॥ समुद्रीं दाटे भरितें । तैं समुद्रचि भरी तरियांतें । तैसें स्वसंपत्ति चित्तें । इंद्रियां केलें ॥ ७ ॥ हें बहु असो पंडितु । धरूनि बाळकाचा हातु । वोळी लिही व्यक्तु । आपणचि ॥ ८ ॥ तैसें दयालुत्व आपुलें । मनें हातापायां आणिलें । मग तेथ उपजविलें । अहिंसेतें ॥ ९ ॥ याकारणें किरीटी । इंद्रियांचिया गोठी । मनाचियेचि राहाटी । रूप केलें ||३१०|| ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु अर्जुना, हें ध्यानांत ठेव, कीं, ही अहिंसेची भावना प्रथम मनांतच जन्म पावते, आणि मग ती वाणी, दृष्टि, व हात यांचे ठिकाणीं प्रकट होते. ९९ नाहींतर, जें मनांतच नाहीं, तें वाणींत कसें उमटणार ? वियावांचून जमिनींतून कधीं कोंब फुटतात काय ? ३०० म्हणून मनाचें मनपण जेव्हां मोडतें, तेव्हां त्याच्यापूर्वीच इन्द्रियें उपडीं पडून निर्वळ झालेलीं असतात, कारण सूत्रधारावांचून कळसूत्री बाहुलीं व्यर्थच होतात. १ झऱ्याचा उगमच जर वाळून गेला, तर मग प्रवाहांत पाणी कसचें येणार ? जीवच गेला, मग देहाचे व्यापार उरले कोठें ? २ त्याचप्रमाणे, अर्जुना, मन हेंच सर्व इन्द्रियव्यापारांचें मूळ कारण आहे; इन्द्रियांच्या द्वारांनीं तेंच व्यवहार करीत असतें. ३ अंतःस्थ मन ज्या वेळीं ज्या स्थितींत असेल, त्या वेळीं त्याच स्थितींत तें क्रियेच्या रूपानें इन्द्रियद्वारा बाहेर प्रकट होतें. ४ ज्याप्रमाणे पिकलेल्या फळाचा सुगंध जोराने बाहेर उसळतो, त्याप्रमाणें मनांत खरोखर अहिंसा दाबून उत्पन्न झाली म्हणजे ती आवेशानें बाहेर पडते. ५ आणि मग तें अहिंसेचें भांडवल घेऊन, इन्द्रियें अहिंसा देण्याघेण्याचा धंदा आरंभितात. ६ जेव्हां समुद्राला उधान येतें, तेव्हां त्याचें पाणी खाड्यांना फुगवते, तसें मन आपल्या संपत्तीनें इन्द्रियांना श्रीमंत करतें. ७ पण हा विस्तार पुरे. जसा पंतोजी मुलाचा हात धरून आपणच अक्षरें लिहितो, ८ तसें मन हातपाय इत्यादि इन्द्रियांच्या ठिकाणी दयायुक्त क्रियांचा संभव करून, अहिंसेची जोगवण करते. ९ म्हणून, अर्जुना, इन्द्रियक्रियांचं मी जें वर्णन केलें, तें वस्तुतः मनाच्या व्यवहाराचंच वर्णन आहे. ३१० तेव्हां मनानें, १ जाण. २ उपर्डे, रिकामें, निःशक्त, ३ कळसूत्री बाहुलें. ४ सुगंध. ५ देवघेव,